सुंदर, मुलायम घनदाट केस सगळ्यांनाच हवे असतात. यासाठी केसाची काळजी प्रत्येकजण अगदी आवर्जुन घेते. म्हणजे केसांना तेल लावण्यापासून ते मसाज करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी छान आवडीच्या आणि सोयीस्कर पडणाऱ्या टिप्स सारख्या तंतोतंत केल्या जातात. पण इतकं सगळं करुनही काहींना हवा तसा केसांचा पोत मिळत नाही. काहींच्या केसांचा सतत गुंता होतो. कितीही केस विंचरले तरी मानेच्या भागाकडील केसांचा गुंता सुटता सुटत नाही. अशावेळी जर तुम्ही कंगवा वापरत असाल तर तुम्हाला हेअर ब्रश वापरण्याचे फायदे माहीत हवेत. म्हणूनच आज आपण हेअरब्रश विषयी माहिती घेणार आहोत. मग करुया सुरुवात
केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स
कंगवा आणि हेअर ब्रश
shutterstock
कंगवा आणि हेअर ब्रशमधील फरक तुम्हाला नक्कीच माहीत असेल. कंगवा हा चपटा असतो. त्यावर कोणत्याही प्रकारचे ब्रीसलसारखे दात नसतात. तर ब्रश म्हणजे एका गोलाकार किंवा चपच्या पृष्ठावर प्लास्टिकचे बारीक बारीक दात असतात. आता हा सर्वसाधारण फरक तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल.
प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी
कंगवा वापरताय
shutterstock
खूप जणांना ऑफिसमध्ये किंवा प्रवासात कॅरी करण्यासाठी कंगवा हा बेस्ट वाटतो.हल्ली तर कंगव्याचे इतके प्रकार मिळतात की, केस पटकन विंचरायचे झाले तरीही पाकिटातून कंगवा काढून तो केसांवर फिरवला जातो. पण कंगवा वापरताना तुमचे केस तुटण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही कितीही मऊ कंगवे वापरले तरी तुमचे केस तुटतात. केसांचा गुंता कंगव्याने पटकन निघत नाही. गुंता काढताना स्काल्प दुखावली जाते. शिवाय हा गुंता कोरड्या केसाने काढताना केसांना त्रास होतो. केसांना तेल लावल्याशिवाय केसांचा गुंता सुटत नाही. त्यामुळे केसांचा गुंता काढणे कंगव्यामुळे फारच कठीण असते.
केसांचा गुंता काढण्यासाठी हेअर ब्रश म्हणून आहे बेस्ट
shutterstock
- केसांचा गुंता काढण्यासाठी तुम्हाला हेअरब्रश वापरताना संबंध केस विंचरता येतात.
- केसांचा गुंता एकाचवेळी हेअरब्रशने सोडवता येतो.
- केसांचा गुंता काढताना तुम्हाला दुखतही नाही.
- तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तुम्हाला हेअर ब्रश घेता येतो. म्हणजे तुम्हाला फ्लॅट किंवा राऊंड असा हेअरब्रश घेता येतो. पण तुम्ही फ्लॅट ब्रश घेतल्यास उत्तम
- हेअर ब्रशमधील सॉफ्ट ब्रिसल्स इतके मऊ असतात की ते तुमच्या केसांमधून फिरताना केस अधिक वॉल्युम देतात. त्यामुळे तुमचे केस अधिक फुललेले आणि मोकळे दिसतात.
- तुमच्या केसांचा प्रकार कोणताही असला तरीदेखील तुम्ही याचा वापर करु शकता कारण तुमच्या केसांचा चमक देण्याचे काम हेअरब्रश करते. एकाचवेळी तुमचे केस अगदी व्यवस्थित विंचरल्यामुळे तुमच्या केसांचा गुंता अगदी छान सुटतो.
- आता जर तुम्ही तुमच्या केसांसाठी काही योग्य काही हवे असेल तर तुम्ही तुमच्या केसांसाठी आताच हेअर ब्रश घ्या.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.