ADVERTISEMENT
home / Recipes
Health-benefits-of-Poppy-Seeds

खसखस खाण्याचे फायदे, कसा करायचा उपयोग घ्या जाणून (Benefits Of Poppy Seeds In Marathi)

आपल्याकडे अनेक असे पदार्थ आहेत ज्याचे अनेक फायदे होतात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे खसखस. खसखसमुळे केवळ पोटच भरत नाही तर अनेकदा आरोग्यासाठीही खसखसचा फायदा होतो. खसखस हा असा खाद्यपदार्थ आहे जो पक्वान्नाचा स्वाद वाढवतो. त्याशिवाय औषधीय गुणांसाठीही याचे वैशिष्ट्य अधिक आहे. खसखस चे फायदे (Poppy Seed Benefits In Marathi) आरोग्यदायी काय आहेत हे आपण यातून पाहणार आहोत. पण त्याआधी खसखस म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि त्याचे पोषण तत्व काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तसंच खसखस चे फायदे मराठीत आपण यातून जाणून घेऊया.

खसखस म्हणजे काय ? (What Are Poppy Seeds)

Poppy Seeds In Marathi

खसखसला इंग्रजीमध्ये Poppy Seeds असे म्हटले जाते, बंगालीमध्ये पोस्तो तर तेलुगूमध्ये गसागसालू असे म्हटले जाते. पॉपी नावाच्या झाडापासून याचे बी मिळते. युरोपीय देशांमध्ये याची वाढ अधिक होते. तर भारतात याचे प्रमाण पश्चिम बंगालमध्ये जास्त आहे. याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये आणि तेल काढण्यासाठीही करण्यात येतो. खसखसचे प्रकार (Type of Poppy Seeds) एकूण तीन आहेत. 

सफेद खसखस – भारतीय अथवा एशियाई खसखस असे या पांढऱ्या रंगाच्या खसखसला म्हटले जाते. याचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये करण्यात येतो 

निळे खसखस – युरोपीय खसखस याला म्हटले जाते. अधिकांश स्वरूपात ब्रेड अथवा कन्फेक्शनरी अर्थात चॉकलेट वा मिठाईमध्ये याचा वापर करण्यात येतो

ADVERTISEMENT

ओरिएंटल खसखस – या खसखसला ओपियम पॉपी असे म्हटले जाते. यामधून अफीम निर्माण करण्यात येते

खसखसचे पोषक तत्व (Nutritional value) जाणून घेणेही गरजेचे आहे. खसखसमध्ये ऊर्जा, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, जिंक याचा समावेश असतो. जे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

खसखस खाण्याचे फायदे (Poppy Seed Benefits In Marathi)

Poppy Seed Benefits In Marathi

खसखस खाण्याने आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. खसखस खाण्याचे फायदे आरोग्यासाठी आपण यातून जाणून घेणार आहोत.

पचनासाठी अप्रतिम (Digestion)

पोटासंबंधी कोणत्याही समस्या असतील तर खसखस चे फायदे करून घेता येतात. खसखस हा खाद्यपदार्थ फायबरसारख्या खास पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जो पोटांशी संबंधित बद्धकोष्ठ आणि गॅससारख्या समस्यांपासून सुटका मिळवून द्यायचे काम करतो. याशिवाय फायबर कोलन कॅन्सरला रोखण्याचे कामही करते. नियमित स्वरूपात याचा जेवणात समावेश केल्यास, पचनासाठी याची मदत मिळते. 

ADVERTISEMENT

तोंड येणे (Stomatitis Ulcerative) 

Heatlth Benefits Of Poppy Seeds In Marathi

तोंड आल्यानंतर सर्वात जास्त त्रास होतो तो जेवण जेवताना. काही जणांना तर पाणी पिण्यासाठीही त्रास होतो. तोंड येणे हे अत्यंत त्रासदायक असते. जीभ, ओठ आणि संपूर्ण तोंड यामुळे जळजळते. यामुळे खाण्यापासून अगदी दात स्वच्छ करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी करताना त्रास होतो. पण खसखस हे यावर उपयोगी ठरते. खसखस थंड असल्याने, पोटातील उष्णता कमी करून तोंड येण्यावर याचा घरगुती उपाय करता येतो. तोंड येण्यावर खसखस हा उत्तम आणि प्रभावी उपाय ठरतो. 

झोप येण्यासाठी (To Get Good Sleep)

sleep

ज्या व्यक्तींना झोप येण्याची समस्या असेल त्या व्यक्ती खसखसचा उपयोग करून घेऊ शकतात. अनिद्रा समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी याचा अनादी काळापासून उपयोग केला जातो. मात्र हे अति प्रमाणात घेऊ नका. घरामध्ये वापरण्यात येणारी खसखस ही पूर्णतः स्वच्छ करून बाजारात विकली जाते. यामध्ये अफीमचे प्रमाण नसते हे लक्षात घ्या. मात्र झोपेसाठी तुम्ही दुधात मिसळून खसखस खाऊ शकता. खसखसची खीरही करून पिऊ शकता.

प्रजननशक्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी (To Improve Fertility)

खसखसच्या सेवनाने प्रजननशक्तीमध्ये सुधारणा होते. नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या शोधानुसार, खसखसच्या तेलाने फॅलोपियन ट्युब फ्लश केल्याने फर्टिलिटीला मदत मिळते. फॅलोपियन ट्युब हा असा मार्ग आहे जिथून अंडी ही अंडायशापासून गर्भाशयापर्यंत जातात. तर एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार, विटामिन ई प्रजननशक्तीत सुधारणा आणते. त्यामुळे प्रजनन काळात विटामिन ई युक्त आहार सेवन करण्याचा महिलांना सल्ला देण्यात येतो. यामध्ये खसखसच्या नावाचादेखील समावेश आहे. खसखस हे विटामिन ई चा चांगला स्रोत असल्यामुळे खसखसचे सेवन हे महिलांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्याचे काम करते. 

हाडांसाठी उपयुक्त (For Bones)

हाडांसाठीदेखील खसखस चे फायदे होतात. खसखसमध्ये असणारे कॅल्शियम, जिंक आणि कॉपर हे आरोग्यासाठी पोषक आहेत. ही सर्व पोषक तत्वे हाडांना मजबूती देऊन विकास करण्यासाठी मदत करतात. एका अभ्याासानुसार, कॅल्शियम सप्लिमेंटसह कॉपर आणि जिंक एकत्र करून हाडांचे नुकसान रोखण्यापासून प्रभावी काम करतात. हाडे निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फोरस दोन्ही योग्य प्रमाणात शरीराला आवश्यक असते. खसखस हे फॉस्फरसने समृद्ध असल्यामुळे हाडांसाठी योग्य ठरते.  

ADVERTISEMENT

मेंदूसाठीही फायदेशीर (Brain Benefits)

मेंदूच्या विकासासाठी खसखस खाण्याचे फायदे मिळतात. यामध्ये असलेले कॅल्शियम, लोह आणि कॉपर ही पोषक तत्व मेंदूचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामधील कॅल्शियम न्युरोनल फंक्शन संतुलित करण्यासह तुमची स्मरणशक्ती वाढण्यासही मदत करते. तसंच मेंदूची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी तुम्हाला खसखस आपल्या आहाराता समाविष्ट करून घेण्याची गरज आहे. 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (Immune System)

आरोग्य चांगले राखण्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविणे हे अत्यंत गरजेचे आहे. खसखसमधील जिंक आणि लोह हे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. लोह हे शरीरातील ऑक्सिजन वाढविण्याचे आणि प्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करते. तर जिंक हे शरीरातील कोशिकांच्या वृद्धीसाठी आणि विकासासाठी मदत करते. 

हृदयासाठी फायदेशीर (Benefits For Heart)

खसखस डाएटरी फायबरयुक्त असते. याचे प्रमाणे अधिक असल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला होणाऱ्या त्रासापासून रोखते. एका अभ्यासानुसार, खाद्यपदार्थांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी खसखस तेलामुळे (Poppy Seeds Oil) कमी करण्यात येऊ शकते. त्यामुळे हृदयासंबंधित रोगांना दूर ठेवायचे असेल तर आहारात खसखस तेलाचा समावेश करून घ्या. याशिवाय खसखमध्ये असणारे ओमेगा – 6 फॅटी अॅसिड हृदयाच्या कोणत्याही रोगापासून तुमचे रक्षण करते. 

ऊर्जेचा चांगला स्रोत (To Get More Energy)

शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह वाढविण्यासाठी खसखसची मदत मिळते. हा खाद्यपदार्थ कार्बोहायड्रेटसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे, ज्यामुळे ऊर्जेचा आवश्यक स्रोत शरीराला मिळतो. शरीरातील ऊर्जेची पूर्तता करण्यासाठी आणि ऊर्जेचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही खसखसचे सेवन करू शकता. तुम्ही नियमित दुधातून अथवा खाद्यपदार्थामध्ये खसखसचा वापर करून याचा समावेश करून घ्या. 

ADVERTISEMENT

बद्धकोष्ठतेवर गुणकारी (For Constipation)

बऱ्याच जणांना बदलत्या लाईफस्टाईलमुळे बद्धकोष्ठतेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र तुम्हाला असा त्रास असेल तर तुम्ही खसखसचे सेवन करणे गरजेचे आहे. खसखसमध्ये असलेले फायबर हे तुम्हाला या त्रासपासून सुटका मिळवून देण्यास मदत करते. फायबर हे पचनतंत्रासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळेच बद्धकोष्ठतेसाठी हे मुख्य आणि आवश्यक पोषक तत्व समजण्यात येते. फायबर हे स्टूल मुलायम करून पोट स्वच्छ करण्यास आणि मल त्याग करण्यास मदत करते. 

मधुमेहावरदेखील याचा उपयोग (Diabetes)

मधुमेहाने पीडित असणाऱ्या व्यक्ती या खसखसचे सेवन करू शकतात. यामध्ये फायबर असून टाईप 2 च्या मधुमेहावर याचा चांगला परिणाम होतो. वास्तविक यावर अधिक शोध चालू आहे. खसखसमध्ये असणारे मॅग्नेशियम मधुमेहाचा धोका वाढण्यापासून नियंत्रण आणते. तसंच खसखसच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो. मात्र याचे अति सेवन करू नका. कारण अत्याधिक सेवनाने पोटामध्ये त्रास होऊन डायरियाचा त्रास होऊ शकतो. 

श्वसन स्वास्थ्यासाठी (Respiratory Health)

दम्याच्या रूग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक, तज्ज्ञांचे मत

खसखसमधील जिंक श्वसन स्वास्थ्यासंबंधित समस्यांमध्ये मुख्य भूमिका निभावतो. श्वासनलिकेत निर्माण झालेली सूज आणि विषारी पदार्थांच्या विरोधात सायटो प्रोटेक्टिव्ह रूपात हे कार्य करते. खसखसमधील जिंक फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पोषक तत्व मानण्यात येते. तसंच दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठीही याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे श्वसन स्वास्थ्यासाठी याचा समावेश करण्यात यावा. 

खसखसचा उपयोग कसा करावा (How To Use Poppy Seeds)

Poppy Seeds In Marathi

भारतात विभिन्न राज्यांमध्ये खसखसचा उपयोग पदार्थांमधील स्वाद वाढविण्यासाठी करण्यात येतो. खसखसचा वापर करण्यापूर्वी व्यवस्थित निवडून घ्या. त्यामध्ये कोणताही दगड राहिला नाही ना याची तपासणी करा. खसखसचे बी वापरण्यापूर्वी कमीत कमी दोन तास पाण्यात अथवा दुधात भिजवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका, सुकवा आणि मग त्याचा वापर करा. 

ADVERTISEMENT
  • अन्य मसाल्यांसह रस्सा जाडसर बनविण्यासाठी भिजलेल्या खसखसचा उपयोग करण्यात येतो 
  • टोस्टेड खसखसचा उपयोग ब्रेड, रोल्स, भाजी अथवा सलाडवर गार्निशिंग करण्यासाठी करण्यात येतो
  • दिवाळीत अनारसा रेसिपी करत असाल तर यामध्ये जास्त प्रमाणात याचा उपयोग होतो 
  • बंगालमध्ये याचा अनेक पदार्थांमध्ये उपयोग होतो. याचे कटलेट्स, आलू पोस्तो, पोस्तो बोडा असे पदार्थ बनविण्यात येतात 
  • आंध्रप्रदेशमध्ये खसखसच्या पेस्टचा उपयोग मसाल्याच्या स्वरूपात करण्यात येतो. मांस, मच्छी आणि भाज्यांमध्ये याचा वापर करण्यात येतो 
  • याशिवाय खसखसचा वापर पेस्ट्री बनविण्यासाठीही करण्यात येतो

खसखस वापरून तुम्ही या दोन झटपट रेसिपीदेखील करू शकता ट्रायः 

खसखस चहा 

साहित्य 

  • 250 ग्रॅम खसखस 
  • तीन कप गरम पाणी 
  • दोन चमचे लिंबाचा रस 
  • दोन लीटर स्टीलची रिकामी बाटली 

बनविण्याची पद्धत 

  • खसखस तुम्ही बाटलीमध्ये घाला आणि त्यानंतर वरून गरम पाणी आणि लिंबाचा रस पिळा
  • बाटली बंद करून साधारण 2 मिनिट्स हलवा आणि नंतर हे पाणी गाळून कपात घ्या 
  • तुम्ही हा खसखसचा चहा पिऊ शकता 

खसखस ब्रेड

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 3 कप गव्हाचे पीठ 
  • दीड चमचा मीठ 
  • दीड चमचा बेकिंग पावडर 
  • 3 मोठे चमचे खसखस 
  • एक चमचा बटर 
  • पाव कप वनस्पती तेल 
  • 3 अंडी 
  • एक कप दूध 
  • अडीच कप साखर
  • दीड चमचा व्हॅनिला इसेन्स
  • दीड चमचा बदामाचा रस 

बनविण्याची पद्धत 

  • ओव्हन तुम्ही 350 F वर प्रिहीट करा 
  • पॅनच्या आत बटर लावा आणि सर्व साहित्य पॅनमध्ये मिक्स करून ओव्हनमध्ये हे मिश्रण ठेवा 
  • एक तास बेक करा. मध्ये मध्ये तपासत राहा जेणेकरून ब्रेड जळत तर नाही ना याची खात्री करून घ्या

खसखसने होणारे नुकसान (Side Effects Of Poppy Seeds In Marathi)

Side Effects of Poppy Seeds In Marathi

खसखस गुणकारी आहे यामध्ये नक्कीच कोणाचेही दुमत असणार नाही. पण याचे अत्याधिक सेवन मात्र त्रासदायक ठरू शकते. अलर्जी, बद्धकोष्ठता, मळमळणे आणि सुस्ती येणे हे याचे दुष्परिणाम आहेत. खसखसचा उपयोग तुम्ही औषधी स्वरूपात प्रमाणात करू शकता. पण अधिक प्रमाणात याचे सेवन केल्यास, तुम्हाला या परिणामांना सामोरे जावे लागते. खसखसचा कोणताही दुष्परिणाम जाणवला तरी त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. खसखसचा गुण किती काळ टिकतो ?

खसखस जर तुम्ही एअरकंटेनर डब्यात बंद करू रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलात तर साधारण 6 महिने खसखस टिकून राहते. बाहेर ठेवल्याने यातील गुणवत्ता कमी होते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ठेवा. 

ADVERTISEMENT

2. लहान मुलांना खसखस देता येतं का ?

चांगल्या दर्जाचे खसखस मुलांना योग्य प्रमाणात देता येऊ शकते. मात्र याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही ना याची काळजी आणि लक्ष ठेवणे हे तुमचे काम आहे. 

3. खसखसने गुंगी येते का ?

ज्या खसखसमध्ये अंमली पदार्थयुक्त घटक असल्यास अशा खसखसमुळे गुंगी येते. मात्र बाजारात मिळणारे खसखस हे असे नसते. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. पण खसखस अति खाल्ल्याने सुस्ती येऊ शकते. 

ADVERTISEMENT
16 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT