ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
jugjug jiyo trailer launch

अनिल कपूर, कियारा आणि वरूणच्या ‘जुग जुग जियो’ चे ट्रेलर झाले लाँच

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या कॉमिक टायमिंग आणि डान्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. तो इंडस्ट्रीतील अशा मोजक्या कलाकारांपैकी एक आहे जो अभिनयासोबतच उत्तम डान्स देखील करू शकतो. स्टुडंट ऑफ द इयर सारख्या हिट चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारा वरुण आता लवकरच जुग जुग जिओ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत. 2020 सालापासून वरुणचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे.

‘जुग जुग जियो’ एक फॅमिली ड्रामा 

वरुण धवन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, त्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. ट्रेलरची वाट पाहत असतानाच चाहत्यांनी या चित्रपटाचे मोठे कटआउट्स लावले होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा एक फॅमिली ड्रामा आहे. ट्रेलरमध्ये अनिल कपूर आणि वरुण धवनची जोडी धमाल करताना दिसत आहे. यामध्ये वरुण आणि कियारा हे विवाहित जोडपे म्हणून दिसणार आहेत. या चित्रपटात अनिल कपूरसोबत नीतू कपूरही दिसणार आहे. निर्मात्यांनी ट्रेलरपूर्वी शनिवारी चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले. पोस्टरमध्ये अनिल कपूर प्रमुख म्हणून तर नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी हसताना दिसत आहेत.या चित्रपटात वरुण आणि कियाराशिवाय अनिल कपूर, नीतू कपूर, प्रसिद्ध युट्युबर मोस्टली सेन प्राजक्ता कोळी आणि मनीष पॉल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काल दुपारी 3 वाजता प्रदर्शित करण्यात आला. 

असे आहे चित्रपटाचे ट्रेलर 

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात वरुण आणि कियाराच्या लग्नापासून होते. ज्यामध्ये वधूच्या भूमिकेत कियारा आणि वराच्या भूमिकेत वरुण धवन खूपच छान दिसत आहेत. ट्रेलर पाहून असे दिसते की दोघेही त्यांच्या लग्नामुळे नाराज आहेत आणि घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटात अनिल कपूर वरुण धवनच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये, कियारा अडवाणीपेक्षा वरुण धवन व अनिल कपूर यांचीच जोडी अधिक धमाकेदार दिसत आहे. याशिवाय मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी हे स्टार्सही या ट्रेलरमध्ये आहेत. ट्रेलर रिलीज होऊन अवघ्या काही वेळातच त्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा ट्रेलर लोकांच्या पसंतीस उतरला आहे. 

चाहत्यांमध्ये चित्रपटाची वेगळीच क्रेझ 

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. तेव्हापासूनच या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ बघायला मिळाली आहे.या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की शनिवारी गाझियाबाद आणि आग्रा येथे चाहत्यांनी चित्रपटाच्या स्टारकास्टचे मोठे कटआउट्स लावले होते. गाझियाबादमध्ये ५० फुटांचे कटआउट लावण्यात आले, तर आग्रा येथे २५ फुटांचे पोस्टर लावण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर व्हायकॉम 18 च्या सहकार्याने करत आहे. या चित्रपटात प्रथमच वरुण आणि कियारा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ‘कुली नंबर 1’ नंतर वरुण दीड वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 24 जूनला हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

23 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT