पावसाने सध्या चांगलाच जोर धरला आहे. कोरोनाच्या भितीने सर्वजण सध्या घरातच असले तरी यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या केसांच्या समस्या काही कमी झालेल्या नाहीत. पावसाळ्यात हवामानात आर्द्रता वाढल्यामुळे केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांना दुर्गंधी येणे, चिकटपणा वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होत असतात. अशा वातावरणात तुमच्या कमजोर झालेल्या केसांना गरज असते ती म्हणजे योग्य निगा राखण्याची… लॉकडाऊनमध्ये पार्लरमध्ये अथवा सलॉनमध्ये जाऊन हेअर स्पा करणं शक्य नसलं तरी केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही घरातच हे DIY हेअर मास्क नक्कीच तयार करू शकता. यासाठी तुम्हाला बेसनाचा वापर करावा लागेल. कारण बेसन म्हणजेच चण्याचे पीठ तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहे. तेव्हा जाणून घ्या बेसनाचा वापर तुम्ही कसा आणि कोणकोणत्या समस्यांसाठी करू शकता.
Shutterstock
केस मजबूत होण्यासाठी –
जर अती प्रमाणात गळण्यामुळे तुमचे केस पातळ आणि निस्तेज झाले असतील तर बेसनाचा वापर करून तुम्ही ते मजबूत करू शकता.
हेअर मास्क बनवण्यासाठी साहित्य –
एक चमचा बेसन आणि एक चमचा मेथी पावडर
कसा कराल वापर –
बेसन आणि मेथीची पावडर एकत्र करा. त्यात नारळाचे तेल मिसळून एक जाडसर पॅक तयार करा. हा हेअर मास्क केसांच्या मुळांना लावा. पंधरा मिनीटांनी केस कोमट पाण्याने धुवून टाका. या हेअर मास्कमुळे तुमच्या केसांच्या मुळांना पोषण मिळेल त्यामुळे ती मजबूत होतील. या उपाय आठवड्यातून एकदा करा. ज्यामुळे तुमचे केल लवकरच लांब आणि चमकदार होतील.
Shutterstock
केसांचे गळणे थांबवण्यासाठी –
पावसाळ्यात केस अती प्रमाणात गळतात. मात्र बेसनाचा वापर करून तुम्ही केसांचे गळणे थांबवू शकता.
हेअर मास्क तयार करण्यासाठी साहित्य –
अर्धी वाटी बेसन आणि दोन मोठे चमचे दही
कसा कराल वापर –
बेसन आणि दही एकत्र करा आणि त्याची जाडसर पेस्ट तयार करा. केंसांच्या मुळापासून हा हेअर मास्क लावण्यास सुरूवात करा. वीस मिनीटांनी हेअर मास्क सुकण्यास सुरवात झाल्यावर कोमट पाण्याने केस धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा अथवा महिन्यातून दोन, तीनदा नक्कीच करू शकता. बेसन आणि दह्यामुळे केसांचे योग्य पोषण होऊन केस गळणे कमी होईल.
Shutterstock
केस चमकदार करण्यासाठी –
केस निस्तेज झाले असतीस तर त्यामधील नैसर्गिक चमक हळू हळू कमी होऊ लागते. अशा कोरड्या झालेल्या केसांना पुन्हा चमकदार आणि मऊ करण्यासाठी हा मास्क तुम्ही नक्कीच वापरू शकता.
हेअर मास्क करण्यासाठी लागणारे साहित्य –
एक चमचा बेसन, एक अंडे, पाव चमचा मध
कसा कराल वापर –
सर्व साहित्य एकत्र करून त्यापासून छान हेअर मास्क तयार करा. हा मास्क केसांना लावून पंधरा ते वीस मिनीटांनी केस धुवा. अंडे आणि मध यामुळे केसांना मॉश्चराईझ होतील. केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.
Shutterstock
केसांचा कोंडा कमी करण्यासाठी –
केसांमध्य कोंडा होणे ही एक अनेकांना सतावणारी मुख्य समस्या आहे. केसांमध्ये कोरडेपणा वाढल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.
हेअर मास्क करण्यासाठी लागणारे साहित्य –
बेसन आणि पाणी
कसा कराल वापर –
बेसनात पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्पवर लावा. पंधरा मिनीटांनी केस धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यामुळे केसांमधील कोंडा कमी होईल.
तेलकट केसांसाठी –
जर तुमचे केस तेलकट असतील तर त्यांना अधिकप्रमाणात तेल निर्मितीला प्रोत्साहन मिळणार नाही अशा प्रकारचा हेअर मास्क लावण्याची गरज असते. सोबतच केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. बेसनामुळे केस अधिक कोरडे अथवा तेलकटही होत नाहीत.
हेअर मास्कसाठी लागणारे साहित्य –
बेसन आणि नारळाचे दूध
कसा कराल वापर –
बेसन आणि नारळाचे दूध एकत्र करून त्यांची एकजीव पेस्ट तयार करा. केसांना या पेस्टने मालिश करा आणि दहा मिनीटांनी केस स्वच्छ धुवून टाका. ज्यामुळे तुमच्या केसांमधील तेलकटपणा कमी होईल पण तरीही केस मऊ आणि शाईनी दिसतील.
Shutterstock
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा –
#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)
#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय
DIY : घरीच नैसर्गिक पद्धतीने तयार करा कुंकू