आयुषमान हा त्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे चित्रपट आणि भूमिका या नेहमीच वेगळ्या पठडीतल्या असतात. त्याच्या या हटके भूमिकांमुळे फार कमी वेळातच आयुषमानने बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता आयुषमान आणखी एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटात तो क्रॉस फंक्शनल अॅथलिटची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी आणि अॅथलिट दिसण्यासाठी त्याला फिजिकल ट्रान्सफार्मेशन करावे लागले. आयुषमानने या चित्रपटासाठी स्वतःचा बॉडी टाईपच चेंज केला आहे. त्यामुळे त्याचा हा नवा लुक चाहत्यांना थक्क करणारा असणार आहे. या लुकसाठी आयुषमान सध्या प्रचंड मेहनत घेत आहे.
आयुषमान नव्या लुकसाठी कशी करत आहे मेहनत
आयुषमानच्या एका इंन्स्टा स्टोरीतून काही दिवसांपूर्वी असं आढळून आलं होतं की त्याने या नव्या लुकसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आयुषमानचा फिजिकल ट्रेनर राकेश उदियारसोबत याविषयी चर्चा करताना तो त्यच्या या स्टोरीत स्टोरीत आढळला होता. शिवाय त्याने या स्टोरीमध्ये दिग्दर्शक अभिषेक कपूरलाही टॅग केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुषमान त्याच्या या नव्या लुकबाबत खूपच प्रोटेक्टिव्ह झाला आहे. हा लुक चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच लोकांना समजू नये असं त्याला वाटत आहे. ज्यामुळे जाणिवपूर्वक तो चाहत्यांपासून स्वतःचा नवा लुक लपवत आहे. सोशल मीडियावरही त्याने त्याचे नव्या लुकमधील कोणतेच फोटो जाहीरपणे शेअर केलेले नाहीत. एक क्रॉस फंक्शनल अॅथलिट साकारण्यासाठी त्याने त्याचा बॉडी टाईप बदलला आहे. ज्यामुळे चाहते त्याला पाहून नक्कीच आश्चर्यचकीत होणार आहेत. मात्र हा धक्का चाहत्यांना थेट चित्रपटातूनच मिळावा यासाठी आयुषमान असं वागत आहे.
नव्या लुकसाठी लॉकडाऊनमध्ये अशी घेतली मेहनत
आयुषमान सध्या त्याच्या होमटाऊन चंदीगढमध्ये राहत आहे.आयुषमानने त्याच्या भावासोबत चंदीगढमध्ये स्वतःचे घरही घेतले आहे. ज्याची किंमत जवळजवळ नऊ कोटी इतकी आहे. कोरोनाच्या काळात त्याने त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवणं पसंत केलं. शिवाय लॉकडाऊनमध्ये आयुषमानने स्वतःच्या कविता आणि मजेशीर किस्से शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे तो सध्या घरातून बाहेर पडत नाही आहे. सहाजिकच या परिस्थितीचा त्याला चांगलाच फायदा होत आहे. कारण यामुळे तो लोकांमध्ये मिसळत नाही आहे आणि त्याचा नवा लुक लपवणं त्याला सहज शक्य होत आहे. कोरोनाच्या काळात फिट राहण्यासाठी आणि हा लुक मिळवण्यासाठी आयुषमानने सायकलिंग आणि व्यायामावर भर दिला आहे. शिवाय घरातच राहून त्याने स्वतःचा बॉडीटाईप चेंज केला आहे. आयुषमानच्या या नव्या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर असून वाणी कपूर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. आयुषमान आणि वाणी पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र येणार आहेत. आयुषमानचा हा आगामी चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्षित होईल मात्र त्याचं शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. या चित्रपटाचे नाव आणि इतर गोष्टींची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. मात्र लवकरच आयुषमानचा नवा लुक आणि चित्रपटाचे पोस्टर जाहीर करण्यात येईल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख
बिग बींची नात ‘नव्या नवेली’ या आजारावर घेत होती उपचार, उघड केली स्ट्रगल स्टोरी
अक्षय कुमारचा नवा स्टंट, बेअर ग्रिल्ससोबत करणार खतरनाक जंगलात भटकंती