बऱ्याचदा आपल्या घरात आजी – आजोबा अथवा आई रात्री झोपताना पायाला तेल लावताना दिसून येते. आपल्याला त्याचे नक्की महत्त्व कळत नाही. पायाला नक्की तेल का लावतात? पायाला तेल लावण्याचे अप्रतिम फायदे नक्की काय आहेत हे आपण या लेखातून पाहणार आहोत. दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी पायाला तेल लावणे (oil massage on feets) आणि हलक्या हाताने पायाला मालिश करणे हा उत्तम उपाय आहे. पायाला तेल लावणे आणि मालिश करणे यामुळे दिवसभराचा थकवा तर निघून जातोच त्याशिवाय दुसऱ्या दिवशी तुम्हाला अधिक ताजेतवानेदेखील वाटते. दिवसभर पायाला धूळ आणि माती लागते. रात्री पायाला तेल लावल्याने तुमच्या पायावरील ही माती निघून जाते आणि तेलाने करण्यात आलेल्या मालिशमुळे पायाला आराम मिळतो. पायाच्या भेगांमुळे होत असलेला त्रासही कमी होतो.
नियमित लावा तेल, पाय करा स्वच्छ
तेल लावण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पायाला तेल लावता. पण त्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित पाय स्वच्छ करून घ्या. सर्वात पहिले तुम्ही पायाला अगदी तळपायापासून साबण लावा आणि त्यावर धूळ – माती काढून पाय स्वच्छ करून घ्या. त्यानंतर टॉवेलने पुसून पाय कोरडे करा आणि मगच त्यावर तेल लावा. रोज रात्री झोपताना तुम्ही तेल लावल्यास, तुम्हाला याचा फायदा मिळतो. तुमच्या शरीरामध्ये असणारी उष्णता कमी होण्यासाठीही याचा उपयोग होतो. दिवसभर हाय हिल्स घालून पाय दुखत असतील तर उत्तम उपाय आहे.
नीट मसाज करा
रात्री झोपण्यापूर्वी पायाला तेल लावा आणि साधारण 5 – 10 मिनिट्स तुम्ही पायाला नीट मसाज करा. पायाला तेल चांगले रगडा जेणेकरून ते त्वचेमध्ये व्यवस्थित मुरेल. यामुळे तुम्हाला जर अनिद्रा अथवा झोपेचा त्रास असेल तर निघून जाण्यास मदत मिळते. पायाला तेल लावल्यामुळे रात्री व्यवस्थित झोप लागते. तसंच तुमचा थकवा निघून जाण्यास मदत मिळते. पायाच्या तळव्यांची जळजळ होत असेल तर नक्की तेल लावा.
कोमट तेल वापरा
जेव्हा तुम्ही पायाला तेल लावाला तेव्हा त्याआधी ते एकदा कोमट करून घ्या. यामुळे पायांना अधिक आराम मिळतो. कोमट तेलामुळे पायांमध्ये तेल पटकन मुरायला मदत होते आणि मसाज केल्याचा फायदाही मिळतो. कोमट तेल पायाच्या तळव्यांना लावा आणि मसाज करा. यामुळे केवळ पायांनाच नाही तर तुमच्या हाडांनाही फायदा मिळतो. सांध्यांमध्ये असणारा त्रास कमी होतो आणि हाडंही मजबूत होतात. त्यामुळेच लहान मुलांनाही तेलाने नियमित मसाज केला जातो. मोठे झाल्यानंतर ही सवय कायम राहायला हवी. पायाला जर सूज येत असेल तरीही ती कमी करण्यास याचा फायदा मिळतो.
घोरण्याच्या त्रासापासून होते सुटका
तुम्हाला घोरण्याचा त्रास असेल अथवा मध्येच तुम्ही झोपेतून जागे होत असाल तर तुम्ही नियमित पायांना तेल लावायला हवे. यामुळे घोरण्याच्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळते आणि शांत झोपही लागते. ज्यांना मध्येच झोपेतून उठायचा त्रास आहे त्यांनी तर नक्कीच हा उपाय करून पाहायला हवा.
पचनाच्या त्रासातूनही मिळते सुटका
सध्याच्या जीवनशैलीत कधीही जेवण आणि फास्टफूड खाणे हे नियमित झाले आहे. यामुळे गॅस अथवा पोटादुखी आणि पचनाचा त्रासही उद्भवतो. पण तुम्हाला या त्रासापासून सुटका हवी असेल तर तुम्ही पायाला नियमित तेल लावा. यामुळे गॅस होणे अथवा सतत ढेकर येणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
वात दोष होतो कमी
तुम्हाला वात दोषाचा त्रास असेल तर तुम्ही नियमित पायाला तेल लावावे. यामुळे वात दोष कमी होतो आणि तुम्हाला मासिक पाळीच्या दिवसात ब्लोटिंगची समस्या होत असेल अथवा इतरही दिवशी कधी ब्लोटिंगच्या समस्येचा अर्थात पोट फुगण्याच्या समस्येचा त्रास असेल तर तो कमी करण्यास यामुळे मदत मिळते.
पायाला तेल लावण्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही नियमित पायाला तेलाने मसाज करा आणि राहा निरोगी.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक