ADVERTISEMENT
home / Dry Skin
Dry Skin Care Tips In Marathi

कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Care Tips In Marathi)

सगळयांचीच इच्छा असते की, त्यांची त्वचा सुंदर, लवचिक आणि निरोगी असावी. पण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार हा वेगळा असतो. काहींची त्वचाही तेलकट असते काहींची कोरडी असते काहींची नॉर्मल तर काहींची मिश्र असते. प्रत्येक प्रकार हा एकमेकांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे साहजिक आहे की, प्रत्येक त्वचेची काळजीही वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते.

ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना आपल्या त्वचेची काळजी घेण्यात खूपच समस्या येतात. कारण कोणंतही क्रीम किंवा मॉईश्चराईजर जास्त काळाकरिता त्यांच्या त्वचेवर टीकत नाही. जी खूपच मोठी समस्या आहे. कोरड्या त्वचेसाठी लोकं अनेक प्रकारची ब्यूटी प्रोडक्टस वापरतात, पण काही कालावधीनंतर त्याचा परिणाम दिसेनासा होतो आणि त्यांची त्वचा पुन्हा कोरडी होऊ लागते. त्यामुळे त्यांना कळत नाही की, नक्की काळजी कशी घ्यावी. जर कोरड्या त्वचेसाठी बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सऐवजी जर घरगुती उपायांचा वा सोप्या ब्युटी टिप्सचा वापर केल्यास ते स्वस्तही पडेल आणि दीर्घ कालावधीसाठी तुमची त्वचा सुंदर राहण्यास एक चांगला पर्याय आहे.

कोरडी त्वचा कशी ओळखावी (How To Identify Dry Skin In Marathi)

कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Home Remedies In Marathi)

ADVERTISEMENT

सर्वोत्तम घरगुती मॉईश्चराईजर (Moisturizers For Dry Skin Care Tips In Marathi)

कोरड्या त्वचेबाबत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

dry skin care tips in marathi

हे खरं आहे की, कोरडी त्वचा आकर्षक दिसत नाही. ब्युटी एक्स्पर्टच्या अनुसार काहीवेळा कोरडी त्वचा ही कधीकधी आनुवंशिकही असते. पण जास्तकरून कोरडी त्वचा पर्यावरणातील प्रदूषणांमुळेही त्वचेतील आर्द्रता कमी होते. वाढत्या वयानुसार त्वचा कोरडी होत जाते. कारण नैसर्गिकरित्या त्वचेतील तेल वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जातं आणि त्वचेचा कोरडेपणा वाढतो. आवश्यक प्रमाणात पाणी न प्यायल्यास ही त्वचा कोरडी होते. ज्यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा आणि त्वचेवर सुरकूत्या येऊ लागतात. पण काळजी करण्याचं कारण नाही, त्वचा पुन्हा कोमल आणि चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपायही खूप फायदेशीर ठरतात.

वाचा – त्वचा रोगाचे प्रकार आणि त्वचा रोग घरगुती उपाय

ADVERTISEMENT

कोरडी त्वचा कशी ओळखावी (How To Identify Dry Skin In Marathi)

ड्राय स्कीन किंवा शुष्क त्वचामध्ये आर्द्रतेच्या कमतरतेमुळे त्वचेमधील फॅटी अॅसिड (लिपीड) कमी होत जातं. जे त्वचेचा ओलावा कायम राखण्यास करतं आणि त्वचा कोमल ठेवत असतं.

Dry Skin In Marathi

कोरड्या त्वचा होण्याची काही कारणं (Reason For Dry Skin)

– ऋतूतील बदलांमुळे विशेषतः थंडी आणि कोरड्या हवामानात
– गरम पाण्याने आंघोळ केल्यावर
– स्विमींग पूलमधील क्लोरीनयुक्त पाण्याने
– साबण आणि डिटर्जंटमधील रसायनांमुळे
– सोरायसिस, एक्झिमा इ.
– त्वचेची स्वच्छता करणाऱ्या प्रोडक्ट्सच्या अधिक वापराने
– याशिवाय कॉलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, अॅलर्जी आणि पिंपल्सची औषधं घेतल्यानेही त्वचा कोरडी होऊ शकते.  

शुष्क किंवा कोरड्या त्वचेवर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. कारण अनेकदा डर्मेटाईटीस कोरडी त्वचा होण्याच कारणही असू शकतं. त्यामुळे कोरड्या त्वचेची खाली दिल्याप्रमाणे काळजी घेतल्यास नक्कीच फायदा होईल. Dry skin care tips in marathi –

1. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर गरम पाण्याने आंघोळ करणं टाळा. जास्त काळ पाण्यात राहिल्याने किंवा पावसात भिजल्यानेही त्वचा कोरडी होते. त्यामुळे दररोज फक्त 5 ते 10 मिनिटं आंघोळ करा.
2. मॉइश्चराईजरचा वापर तर कराच पण त्यासोबतच सौम्य क्लींजर किंवा शॉवर जेलचाही वापर करा. हार्ड क्लींजरऐवजी अनसेंटेड आणि माईल्ड सोप क्लींजरचाही वापर करा.
3. जेव्हा तुमची त्वचा ओली असेल तेव्हा मॉईश्चराईजर लावा. आंघोळ केल्यानंतर नेहमी त्वचा हळूवार पुसा. तुमच्या त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी आंघोळ केल्यावर तीन ते पाच मिनटाच्या आत मॉईश्चराईजर लावा.
4. तुमचा चेहरा दिवसातून वारंवार धुवू नका. शक्य असल्यास फक्त रात्री चेहरा धुवा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील दिवसभरातील धूळ निघून जाईल आणि त्वचा कोरडीही पडणार नाही.
5. ओठांसाठी चांगल्या लिपबामचा वापर करा. त्या लिपबाममध्ये पेट्रोलटम, पेट्रोलिअम जेली आणि मिनरल ऑईल असलं पाहिजे.
6. थंडीच्या काळात बाहेरील थंड वातावरणाशी संपर्क टाळण्यासाठी चेहरा नेहमी स्कार्फने झाकून घ्या. पण लक्षात घ्या तुमच्या त्वचेला स्कार्फच्या कापडाचा आणि ते वापरण्यासाठी वापरलेल्या डिटर्जंटचाही त्रास होऊ शकतो.

ADVERTISEMENT

कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Home Remedies In Marathi)

कोरडी त्वचा कशी ओळखावी

कोरडी त्वचा उपाय घरच्या घरी करून पाहा हे खालील सांगितलेले फेस मास्क आणि मॉईश्चराईजर्स. 

कोरड्या त्वचेसाठी घरगुती फेसमास्क (Face Masks For Dry Skin)

फेस मास्क आणि घरगुती फेसपॅक त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हे त्वचा स्वच्छ तर करतातच त्यासोबतच डेड स्कीनही काढून टाकतात. यामुळे त्वचा स्वच्छ, मुलायम आणि तरूण दिसते आणि रक्तसंचारही वाढतो. फेसमास्क हे अनेक प्रकारचे असतात जे त्वचेच्या प्रकारामुळे आणि ऋतूप्रमाणे लावले जातात. आजकाल फळांचे आणि भाज्यांचे फेसमास्क प्रचलित आहेत. पाहूया घरच्याघरी कोरड्या त्वचेसाठी बनवता येणारे काही फेसमास्क.

कोरडी त्वचा उपाय

1. मिल्की वे फेस मास्क (Milky Way Face Mask)

दूधातील मॉईश्चरायजिंग घटकांचा फायदा घ्या. दूधामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स, व्हिटॅमीन बी, प्रोटीन्स आणि मिनरल्स असतात. या मास्कसाठी 7 ते 8 भिजवलेले बदामाचा वापर करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर वाटलेले बदाम 3 चमचा कच्च्या दूधात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हे आठवड्यातून तीनदा केल्यास त्वचा मऊ आणि मुलायम होते.

2. कमालीचं केळं (Banana Face Mask)

केळ + ऑलिव्ह ऑईल + मध = सुंदर त्वचा! या होममेड फेशियलसाठी केळं कुस्करून त्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि किंचित मध घाला. केळ हे तुमच्या त्वचेला मॉईश्चराईज करतं आणि मध ते मॉईश्चर लॉक करतं. आठवड्यातून दोनदा तुमच्या चेहऱ्यावर वापरल्यास त्वचेवर जणू जादूच होईल.

ADVERTISEMENT

3. केशराची जादू (Saffron Skin Magic)

केशर आणि क्रीम एकत्र केल्यावर अप्रतिम मास्क तयार होतो. जो तुम्हाला देतो चमकदार त्वचा. 2 चमचे मिल्क क्रीम आणि 4 ते 5 भिजवलेल्या केशराच्या काड्या घ्या. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून तीनदा वापरून चमकदार त्वचा मिळवू शकता.

सर्वोत्तम घरगुती मॉईश्चराईजर (Moisturizers For Dry Skin Care Tips In Marathi)

ड्राय स्कीन म्हणजेच कोरडी त्वचेसाठी माॅईश्चराईजर हे पोषणाचं काम करतं. त्वचेला आवश्यक ओलावा देण्याचं काम मॉईश्चराईजर करतं. हे फक्त मुलींच्याच नाहीतर मुलांच्या त्वचेसाठीही चांगल आहे. मॉईश्चराईजरमुले तुमची त्वचा निरोगी आणि हायड्रेट राहते. असं म्हटलं जातं की, त्वचेला अंतर्गतरित्या ओलावा पाण्याने मिळतो तर बाहेरील कोरडेपणा दूर करण्याचं काम मॉईश्चराईजर करतं, ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. मॉईश्चराईजर त्वचेत खोलवर जातं. मॉईश्चराईजर आपल्या रोजच्या दिनचर्येत सामील केल्यास तुमच्या चेहऱ्यावर वेळेआधी सुरकुत्या येणार नाहीत. खासकरून ज्या लोकांची त्वचा कोरडी असते त्यांच्यासाठी तर मॉईश्चराईजर वरदान आहेत. तसं तर बाजारात अनेक कोरड्या त्वचेसाठी अनेक मॉईश्चराईजर्स मिळतात पण तुम्ही हवं असल्यास घरगुती पद्धतीने त्वचेला मॉईश्चराईज करू शकता. 

1. मध (Honey)

मध (Honey)

मध हे खूपच चांगल क्लींजर आणि मॉईश्चराईजर आहे. याची विशेष बाब म्हणजे मधाच्या वापराने त्वचा कोमल आणि चमकदार होते. दोन चमचे मधात 8 चमचे गुलाब जल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुरू द्या. काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा धूवून टाका.

2. नारळाचं दूध (Coconut Milk)

नारळाचं दूध

कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाचं दूध दूध त्वचेत खोलवर जाऊन मॉईश्चराईज करून पोषण देतं. कोकोनट मिल्कच्या वापराने अनेक तास तुमची त्वचेतील आर्द्रता कायम राहते. नियमितपणे सकाळा त्वचेला नारळाचं दूध लावल्यास संध्याकाळपर्यंत त्वचेची आर्द्रता कायम राहते.

ADVERTISEMENT

वाचा – त्वचेचा ग्लो वाढवणारे हे पदार्थ नक्की असू द्या आहारात

3. ऑलिव तेल (Olive Oil)

ऑलिव तेल

ऑलिव्ह ऑईलचा अनेक वर्षांपासून नैसर्गिक मॉईश्चराईजर म्हणून वापर केला जातो. यात असलेलं अँटीऑक्सीडंट आणि नैसर्गिक एसिड उन्हातून उत्सर्जित होणाऱ्या युवी किरणांपासून त्वचेचं रक्षण करतात. याच्या वापरासाठी फक्त ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब आणि लंवेडर एसेंशिअल तेलाचे दोन थेंब आंघोळीच्या पाण्यात घालावे. या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा मॉईश्चराईज राहते. याशिवाय झोपण्याआधी तुमचा चेहरा धूवूनही तुम्ही ऑलिव्ह ऑईल लावू शकता. असं केल्याने सकाळी उठल्यावर तुमची त्वचा चमकदार दिसते.  

4. शिआ बटर (Shea Butter)

शिआ बटर

जुन्या काळी शिआ बटरचा वापर हा मॉईश्चराईजर म्हणून केला जात असे. शिआ बटर व्हिटॅमीन ए चा चांगला स्त्रोत आहे. हे व्हिटॅमीन कोरड्या त्वचेतील आर्द्रता कायम ठेवतं. तसंच सनबर्न आणि त्वचेसंबंधित इतर समस्या कमी करण्यातही मदत करतं. यात फॅटी अॅसिड्स ही असतात. जे तुमच्या त्वचेला तारुण्यमय ठेवण्यात मदत करतात.

5. केळ (Banana)

केळ

केळ हे फक्त शरीरासाठीच चांगलं आहे असं नाहीतर ते तुमच्या त्वचेसाठीही उपयुक्त आहे. केळ हे चांगल मॉईश्चराईजर आहे. केळ्यामध्ये व्हिटॅमीन सी, ए, पॉटेशिअम, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्सचे भरपूर गुण असतात. जे तुम्हाला कोरड्या त्वचेपासून मुक्ती तर देतातच पण त्वचेचा अनेक प्रकारे फायदाही करतात.

ADVERTISEMENT

6. अवकॅडो (Avacado)

अवकॅडो

सर्वात आधी अवकॅडोचे छोटे छोटे तुकडे करून त्यातील गुठळ्या काढून टाका. आता तो गर मिक्सरमध्ये चांगला वाटून घ्या. नंतर या मिश्रणात एक चमचा मध, एक चमचा लिंबूचा रस आणि अर्धा कप दही घाला. मग चांगल मिक्स करून घ्या. साधारण अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा आणि मग चेहऱ्याला लावा. अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धूवून टाका. चेहरा धुतल्यावर तुम्हाला मिळेल जास्त मऊ आणि मुलायम स्कीन जी कधीच कोरडी वाटणार नाही.

7. कोरफड (Aloevera)

कोरफड

कोरफड हे एक नैसर्गिक मॉईश्चराईजर आहे, जे त्वचेतील आर्द्रता कायम ठेवण्यास मदत करतं. कोरफडचा फायदा म्हणजे डेड स्कीन सेल्सना मुलायम करून त्वचा खूपच मऊ बनवण्यात सहायक ठरतं. कोरफडातील अँटी ऑक्सीडंट गुण त्वचेला कोरडं होण्यापासून वाचवतात आणि त्वचेची नैसर्गिक चमकही कायम ठेवतात.

8. ग्लिसरीन (Glycerin)

ग्लिसरीन

ग्लिसरीन त्वचेची आर्द्रता कायम ठेवतं. तुम्हाला फक्त 3 चमचे ग्लिसरीनमध्ये 1 छोटा चमचा मध मिक्स करून चेहऱ्यावर लावायचा आहे. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील आणि जास्त ड्राय पण होणार नाही.

कोरड्या त्वचेबाबत विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

त्वचा कोरडी पडणे उपाय

1. कोरड्या त्वचेची उत्तम काळजी कशी घ्यावी?

ADVERTISEMENT

मॉईश्चराईज, कमी वेळ आंघोळ किंवा शॉवर आणि सेटेंड साबण टाळा. कोरड्या त्वचेची अनेक कारण आहेत पर्यावरणातील बदल जसं उन्हाळा आणि हिवाळा. जास्त काळ स्विमिंग करणं, शॉवर घेणं किंवा आंघोळ करणं. त्यामुळे हे शक्यतो टाळा. थंड पाण्याने कमीत कमी वेळ आंघोळ करा आणि त्वचेची काळजी घ्या.

2. काही औषधांमुळेही त्वचा कोरडी होते का?

हे खरं आहे. हाय ब्लड प्रेशर, एलर्जीसाठी देण्यात येणारी औषधं किंवा अॅक्नेसाठी देण्यात येणाऱ्या औषधांमुळे त्वचा कोरडी होऊ शकते.

3. काही वेळा एखाद्या रोगाने किंवा एलर्जीमुळे त्वचा कोरडी होऊ शकते का?

ADVERTISEMENT

हे चूक आहे. त्वचा ही आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयक आहे. जो नैसर्गिक तेलाचा वापर करून तुम्ही त्यातील आर्द्रता कायम ठेऊ शकता. लिव्हर आणि डायबिटीसच्या काही केसेसमध्ये त्वचा कोरडी होते. पण बहुतेकदा पर्यावरणातील बदलांमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचा कोरडी होते. जास्तकरून कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्ती या निरोगी असतात.

4. मेडीकल टर्ममध्ये कोरड्या त्वचेला काय म्हणतात?

झिरोडर्मा (Xeroderma), ही आहे कोरड्या त्वचेसाठी मेडीकलमध्ये वापरण्यात येणारी संज्ञा.

5. कोरड्या त्वचेसाठी चांगल मॉईश्चराईजर कसं असावं, पातळ की थोड घट्ट?

ADVERTISEMENT

चूक. मॉईश्चराईजर किंवा कुठच्याही क्रीमच्या घट्ट किंवा पातळ असल्याने कोरड्या त्वचेला फायदा होत नाही. त्वचेची योग्य काळजी आणि वेळोवेळी मॉईश्चराईजरच्या योग्य वापराने कोरडी त्वचा मऊ आणि मुलायम राहते.

पुढे वाचा – 

How to Treat Dry Skin on Face in Hindi

17 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT