ADVERTISEMENT
home / मनोरंजन
yeu kashi tashi mi nandayla

महाएपिसोडनंतर प्रेक्षकांचा संताप, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ बंद करण्याची मागणी

काही कालावधीच मराठीतील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने चांगला टीआरपी मिळवलाच होता पण ओम (Shalva Kinjawadekar) आणि स्वीटूची (Anvita Phaltankar) जोडीही प्रेक्षकांना खूपच आवडू लागली होती. रविवारी महाएपिसोडनंतर मात्र ही मालिका बंद करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली असल्याचं दिसून येत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. दोन तासाच्या महाएपिसोडमध्ये स्वीटू आणि ओमकारचं लग्न होणार या आशेने टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांचा चक्क भ्रमनिरास झाला असून मालिकेमध्ये काहीही दाखवता का असा प्रश्नही आता विचारण्यात येत आहे.

स्वीटू आणि मोहीतचे लग्न

ओमकार आणि स्वीटूचे एकमेकांवर प्रेम असताना आणि इतक्या सगळ्या कसोटी पार करूनही लग्न स्वीटू आणि मोहीतचे का दाखवण्यात आले असा संतप्त सवाल आता सोशल मीडियावर दिसून येत आहे. जर तुम्हाला नीट कथा दाखवायची नाही तर किमान वाट्टेल ते तरी दाखवू नका असंही आता सोशल मीडियावर प्रेक्षक आणि चाहत्यांकडून म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर अनेक मीम्सदेखील या भागानंतर तयार होऊ लागलं आहे. बहिणीची कारस्थाने ही ओम आणि स्वीटूचे लग्न लावूनही दाखवता आली असती. पण कोणत्या तरी भलत्याच व्यक्तीसह लग्न लावून देणे हे अत्यंत चुकीचे दाखवण्यात आल्याची प्रतिक्रिया आता येत आहे. शिवाय मंडपात मुलीचा बाप नाही आणि अचानक ओमने त्यांना शोधायला जाणे आणि स्वीटूचे मोहितशी लग्न लावणे हे सर्वच न पटण्यासारखे आहे अशाही प्रतिक्रिया येत आहेत. टीआरपी मिळवण्यासाठी काहीही दाखवू नका आणि तसे करायचे असेल तर मालिका बंद करा अशा स्वरूपाची मागणी आता होत आहे. 

स्वीटू आणि ओमच्या प्रेमात ट्विस्ट

मोहीत आणि स्वीटू यांचे ठरलेले लग्न मोडून स्वीटू आणि ओमचे प्रेम दाखविण्यात आले आणि मग दोन तासाच्या भागामध्ये पुन्हा असा ड्रामा करण्यात आला आणि स्वीटूला मोहितशी लग्न करावे लागले असे दाखविण्यात आले. स्वीटू आणि ओमचे प्रेम असताना आणि स्वीटूला अखेरपर्यंत प्रेमाने जिंकून घेतलेल्या ओमला अशा तऱ्हेने बाजूला करताना नक्की कथा लिहिणाऱ्याचा आणि दिग्दर्शकाचा हेतू काय असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जर कथा या दोघांच्या प्रेमाची आहे तर लग्न भलत्याच माणसासह का लावण्यात आले आणि यातून नक्की कोणते मनोरंजन करण्यात येत आहे असेही प्रेक्षक आणि चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता यापुढे या मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण होणार की, स्वीटू आणि ओम हे पुन्हा एकत्र येणार अथवा दिग्दर्शक आणि कथालेखक नक्की यापुढे कोणता ट्विस्ट आणणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मात्र ही मालिका आता बघू नये असे एक सामान्य प्रेक्षकाची प्रतिक्रिया दिसून येत आहे. एखादी गोष्ट चांगली चालू असताना नाहक त्याला वेगळेच वळण देण्यात काहीच अर्थ नाही असेही ही मालिका पाहणाऱ्या एका गृहिणीने सांगितले. एकवेळ लग्न झाल्यानंतर स्वीटूला घरात होणारा त्रास पाहता आला असता पण आता हे पाहणं अतिशय कठीण जाईल आणि आता इच्छाच होत नाही अशीही एका सामान्य प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया आली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT