ADVERTISEMENT
home / Diet
इनफेक्शनचा  धोका टाळण्यासाठी खा केळफुलाची भाजी

इनफेक्शनचा धोका टाळण्यासाठी खा केळफुलाची भाजी

भारतीय संस्कृतीमध्ये केळाच्या झाडाला मानाचे स्थान आहे. पूजाविधी, लग्नकार्य अशा मंगल विधींसाठी दारावर केळींनी लगडलेलं झाड प्रवेशद्वाराजवळ लावलं जाते. केळीच्या झाडाचे फळ, फुल आणि खोडाचा उपयोग स्वयंपाकासाठी तर पानांचा उपयोग जेवण वाढण्यासाठी केला जातो. कोकणात आणि दक्षिणेकडील भागात केळफुलाची भाजी हमखास केली जाते. केळफुलाची भाजी  जितकी चविष्ट लागते तितकीच ती आरोग्यासाठी उत्तम असते. आजारपण आणि इनफेक्शनपासून  सुरक्षित राहण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात केळफुलाच्या भाजीचा समावेश करायलाच हवा. कारण केळफुलाच्या भाजीतून तुम्हाला प्रोटिन्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर्स आणि लोह भरपूर प्रमाणात मिळते. यासाठी जाणून घ्या या भाजीचे फायदे आणि करण्याची एक सोपी पद्धत

इनफेक्शनपासून बचाव –

संशोधनात असं आढळून आलेलं आहे की केळफुलाच्या भाजीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक आहेत. ज्यामुळे तुमचे इनफेक्शपासून संरक्षण होते. केळफुलांमध्ये इथेनॉल हा घटक मुबलक असतो. ज्यामुळे जीवजंतूंची वाढ रोखण्यास मदत होते. तुम्हाला एखादी जखम अथवा दुखापत झाली असेल तर ती भरून काढण्यासाठीही ही भाजी उपयुक्त आहे. केळफुलांच्या भाजीमध्ये मलेरियाचे विषाणू नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे. यासाठीच आजारपणांपासून दूर राहण्यासाठी ही भाजी आठवड्यातून  एकदा तरी अवश्य खावी. 

Instagram

ADVERTISEMENT

मधुमेहींसाठी गुणकारी –

मधुमेह हा आजकाल एक सगळीकडेच दिसून येणारा आजार झाला आहे. मधुमेहींनी काय खावं आणि काय खाऊ नये हा एक मोठा गहन प्रश्नच आहे. कार आपण खात असलेले अनेक पदार्थ शरीरात साखरेचे प्रमाण वाढवणारे असतात. मात्र जर मधुमेहींनी केळफुलाची भाजी नियमित खाल्ली तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण या भाजीमुळे रक्तातील साखर वाढत नाही. या भाजीत लोह आणि फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. ज्याचा मधुमेहींना फायदाच होऊ शकतो. 

स्तनपान देणाऱ्या मातांसाठी उपयुक्त –

आजकाल बाळंतपणानंतर नवजात मातेच्या शरीरात पुरेशी दुधाची निर्मिती न होण्याची  समस्या अधिक प्रमाणात जाणवते. मात्र जर अशा मातांनी आहारात केळफुलाच्या भाजीचा वापर केला तर त्यांना फायदा होऊ शकतो. केळफुलाच्या भाजीमुळे नवजात मातेच्या शरीरात दूध निर्माण होण्यास चालना मिळते. शिवाय बाळंतपणानंतर अती रक्तस्त्राव झाल्याने शरीराची झालेली झीजही यामुळे भरून निघते. 

कर्करोगापासून संरक्षण –

मानवी शरीरात रोगाची लागण होण्याचे मुख्य कारण म्हणजे फ्री रेडीकल्स हे आहे. या  फ्री रेडिकल्समुळे शारीरिक पेशींचे नुकसान होते. केळफुलामध्ये अॅंटि ऑक्सिडंट घटक असतात ज्यामुळे तुमचे या फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. फ्री रेडिकल्समुळे होणारा कर्करोगाचा धोकाही यामुळे कमी होतो. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –

केळफुलामध्ये फायबर्स  आणि पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमचे पोट योग्य पद्धतीने  स्वच्छ होते. पोटाच्या समस्या कमी झाल्यामुळे याचा चांगला परिणाम  तुमच्या वजनावर होतो. वारंवार भुक लागल्यामुळे अती खाण्याची  सवय  असलेल्या लोकांनी आहारात केळफुलाचा समावेश करावा. ज्यामुळे त्यांचे पोट भरलेले राहते आणि भुक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी केळफुलाची भाजी खाणं तुमच्या फायद्याची ठरेल.

ADVERTISEMENT

Instagram

मासिक पाळीच्या समस्या होतात कमी –

मासिक पाळी आणि या काळात जाणवणाऱ्या निरनिराळ्या समस्या यांच्यावर केळफुलाची भाजी वरदान ठरू शकते. कारण या भाजीमधील औषधी घटकांमुळे तुमच्या मासिक पाळीमध्ये नियमितपणा येतो. शिवाय हॉर्मोन्स संतुलित झाल्यामुळे या काळात जाणवणारा त्रासही कमी होतो. 

अॅंटि एजिंगसाठी खा केळफुलाची भाजी

केळफुलामध्ये  अॅंटि एजिंग घटक असतात. ज्यामुळे तुमचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. याचा आणखी एक फायदा असा होतो की यामुळे तुमची त्वचा  चिरतरूण राहते. कारण या फ्री रेडिकल्समुळे तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसत अससतात. मात्र त्वचेचं रक्षण करण्यासाठी आणि नेहमी चिरतरूण दिसण्यासाठी केळफुलाची भाजी तुमची  मदत करू शकते.

ADVERTISEMENT

Instagram

गर्भाशयासाठी उत्तम –

ज्या महिलांना गर्भाशयाच्या समस्या आहेत त्यांनीही केळफुलाच्या  भाजीचा आहारात नियमित समावेश करावा. याचं कारण असं की यातील पोषक घटक तुमच्या गर्भाशयाला स्वस्थ ठेवतात. एवढंच नाही केळफुलाच्या भाजीमुळे महिलांच्या वंधत्वाच्या समस्याही कमी होऊ शकतात. 

केळफुलामुळे वाढते पचनक्षमता –

केळफुलामध्ये विघटनशील आणि अविघटनशील असे दोन्ही फायबर्स असतात. यातील विघटनशील घटकांमुळे तुमची पचनशक्ती वाढते. ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्या कमी होतात. 

ADVERTISEMENT

ह्रदयासाठी वरदान –

ह्रदय स्वस्थ राहण्यासाठी आहारात तुम्ही केळफुलाचा समावेश करू  शकता.  कारण यामध्ये टॅनिन, अॅसिड. फ्लेवोनॉईड आणि अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमचे रोगांपासून संररक्षण तर होतेच शिवाय तुमचे ह्रदयही निरोगी राहते. 

Instagram

जाणून घ्या केळफुलाची भाजी करण्याची सोपी कृती –

साहित्य –

ADVERTISEMENT
  • एक केळफुल
  • रात्रभर भिजवलेले काळे वाटाणे
  • काळा मसाला
  • लाल तिखट
  • गूळ
  • चिंचेचा  कोळ
  • चवीपूरे मीठ
  • खोवलेला नारळ
  • फोडणीसाठी तेल
  • मोहरी
  • हिंग
  • जिरे
  • हळद

भाजी बनवण्याची कृती –

  • केळफुल सोलणे ही एक काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे. कारण जर या फुलांमधील जाड, काळा पूंकेसर आणि त्यावरील पातळ पापूद्रा भाजीत राहिला तर भाजी कडवट लागू शकते. यासाठी आधी केळफुल व्यवस्थित सोलून घ्या
  • केळफुलाच्या पाकळ्या आणि कोवळा दांडा सोलून, धुवून आणि चिरून घ्या
  • मीठाच्या पाण्यामध्ये चिरलेली भाजी थोडावेळ ठेवा ज्यामुळे तिच्यामधील काळसरपणा आणि चिकटपणा कमी होईल.
  • दोन ते तीन तासांनी चिरलेली भाजी घट्ट पिळून घ्या. 
  • केळफुल आणि भिजलेले वाटाणे कुकरमध्ये उकडून घ्या.
  • कढईत फोडणीसाठी तेल आणि इतर साहित्य टाका आणि त्यावर उकडलेले केळफुल आणि काळे वाटाणे परतून घ्या.
  • भाजी शिजल्यावर वरून काळा मसाला, लाल तिखट, मीठ आणि चिंचेचा कोळ टाकून भाजीला एक वाफ द्या. 
  • गूळ टाकून भाजी खालील गॅस बंद करा आणि वरून खोवलेल्या खोबऱ्याचा किस टाकून भाजी सजवा आणि गरमगरम सर्व्ह करा. 

याचप्रमाणे तुम्ही केळफुलाची भजी, कटलेट, सलाड, कोशिंबीरदेखील नक्कीच करू शकता. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

दहीभात खाण्याचे फायदे आणि झटपट रेसिपी

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी

वजन कमी करण्यासाठी खा chia seeds च्या चविष्ट रेसिपी

01 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT