ADVERTISEMENT
home / मनोरंजन
असा साजरा करा मैत्री दिन, बेस्ट फ्रेंडसोबत पाहा हे भन्नाट मराठी चित्रपट

असा साजरा करा मैत्री दिन, बेस्ट फ्रेंडसोबत पाहा हे भन्नाट मराठी चित्रपट

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जगभरात  मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी 1 ऑगस्टला मैत्री दिन ( Friendship Day ) साजरा केला जाणार आहे. मित्र म्हणजे आयुष्यातील अशी व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही सतत आनंदी असता. मैत्रीमध्ये कोणतीच बंधने नसतात. मैत्री तुमची बुद्धीमत्ता, आर्थिक परिस्थिती, तुमचा स्वभाव पाहून केली जात नाही. मैत्रीचे नाते आपोआप जुळत जाते. मागच्या दोन वर्षांपासून मैत्री दिनाचा आनंद हवा तसा लुटता येत नाही आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मैत्री दिन साजरा करण्यावर काही बंधने आहेत. मात्र आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत घरात धमाल मस्ती करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे यंदा तुमच्या घरात मित्रमैत्रीणींसाठी एक छोटं गेट टुगेदर ठेवा आणि पाहा मैत्रीवर आधारित हे भन्नाट मराठी चित्रपट आणि मित्रांना द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा

अशी ही बनवा बनवी –

चित्रपटांमधील मैत्री म्हटलं की सर्वात आधी जी नावे समोर येतात ती म्हणजे सचिन पिळगावकर, अशोक सराफ… सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला मैत्री आणि प्रेमावर आधारित चित्रपटही सर्वांच्या नक्कीच लक्षात असेल. अशी ही बनवाबनवी हा असा एक लोकप्रिय चित्रपट आहे जो आजही अनेकजण आवडीने पाहतात. हा चित्रपट कुठूनही सुरू केला तरी तुम्हाला पोटभर हसवू शकतो. यातील अनेक डायलॉग मिम्ससाठी वापरले जातात. या चित्रपटात चार मित्रांच्या मैत्रीची  आणि  प्रेमाची गोष्ट दाखवली होती. त्यामुळे यंदा मैत्रीदिन साजरा करण्यासाठी हा चित्रपट पाहण्याची संधी तुम्ही नक्कीच साधू शकता.

दुनियादारी –

2013 साली दिग्दर्शित झालेला दुनियादारी चित्रपटाला  प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारीची गाणी आणि डायलॉग मैत्रीचे उदाहरण म्हणून वापरले जातात. कॉलेजमधील निखळ मैत्री पुढे आयुष्याच्या उतारवयात गेल्यावर डोळ्यासमोरून कशी झरझरत जाते यात दाखवण्यात आलं होतं. हा चित्रपट पाहताना तुम्हाला तुमच्या कॉलेजचे दिवस नक्की आठवतात. या चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर यांनी अक्षरशः जीव ओतला होता. 

क्लासमेट –

मैत्रीवर आधारित आणखी एक लोकप्रिय चित्रपट मैत्री दिनानिमित्त पाहायला हवा तो म्हणजे क्लासमेट… कॉलेज जीवन या चित्रपटात खूप छान पद्धतीने उलगडलं आहे. कॉलेज सोडून खूप वर्ष झाल्यावर, आयुष्यात सेट झाल्यावर पुन्हा जेव्हा कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचे गेट टुगेदर अथवा रियुनियन होते तेव्हा नेमके काय घडते हे यात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली पात्र तुमच्या जीवनातील खऱ्या खुऱ्या मित्रमैत्रिणींशी जुळत असतील तर हा चित्रपट पाहताना तुम्हाला खरंच मजा येईल.

ADVERTISEMENT

फ्रेंडस –

मैत्री कशी असावी हे सांगणारा आणखी एक चित्रपट म्हणजे मैत्री… स्वप्नील जोशी आणि सचित पाटील यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. मैत्री आणि प्रेम जेव्हा निवडावं लागतं तेव्हा मनाची होणारी अस्वस्थता यात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहताना तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले काही सुखद क्षण नक्कीच पुन्हा आठवू लागतील.

फुगे –

स्वप्नील जोशी आणि सुबोध भावेचा फुगे या चित्रपटाबद्दल अनेकांची अनेक मते असतील. पण ज्यांना फक्त मैत्रीच पाहायची असेल त्यांच्यासाठी हा चित्रपट अगदी  बेस्ट आहे. मैत्रीचे  नाते हे सर्वात खास आणि वेगळे असते. नातेवाईक आपल्याला जन्माने मिळतात मात्र मैत्री हा तुमचा चॉईस असतो. त्यात बालमित्र अथवा बालमैत्रिणीला विसरणं खूपच अवघड असतं. या चित्रपटातही अशाच दोन मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

भेटली ती पुन्हा 2” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

श्रेयस तळपदे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर, या मालिकेतून येतोय परत

ADVERTISEMENT

मैत्रीवर आधारित नवी वेबसिरिज, शांतीत क्रांती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

30 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT