हेअर स्टीम म्हणजे केसांना वाफ देणे. ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामुळे तुमच्या स्काल्पमधील छिद्रे मोकळी होतात आणि केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते. जेव्हा केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात अथवा निस्तेज होतात तेव्हा तुमच्या केसांना अधिक पोषणाची गरज असते. अशा वेळी केसांना लावलेलं तेल अथवा हेअर क्रीम मुळांमध्ये चांगलं मुरण्यासाठी केसांना वाफ देणं फायद्याचं ठरतं. यामुळे तुमच्या केसांच्या मुळांमधील रक्तप्रवाह सुधारतो आणि केस मऊ, चमकदार होतात. यासाठी जाणून घ्या हेअर स्टीम घेण्याचे फायदे
केस मऊ, मुलायम होतात –
जरी तुमचे केस कोरडे असतील तर केसांवर काही प्रमाणात वाफ घेण्यास काहीच हरकत नाही. कारण यामुळे तुमचे केस मऊ होऊ शकतात. वाफ देण्यामुळे केसांना लावलेलं तेल अथवा क्रीम तुमच्या केसांच्या मुळांमध्ये चांगल्या पद्धतीने मुरतं. ज्यामुळे केस नैसर्गिक पद्धतीने मऊ आणि चमकदार होतात.
स्काल्प स्वच्छ राहण्यास मदत होते –
केस स्वच्छ आणि निरोगी असण्यासाठी तुमच्या केसांची मुळे आणि त्वचा म्हणजेच स्काल्पदेखील स्वच्छ असायला हवा. केसांची आणि स्काल्पची स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही नियमित केसांना वाफ देण्याची गरज आहे. जरी वरवर स्काल्प स्वच्छ वाटत असला तरी वाफ देण्याने तो मुळापासून स्वच्छ होतो.
केसांची मुळे मजबूत होतात –
केसांना नियमित वाफ देण्यामुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होऊ शकतात. कारण केसांच्या मुळांमध्ये रक्तपेशी असतात. ज्यामधून तुमच्या हेअर फॉलिकलला ऑक्सिजनचा पूरवठा होत असतो. जर केसांचे रक्ताभिसरण व्यवस्थित झाले तर केसांना योग्य ऑक्सिजनचा पूरवठा होतो. रक्ताभिसरण कमी होऊ लागले की केस निस्तेज आणि कमजोर होतात. केस गळण्याचे हे एक महत्वाचे कारण असू शकते. यासाठीच नियमित वाफ द्या आणि केसांची मुळे मजबूत करा.
Shutterstock
केसांमधील कोंडा कमी होतो –
केसांमधील कोंडा कमी करण्यासाठीदेखील तुम्ही केसांना वाफ देऊ शकता. कारण कोंड्याचे मुख्य कारण तुमचा ड्राय स्काल्प असू शकतो. वाफ दिल्यामुळे स्काल्प हायड्रेट होतो आणि त्याला योग्य पोषण मिळते. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी वाफ घेणं फायदेशीर ठरेल. मात्र केसांना वाफ देण्याआधी त्यांना चांगल्या तेलाने मसाज करा.
कशी द्याल तुमच्या केसांना वाफ –
हेअर स्टीम अथवा केसांना वाफ देण्यासाठी तुम्ही हेअर स्टीमिंग मशीनचा वापर करू शकता. पण जर तुमच्याकडे हेअर स्टीमिंग मशीन नसेल तर गरम टॉवेलने तुमचे केस शेकवा. यासाठी केसांना तेलाने मसाज करा आणि गरम पाण्यात बुडवून पिळलेला टॉवेल पंधरा ते वीस मीनिटे केसांवर गुंडाळून ठेवा. केसांना वाफ देताना घरातील पंखा अथवा एसी बंद ठेवा. त्यानंतर पंधरा मीनिटांनी केस शॅम्पू करा. आठवड्यातून एकदा हेअर स्टीम घेण्यास काहीच हरकत नाही. पार्लरमध्ये हेअर स्पा करताना तुमच्या केसांना मशीनद्वारे हेअर स्टीम दिली जाते. मात्र आम्ही सांगितलेल्या या सोप्या पद्धतीने तुम्ही घरीच तुमच्या केसांना हेअर स्पा आणि हेअर स्टीम देऊ शकता.
Shutterstock
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अप्परलिप्स करा आता घरच्या घरी, सोपी पद्धत
स्मूथ आणि सिल्की केस हवे, मग हेअर कंडिशनर लावताना टाळा ‘या’ चुका
चेहऱ्यावर वाफ घेण्याचे हे आहेत अफलातून फायदे (Benefits Of Steaming Face In Marathi)