Advertisement

मनोरंजन

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला

Dipali NaphadeDipali Naphade  |  Nov 24, 2021
pandu movie

Advertisement

बुर्रूम बुर्ऱुम म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. पांडू चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम (Bhau Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) त्यांच्या जोडीला हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि सोबतीला हेमांगी कवी (Hemangi Kavi), प्रवीण तरडे (Pravin Tarade) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांसारखे नावाजलेले कलाकार अशा स्टारकास्टने सजलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने (Viju Mane) यांचे आहे. येत्या 3 डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

अधिक वाचा – रात्रीस खेळ चालेमधून जुन्या शेवंताची एक्झिट

पांडू चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची 

पांडू या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत. वगनाट्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचं काम दोघेही करतायत. एक दिवस नशिबाची अशी काही संधी चालून येते की या दोघांनाही मुंबईत नोकरी मिळते तेही हवालदाराची. पांडू तसा साधाभोळा आणि अगदी भाबडा तर महादू हा त्याच्या अगदी विपरीत चतुर आणि चाणाक्ष, दुनियादारी समजणारा. मुंबईत आल्यावर पांडूंच्या आयुष्यात येते केळी विकण्याचा व्यवसाय करणारी डॅशिंग गर्ल उषा. आसपासच्या स्वार्थी आणि मतलबी दुनियेत पांडूसारखी भोळी आणि साधी माणसंही असतात या गोष्टीचं तिला कौतुकही वाटतं आणि याचमुळे ती पांडूच्या प्रेमातही पडते. हा चित्रपट पूर्णतः विनोदी अंगाने जाणारा असून तो प्रेक्षकांना खळखळून हसवेल आणि त्यांचा ताण दूर करेल असा विश्वास झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांना वाटतो. अवधूत गुप्ते यांच्या संगिताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत, बुरुम बुरुम ने 20 लाख व्ह्यूज तर केळेवाली गाण्याने अवघ्या 24 तासात 10 लाख व्ह्यूज मिळवलेत. चित्रपटाचा हा ट्रेलरही पांडूबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करेल अशी आशा चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली. येत्या 3 डिसेंबरला हा चित्रपट राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

अधिक वाचा – यंदाचा व्हॅलेंटाईन डे ‘वन फोर थ्री’ चित्रपटासोबत होणार साजरा

सध्या आहे चित्रपटाची हवा 

कोरोनानंतर आता अनेक चित्रपट येत आहेत. यामध्ये मराठी चित्रपटही अनेक प्रदर्शित होत आहे. सध्या सगळीकडे ‘पांडू’ या चित्रपटाचीच हवा आहे. या चित्रपटाची कथा आणि चित्रपटातील कलाकारांमुळे प्रेक्षकांमध्येही याची उत्सुकता अधिक दिसून येत आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके ही जोडी तर महाराष्ट्राची आवडती जोडी आहे. या जोडीचे विनोदाचे धमाल टायमिंग प्रेक्षकांना सांगायची वेगळी गरज नाही. त्यामुळे या चित्रपटामध्ये ही जोडगोळी काय धमाल करणार हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळेच आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. तर आता बऱ्याच वर्षांनी हास्यपट आणि खळखळून हसायला लावणारा असा हा चित्रपट भेटीला येत आहे याबाबत प्रेक्षकांनाही बरं वाटत आहे. या चित्रपटातून आता काय हास्याचा झरा दिसून येणार आहे याचीच प्रेक्षकांना आता आतुरता आहे. 

अधिक वाचा – सुरू होतोय नवा कुकरी शो, किचनमध्ये कलाकारांसोबत कल्ला करणार संकर्षण कऱ्हाडे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक