Advertisement

बॉलीवूड

आधी कोर्ट मॅरेज करणार विकी आणि कतरिना, नंतर रंगणार शाही विवाह सोहळा

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Nov 25, 2021
आधी कोर्ट मॅरेज करणार विकी आणि कतरिना, नंतर रंगणार शाही विवाह सोहळा

Advertisement

बॉलीवूडमध्ये सध्या वेडिंग सीझन सुरू झाला आहे. राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नानंतर अनेक सेलिब्रेटीजच्या लग्नसोहळ्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. लवकरच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न होणार अशी सध्या चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकी आणि कतरिनाचा राजस्थानमध्ये 7 ते 12 डिसेंबरला शाही विवाह सोहळा रंगणार आहे. पण त्याआधीच मुंबईत त्यांचे कोर्ट मॅरेज झालेले असेल अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे. खरंच विकी आणि कतरिना करणार का दोनदा लग्न…

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला

विकी आणि कतरिना करणार का कोर्ट मॅरेज

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत आता एक आणखी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. राजस्थानला लग्नसोहळ्यासाठी जाण्यापूर्वी पुढच्याच आठवड्यात विकी आणि कतरिना मु्ंबईत कोर्ट मॅरेज करण्याची शक्यता आहे. कतरिनाच्या जवळच्या व्यक्तीकडून ही माहिती देण्यात आली आहे. मुंबईत कोर्ट मॅरेज होताच दोघं जयपूरला रवाना होणार आहेत. खास पाहुण्यांना लग्नाच्या पत्रिकादेखील पोहचल्या आहेत. या पाहुण्यांमध्ये वरूण धवन, नताशा दलाल, करण जौहर, रोहीत शेट्टी, अली अब्बास जफर, कबीर खान, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, मिनी माथुर यांचा समावेश असणार आहे. 

रात्रीस खेळ चाले’मधून जुन्या शेवंताची एक्झिट

सुरू झाली का लग्नाची तयारी

विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे लोकेशन राजस्थानमधील सवाई माधोपूर हे आहे. जिथे सध्या दोघांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. लग्नसोहळा सात ते बारा डिसेंबर असला तरी याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र लग्नासाठी अनेक हॉटेल्समध्ये बुकींग करण्यात आलेलं आहे. व्हिआयपी पाहुण्यांसाठी अनेक वेडिंग कंपन्या एकत्र आल्या आहेत. निरनिराळ्या आयोजनासाठी निरनिराळ्या कंपनीकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. विकी आणि कतरिनाची टीमदेखील लग्नाच्या तयारीला लागली आहे. यासाठी दोघांची टिम लवकरच वेडिंग डेस्टिनेशनवर पोहचणार आहे. विकी आणि कतरिनाच्या वेडिंग लुकची ट्रायल घेण्यात आली आहे. वरातीपासून ते अगदी मेंदी, हळदीसाठी निरनिराळे डेकोरेशन करण्यात येणार आहे. आता फक्त विकी आणि कतरिनाने लग्नाची जाहीर घोषणा करण्याची सर्व वाट पाहत आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये हा शाहीसोहळा अगदी थाटामाटात पार पडणार आहे. मात्र त्याआधी विकी आणि कतरिनाने मुंबईतच कोर्ट मॅरेज केलेलं असेल.  

सुरू होतोय नवा कुकरी शो, किचनमध्ये कलाकारांसोबत कल्ला करणार संकर्षण कऱ्हाडे