आयुष्यमान खुराना एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला गायक देखील आहे. आता चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तो पूर्वीसारखं प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन गाणे गाणं मिस करत आहे. जुन्या दिवसांची आठवण काढत आयुष्यमानने एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो 1990 साली प्रदर्शित झालेला चित्रपट दिल मधील गाणं खम्बे जैसी खडी है गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडिओसह आयुष्यमानने शेअर केलं आहे की, मी माझे गिग्स खूप मिस करतो आहे, जे लवकरच पुन्हा येतील. आयुष्यमानने पानी दा रंग, नज्म नज्म, साड्डी गली आजा, मिट्टी दी खुशबू, चंद कितथा अशी गाणी गाऊन प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
म्युजिक वरील प्रेमातून सुरू झाला बॅंड
संगीतावरील प्रेमातून त्याने आयुष्यमान भव नावाचा बॅंड सुरू केला आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त त्याने ही गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती. यासोबत हे ही सांगितलं होतं की लवकरच तो काही तरी छान प्रेक्षकांना ऐकवणार आहे. जेव्हापासून त्याने गाणं गायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्याला प्रेक्षकांना काही तरी चांगलं ऐकवावं असं वाटत आहे. प्रत्येक वेळी गाण्यातून काही तरी नवं व्यक्त करावं अशी त्याची इच्छा आहे. त्याला अशी गाणी गायची आहेत जी गाण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही, आणि युवा पिढीला ती खूप आवडतील. ऐकायला भले ती गाणी थोडी ऑफ बीट वाटतील पण ऐकणाऱ्यांना मजा येईल अशी गाणी त्याला गायची आहेत.
आयुष्यमान लवकरच प्रेक्षकांसमोर येणार नव्या अंदाजमध्ये
आयुष्यमान लवकरच एका नव्या अंदाजामध्ये प्रेक्षकांसमोर गाण्यातून व्यक्त होणार आहे. कारण गाणं हे त्याचं सर्वात पहिलं प्रेम आहे. गाताना त्याला सर्वात जास्त आनंद होतो. लोकांना त्याच्या मनातील भावना नेहमी त्याला गाण्यातून सांगायला जास्त आवडतात. शाळेत असताना मायक्रोफोन त्याचा पहिला मित्र होता. आता पुन्हा एकदा त्याला गाण्यातून मनातील भाव लोकांसमोर मांडायचे आहेत. यासोबतच तो डॉक्टर जी या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 2022 मध्ये आयुष्यमानचे अनेक चित्रपट प्रतिक्षेत आहेत. त्याला नेहमीच काहीतरी वेगळं प्रत्येक वेळी करायचं असतं. त्यामुळे त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना कसा वाटतो ते पाहणं उत्सुकता वाढवणारं असणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक