ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
jhulan goswami biopic

भारताची स्टार क्रिकेटर झूलन गोस्वामीवर येणार चित्रपट, अनुष्का शर्माने सुरु केले शूटिंग

क्रीडा हे असे क्षेत्र आहे जिथे प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. यशाची शिखरे गाठणारे फार कमी खेळाडू आहेत. असे खूप कमी खेळाडू आहेत ज्यांच्या जीवनावर आणि करिअरवर बायोपिक बनवले गेले आहेत. त्यातल्या त्यात खेळाडू जर पुरुष असेल तर त्याचे आयुष्य अनेकदा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले आहे. पण भारतीय महिला खेळाडूंच्या कारकिर्दीवर आधारित बायोपिक मात्र फार कमी आले आहेत.पण आता  भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि 300 हून अधिक विकेट्स घेणारी झूलन गोस्वामी हिच्यावर बायोपिक येणार आहे.  या चित्रपटात झूलन गोस्वामीचे आयुष्य आणि कारकीर्द लवकरच दाखवण्यात येणार आहे. या महान खेळाडूचे पात्र रंगवणारी दुसरे तिसरे कोणी नसून क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही आला आहे.

अनुष्का शर्माचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन 

झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून अनुष्का शर्मा तब्बल तीन वर्षांनी पडद्यावर पुनरागमन करत आहे.तिच्या नवीन चित्रपटाबद्दल बोलताना अनुष्का शर्मा म्हणते, “हा एक अतिशय खास चित्रपट आहे आणि याचे कारण म्हणजे अनेक त्यागांची कथा आहे. ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामी हिच्या जीवनावरून प्रेरित असून या कथेतून महिला क्रिकेट जगताविषयी लोकांना माहिती मिळेल आणि जगाचे डोळे उघडतील. जेव्हा झूलनने क्रिकेट खेळून देशासाठी नावलौकिक मिळवण्याचे ठरवले होते, तेव्हा महिलांना क्रिकेट खेळण्याचा विचार करणेही अवघड होते. महिला क्रिकेटचा चेहरा आणि झूलनच्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या कथांचे हे नाट्यमय रूपांतर आहे.”

लहानपणापासूनच क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले 

झुलन गोस्वामीचा जन्म 25 नोव्हेंबर 1982 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. तिने लहानपणापासूनच क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले होते. जेव्हा ती 12 वर्षांची होती, तेव्हा तिने क्रिकेट विश्वचषक सामने पाहिले, त्यानंतर तिने क्रिकेटर बनण्याचा निर्णय घेतला. पण,तिचा हा रस्ता तितका सोपा नव्हता. असे म्हटले जाते की सुरुवातीला झूलनच्या पालकांनाही त्यांच्या मुलीने क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतल्याचे मान्य नव्हते कारण त्यावेळी महिला खेळाडूंना विशेष ओळख नव्हती. पण, झूलनने कधीही हार मानली नाही आणि ती खेळातील बारकावे शिकत राहिली.

सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक झूलन गोस्वामी 

पश्चिम बंगालच्या चकदाह शहरात जन्मलेल्या झूलन गोस्वामीला मैदानावर क्रिकेट खेळताना पाहून अनेकांनी ‘टिप्पण्या केल्या की तुला अभ्यास करायचा नाही का? शिकायचे नाही का? ‘मुलगी आणि क्रिकेट’? पण झूलन डगमगली नाही. आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणाऱ्या झूलनची गणना जगातील सर्वात वेगवान महिला गोलंदाजांमध्ये केली जाते. डायना एडुलजी यांच्यानंतर भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार मिळविलेली ती दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. अर्जुन पुरस्कार जिंकणारी झूलन भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार आणि ICC जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची गोलंदाज देखील होती.झूलनच्या अभूतपूर्व यशाच्या मनोरंजक कथेत आणखी बरेच काही आहे आणि अनुष्का शर्माने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ चित्रपटानंतर अनुष्का आता मोठ्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. 

ADVERTISEMENT

आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून नेटफ्लिक्सचा ओटीटी चित्रपट म्हणून थेट बनवल्या जाणाऱ्या झूलनच्या बायोपिकचे शूटिंग सुरू झाले आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

30 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT