ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अनिल कपूरचा लेक हर्षवर्धन ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत आहे रिलेशनशिपमध्ये

अनिल कपूरचा लेक हर्षवर्धन ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत आहे रिलेशनशिपमध्ये

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर लवकरच ‘थार’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र यासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे, ती म्हणजे हर्षवर्धन डेट करत असलेल्या मिस्ट्री गर्लची…मागच्या मार्च महिन्यात हर्षवर्धनला एका अनोळख्या मुलीसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली. नुकतंच हर्षवर्धनच्या एका मित्रानेही हर्षवर्धन रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे. म्हणूनच सर्वांना ती मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

रिलेशनशिपमध्ये आहे हर्षवर्धन

थार चित्रपटात हर्शवर्धन त्याचे वडील अनिल कपूर यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या एका मुलाखती दरम्यान हर्षने त्याच्या रिलेशनशिपविषयी उघड केलं आहे. मुलाखतीत जेव्हा त्याच्या खाण्यातील आवडीनिवडी विचारण्यात आल्या. तेव्हा त्याने तो स्वयंपाक बनवू शकतो असं जाहीर केलं. कारण त्यांची प्रेमिका त्याला सध्या स्वयंपाक शिकवत असल्याचं त्याने मान्य केलं. यावरून तो त्या मिस्ट्री गर्लसोबत नात्यात असल्याचं उघड झालं आहे. हर्षला त्याच्या वैयक्तिक गोष्टी जाहीर करायला आवडत नाहीत. त्यामुळे त्याने आजवर  त्याचं रिलेशनशिप जगासमोर जाहीर केलेलं नाही. हर्षवर्धनने मागच्या वर्षी जुहूमध्ये आईवडिलांच्या घराजवळच नवा फ्लॅट खरेदी केला आहे. तो त्याच्या नव्या घरी शिफ्टदेखील झाला आहे. यामागे त्याने कोरोना व्हायरसमध्ये त्याला वेगळं राहण्याची गरज वाटत होती असं सांगितलं होतं. शिवाय त्याला आईवडिलांवर स्वतःचा आर्थिक भार टाकायचा नाही असंही जाहीर केलं होतं. कदाचित या मिस्ट्री गर्लसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळेच हर्षने आईवडिलांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला असावा. पण अजूनही त्याने ती मिस्ट्री गर्ल कोण आहे याचा खुलासा केलेला नाही.

काय आहे हर्षवर्धनचा आगामी थार

हर्षवर्धन वडील अनिल कपूर यांच्यासोबत थार चित्रपटात एकत्र काम करत आहे. या चित्रपटात त्याने एका अॅंटिक डीलरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट थ्रीलर असून 6 मेला नेलफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. अनिल कपूरची या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका असेल. ज्यामध्ये तो एका तपासा दरम्यान हर्षसोबत एकत्र एकाच गाडीत प्रवास करताना दिसणार आहे.  या चित्रपटात सतीश कौशिक आणि फातिमा सेन यांचीदेखील महत्त्वाची भूमिका असेल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT