‘मुली एकट्या कधी फिरतात का? तुम्हाला काही कळतं की नाही’. मुलींनी बाहेर जायचं म्हटलं की पालकांचं हे अगदी ठरलेलं वाक्य असतं. पण कधीतरी मस्तमौला होऊन एकट्याने फिरायची इच्छा मुलींनाही असते. रोजच्या कटकटीपासून दूर त्यांनाही काहीतरी नव एक्सप्लोअर करायचं असतं. मग मुलगी असले म्हणून काय झाले? तुम्ही अगदी बिनधास्त एकट्याने फिरु शकता. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत. ज्याला तुम्ही अगदी बिनधास्त भेट देऊ शकता. हा आता त्यासाठी थोडं प्लॅनिंग आलं बरं का! Women solo traveler अशी संकल्पना आता देशात रुजू लागली असली तरी एकदम भुरळून जाऊ नका. तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅनिंग करा.
सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय? (What Is Solo Traveling)
shutterstock
आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करुया बरं का! मुळात सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहीत हवं. सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर… तुम्ही एकटे अत्यंत जबाबदारीने तुमचा प्रवास करणे. यामध्ये सगळ्या गोष्टींचे नियोजन तुम्हाला करायचे असते. तुमची आयटनरी तुम्ही ठरवायची असते. पण बॅग भरो निकल पडो’ असे नव्या solo traveller ला करुन अजिबात चालत नाही. जाणार त्या ठिकाणचा अभ्यास नैसर्गिक आपत्ती या सगळ्याचे नियोजन तुम्हाला करणे गरजेचे असते. या सगळ्या गोष्टी अगदी चोख पार पाडल्या की, मग तुम्ही तयार आहात सोलो ट्रॅव्हलिंग साठी.
प्रवासाला जाताना सोबत न्या ‘हे’ घरगुती खाद्यपदार्थ
देशातील 25 बेस्ट ठिकाणं खास सोलो ट्रॅव्हलर महिलांसाठी (25 Places In India For Women Solo Traveler)
आता पाहुया देशातील अशी 25 ठिकाणं ज्या ठिकाणी तुम्ही अगदी बिनधास्त फिर शकता. तुम्ही त्याचे प्लॅनिंग कसे करायला हवे ते देखील पाहा.
1. जयपूर (Jaipur)
‘गुलाबी शहर’ म्हणून जयपूरची ओळख आहे. शिवाय ही राजस्थानच राजधानी आहे. अनेक टुरिस्टसाठी बेस्ट आणि एक्सप्लोअर करण्याचे असे हे ठिकाण आहे. तुम्हाला राजवाडे, महाल, पॅलेस किंवा ऐतिहासिक वारसा असलेल्या गोष्टी पाहण्यात रस असेल तर तुम्ही जयपूरची सहल करु शकता. तसं तर जयपूरमध्ये पाहण्यासारखे फार काही आहे. पण तुम्हाला एखाद्या लाँग वीकेंडला याचा प्लॅन करता येईल. जयपूर फिरण्यासाठी तुम्हाला 3 दिवसांचा कालावधी अगदीच पुरेसा आहे.
वातावरण (Weather): राजस्थान हा वाळवंटाचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसा थोडे गरम होईल. पण रात्रीच्यावेळी मात्र या ठिकाणी गारवा असतो. म्हणून तुम्ही उत्तम जॅकेट कॅरी केलेले बरे. आणि हो सोबत सनस्क्रिनही असू द्या.
काय पाहाल (Places to explore): अंबर पॅलेस, हवा महल, सिटी पॅलेस, जंतर मंतर, जल महाल,अल्बर्ट हॉल म्युझिअम, सिसोदीया हॉल, जव्हार सर्कल
खरेदी कुठे करता येईल (Places for shopping): त्रिपोलिया बाजार, चांदपोले बाजार
कसे जाल (How to go): जर तुमचे बजेट चांगले असेल आणि तुमच्या फिरण्याला अवकाश असेल तर तुम्ही फ्लाईट घेतल्यास फारच उत्तम. जर तुम्हाला वेळ घालवायची इच्छा असेल तर तुम्ही ट्रेननेही प्रवास करु शकता.
अंदाजित खर्च (Estimate): साधारण 5 ते 7 हजार फ्लाईट आणि खरेदी वगळता.
2. गुजरात (Gujrat)
तुम्ही फुडी असाल तर तुम्ही गुजरातला हमखास जायला हवे. गुजरातची राजधानी अहमदाबाद हे खाण्यासाठी फारच प्रसिद्ध आहे. गुजरात वेगवेगळ्या कल्चरसाठी फारच प्रसिद्ध आहे. तेथील स्ट्रीट फूड, चाट हे फारच प्रसिद्ध आहे. शिवाय येथील ठिकाणं ही पाहण्यासारखी आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये इथे वेगळीच धामधूम पाहायला मिळते. शॉपिंगसाठीसुद्धा इथे बरचं काही आहे. आता तुम्हाला गुजरात वाटतो तितका लहान नाही. तुम्ही जर मुख्य गुजरात फिरायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही त्यासाठी योग्य प्लॅनिंग करणे आवश्यक आहे.
वातावरण (Weather): गुजरातला तुम्हाला बऱ्यापैकी सकाळी गरम आणि रात्री थंड वाटेल. उन्हाळ्यात सुती कपडे आणि हिवाळ्यात थंडीचे कपडे घ्यायला विसरु नका.
काय पाहाल (Places to explore): साबरमती आश्रम, सोमनाथ, गिर नॅशनल पार्क, जुनागढ, चंपानेर-पानागढ, अहमदाबाद आणि बरीच ठिकाणं
कसे जाल (How to go): वेळ वाचवण्यासाठी अहमदाबादला सरळ फ्लाईट तुम्हाला घेता येईल.नाहीतर मुंबई सेंट्रलवरुन तुम्हाला ट्रेन मिळेल.
अंदाजित खर्च (Estimate): तुम्हाला 10 हजारांच्या आत ही टूर करता येईल.
3. खजुराहो (Khajuraho)
मध्यप्रदेशमधील टुरिझम हल्ली सगळ्यात पुढे आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मध्यप्रदेशमधील खजुराहो हे ठिकाण टुरिस्टसाठी फारच प्रसिद्ध आहे. तुम्ही इतिहासाचे चाहते असाल तर तुम्हाला या ठिकाणी अनेक मंदिर पाहायला मिळतील. साधारण 1000 वर्ष जुनी अशी ही मंदीर असून यावरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही शोधत असलेली मन:शांती तुम्हाला या ठिकाणी अगदी हमखास मिळू शकेल. त्यामुळे संपूर्ण मध्यप्रदेश जमला नाही तर खजुराहो नक्कीच पाहायला जा.
वातावरण (Weather): खजुराहोमध्ये वातावरण तसं गरमच असतं. तुम्हाला इथे फार काही थंड वाटणार नाही.
काय पाहाल (Places to explore): कंडारिया मंदिर, लक्ष्मण मंदिर, विश्वनाथ मंदिर, धुलादेव मंदिर,
कसे जाल (How to go): खजुराहोला जाण्यासाठी तुम्हाला थेट फ्लाईट आहे. तुम्ही फ्लाईट घेऊ शकता. तेथे गेल्यानंतर तुम्हाला गाडी करता येईल. शिवाय मध्यप्रदेशला जाण्यासाठी ट्रेनसुद्धा आहे.
अंदाजित खर्च (Estimate): 10 ते 12 हजार
4. वाराणसी (Varanasi)
उत्तरप्रदेशमधील अत्यंत धार्मिक ठिकाण म्हणून वाराणसीची ओळख आहे. येथील गंगा नदीत पाप धुण्यासाठी अनेक जण येतात. गंगेचे एकदा तरी दर्शन व्हावे ही प्रत्येक हिंदूची इच्छा असते.त्यासाठीच वाराणसीला पर्यटक येतात. आता तुम्हाला असे वाटेल की, इतक्या धार्मिक ठिकाणी जाण्यात कसलं आलं आहे अॅडव्हेंचर. पण काही ठिकाणं तुम्ही मन: शांती फिरायची असतात. त्यापैकीच वाराणसी एक ठिकाण आहे. तुम्हाला या ठिकाणी घाट, मंदिर असं बरचं काही पाहता येईल. परदेशी पर्यटकांसाठी वाराणसी हे अगदी स्वर्गच आहे. इथे परदेशी पर्यटकांची संख्या जास्त असते.
वातावरण (Weather): येथे वातावरण दमट असते. त्यामुळे तुम्हाला एकतर फार उकडेल किंवा तुम्ही मुंबईतले असाल तर तुम्हाला फार काही वेगळे वाटणार नाही. पण हे वातावरण प्रदुषण विरहीत नक्कीच वाटेल.
काय पाहाल (Places to explore): श्री काशी विश्वनाथ मंदिर, मणिकर्णिका घाट, रामनगर फोर्ट, धमेक स्तुपा, असी घाट आणि असे कित्येक घाट या ठिकाणी आहेत.
कसे जाल (How to go): वाराणसीला तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईट अशा दोन्ही पर्यायांनी जाऊ शकता. तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही फ्लाईटचा पर्याय निवडा.
अंदाजित खर्च (Estimate): साधारण 5 हजार ( फिरण्याचा)
5. मुन्नार, केरळ (Munnar, Kerala)
निसर्गाने नटलेले केरळ ही ट्रव्हलरसाठी पर्वणीच आहे. हिरवाईने नटलेलं केरळ पाहण्यासारखे आहे. तुम्हाला हिरवळ, डोंगर आणि साऊथ इंडियन पदार्थ चाखायचे असतील तर तुम्ही केरळला जायला हवे. केरळमधील मुन्नार हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण आहे. केरळच्या इतर भागांच्या तुलनेत तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आल्हाददायक थंडी जाणवेल. या ठिकाणी तुम्हाला टिरिकल साऊथ इंडियन आणि अन्य खाद्यपदार्थ मिळतील.
वातावरण (Weather): मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण आहे.त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थंड कपडे घेऊन जाणे गरजेचे आहे.
काय पाहाल (Places to explore): मुट्टुपट्टी डॅम,एरवावीकुलम नॅशनल पार्क, अन्नामुडी, पोथामेडी व्यू पॉईंट, अट्टाकुल वॉटरफॉल, टी म्युझिअम
कसे जाल (How to go): तुम्ही फ्लाईट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सगळ्यात जवळचे विमानतळ आहे कोची तेथून बायरोड तुम्हाला 3 तासात मुन्नारला पोहोचता येईल. ट्रेनने तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला कोची किंवा एर्नाकुलम स्टेशनवरुन प्रायव्हेट गाडी किंवा टॅक्सीकरुन जाता येईल.
अंदाजित खर्च (Estimate): 10 ते 15 हजार ( ट्रेन वगळून साधारण आठवडाभराची टूर)
6. हंपी (Hampi)
कर्नाटकामधील हंपी हे ठिकाणही भटक्यांसाठी खास आहे. हंपी हे कर्नाटकातील फार जुने गाव आहे. हंपी हे ठिकाण जुन्या वास्तूंसाठी फारच प्रसिद्ध आहे. तुम्हाला एकट्याने एक्स्पोलअर करायला ही बेस्ट जागा आहे. मध्यतंरी हंपीचे सौंदर्य दाखवणारा एक मराठी चित्रपट आला त्यानंतर हंपीला एक वेगळी ओळख मिळाली. जर तुम्हाला ऐतिहासिक वास्तू पाहायच्या असतील तर तुम्ही हंपीला भेट द्यायला हवी. पहिला राजा हरिहरा यांनी या गावाचा शोझ लावला.
वातावरण (Weather): कर्नाटकामधील तापमान हे दमट आहे. तुम्हाला या ठिकाणी थंडी किंवा असे काही वाटणार नाही. समुद्रसपाटीपासून जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कॉटन कपडेच कॅरी करणे चांगले
काय पाहाल (Places to explore): हेमाकुटा हिल मंदिर, पंपाती विभूती, विजय विठ्ठल मंदिर, मातंग हिल आणि बरेच काही
कसे जाल (How to go): हंपीला तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईट घेऊ शकता. फ्लाईटने जाणार असाल तर जवळचे विमानतळ हुबळी आहे. तुम्हाला एअरपोर्ट आणि हंपी रेल्वेस्टेशनवरुन इच्छित स्थळी जाण्यासाठी गाड्या मिळतील.
अंदाजित खर्च (Estimate): फिरण्याचा खर्च तुम्हाला 10 हजार तरी नक्कीच येईल.
7. शिमला-मनाली (Shimla-Manali)
निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी देवभूमी हिमाचल प्रदेशला तुम्ही भेट द्यायला हवी. शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध असून येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते जून हा काळ येथे जाण्यासाठी चांगला आहे. यालाही ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तुम्हाला शिमला- मनाली असं एकत्र फिरता येईल. तुम्हाला या ठिकाणी मंदिर आणि सगळे पासेस पाहता येईल. शिवाय मनसोक्त खरेदीही तुम्हाला या ठिकाणी करता येईल.
वातावरण (Weather): उन्हाळा असो की हिवाळा तुम्हाला कायमच येथे आल्हाददायक वाटेल.
काय पाहाल (Places to explore): सोलान व्हॅली, रोहतांग पास, बियास कुंड, वशिष्ठ मंदिर,हिडिंबा मंदिर आणि बरीच काही
कसे जाल (How to go): शिमला- मनालीला जाण्यासाठी तुम्ही फ्लाईटचा विचार करत असाल तर तुम्हाला दिल्ली किंवा चंदीगढपर्यंत येता येईल. पुढे तुम्हाला प्रायव्हेट कार किंवा या ठिकाणी जाणाऱ्या बससुद्धा मिळतात. तुम्ही साधारण दुपारची फ्लाईट घेतली की, तुम्हाला संध्याकाळची मनालीसाठी एसी बस पकडता येईल.
अंदाजित खर्च (Estimate): 15 ते 20 हजार साधारण 5 दिवसांसाठी कारण बऱ्याच गोष्टी लांब आहेत.
8. सिक्कीम (Sikkim)
हिमालय भेट ही देखील अनेकांच्या बकेट लिस्टमध्ये असते. संपूर्ण हिमालयाची परिक्रमा करणे शक्य नसेल तर तुम्ही नेपाळ, भूतान, तिबेटने वेढलेल्या सिक्कीमला भेट देऊ शकता. शहरापासून लांब शांतपणा अनुभवायचा असेल तर तुम्ही सिक्कीमला नक्कीच जाऊ शकता. सिक्कीममध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे. येथील स्वच्छता पाहाल तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. येथील शिस्त, प्रेमळ माणसं आणि तिबेटीयन संस्कृती तुम्हाला नक्कीच आवडेल.
वातावरण (Weather): आता हिमालयाच्या जवळ म्हटल्यावर या ठिकाणी थंडी आलीच. पण मध्येच हलक्या सरींचा पाऊस, ऊन, थंडीच्या दिवसात बर्फवृष्टी असे पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही विनचिटर, स्वेटर असे सगळे काही कॅरी करा.
काय पाहाल (Places to explore): गंगटोक, लाचुंग,रुमटेक मॉनेस्ट्री, फ्लॉवर गार्डन, सिक्कीमचा बाजार आणि बरेच काही
कसे जाल (How to go): सिक्कीमला थेट जाण्यासाठी तुम्ही बागडोगरा असा फ्लाईट प्रवास करु शकता. पण या फ्लाईट्स फारच फ्रिक्वेंट असतात. अनेकदा वातावरणाचा परिणाम यावर होतो. जर तुम्ही ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही न्युजलपायगुडी स्टेशनला उतरुन खासगी वाहन करुन जाऊ शकता.
अंदाजित खर्च (Estimate): 15 ते 20 हजार आठवड्याभरासाठी
प्रेगन्सीदरम्यान विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा
9. दार्जिलिंग (Darjeeling)
पश्चिम बंगालमधील दार्जिंलिंग हे राज्य टुरिस्टसाठी फारच प्रसिद्ध आहे. शिवालिक पर्वतरांगामधील हिमालय अशी याची ओळख आहे. भारतात ब्रिटीशांचे राज्य असताना उन्हाळ्यात फिरण्यासाठी ब्रिटीश या ठिकाणी थंडावा मिळवण्यासाठी येत असतं. दार्जिलिंग या शब्दाची निर्मिती द्रोजे ( वज्र) आणि लिंग( वज्राचे ठिकाण) अशी या शब्दाची निर्मिती करण्यात आली. दार्जिलिंगमध्ये माथेरानप्रमाणे मिनी ट्र्न आहे. तिही ब्रिटीशांच्या काळापासून आले. मोठे मोठे चहाचे मळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्हाला या ठिकाणी मस्त फिरता येईल.येथील ठिकाणं तशी जवळ जवळ आहेत.
वातावरण (Weather): आता हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिवसभर थंडी असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासोबत थंड कपडे घेऊन जायला हवे.
काय पाहाल (Places to explore): सक्या मठ, मागडोग मठ, जपानी मठ, रॉक गार्डन, रॉक गार्डन अशी बरीच ठिकाणं या ठिकाणी फिरण्यासारखी आहेत.
कसे जाल (How to go): बागडोगरा विमानतळ दार्जिलिंगपासून 2 तासांच्या अंतरावर आहे. या शिवाय या ठिकाणांहून कलकत्ता सुद्धा जवळ आहे. तुम्ही कलकत्ता- दार्जिलिंग असा प्रवाससुद्धा करु शकता.
अंदाजित खर्च (Estimate): साधारण 15 हजार फिरण्यासाठी
10. चेरापूंजी (Cherapunjee)
जर तुमचा भूगोलाचा अभ्यास चांगला असेल तर मग तुम्ही तुमच्या अभ्यासात चेरापूंजीचे नाव नक्कीच ऐकले असेल. चेरापूंजी हे भरतातील असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो चेरापूंजीला एकदा तरी जाऊन यायलाच हवे. मेघालयातील चेरापूंजी हे महत्वाचे शहर आहे. चेरापूंजीचे नाव बदलून सोहरा असे करण्यात आले आहे.येथील लोक या ठिकाणाला याच नावाने ओळखतात. हे ठिकाण सर्वात उंचावर असल्यामुळे या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. ऑक्टोबर ते मे या कालावधीत तुम्ही या ठिकणी जाऊ शकता.
वातावरण (Weather): चेरापूंजी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे येथील वातावरणात थंडावा असतो. या ठिकाणी वातावरण बऱ्यापैकी थंड असते. त्यामुळे तुम्ही विनचिटर नक्कीच कॅरी करायला हवा.
काय पाहाल (Places to explore): डबलडेकर लिव्हिंग ब्रीज, दावकी, नोकलकाई वॉटरफॉल, मावस्मी केव्हज आणि बरेच काही
कसे जाल (How to go): गुवाहाटी रेल्वेस्टेशन आणि विमानतळावरुन तुम्हाला गाडी करुन चेरापूंजीला जाता येईल. तुम्हाला अनेक खासगी वाहने आणि बस या ठिकाणांहून मिळू शकतील.
अंदाजित खर्च (Estimate): 5 ते 7 हजार रुपये फक्त तेथे फिरण्याचे
11. मणिपूर (Manipur)
भारताच्या पूर्वेला मणिपूर हे राज्य आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी आहे. नागालँड, मिझोराम आणि आसाम या राज्यांचा मणिपूरला विळखा आहे. मणिपूर या शब्दाला अर्थ आभूषणांनी भरलेली भूमी. या राज्यात तुम्हाला डोंगरदऱ्या, नद्या पाहायला मिळतील. येथे अनेक बोली भाषा बोलल्या जातात. या ठिकाणी पाहण्यासारखे बरेच काही आहे.
वातावरण (Weather): येथील वातावरण बऱ्यापैकी थंड असते. येथे प्रसन्न वारे वाहतात. शेती हा येथील प्रमुख उद्योग असल्यामुळे या ठिकाणी सगळीकडे हिरवळ पाहायला मिळेल.
काय पाहाल (Places to explore): इंफाळ नदी, कांग्ला पार्क, गोविंद मंदिर, लोकतक झील, खोंघापत उद्यान, डुगो घाट आणि बरेच काही
कसे जाल (How to go): मणिपूरला जाण्यासाठी थेट अशी काही सोय नाही. तुम्हाला मजल दरमजल करतच या ठिकाणी पोहोचावे लागेल. गुवाहाटी रेल्वेस्टेशन आणि गुवाहाटी विमानतळ या ठिकाणांहून सगळ्यात जास्त जवळ आहे. तुम्ही तेथे पोहोचल्यानंतर इंफाळला जाण्यासाठी बस किंवा अन्य काही सोयी करु शकता.
अंदाजित खर्च (Estimate): 15 ते 20 हजार
12. कुर्ग (Coorg)
कर्नाटकातील कुर्ग हे ठिकाण देखील फारच प्रसिद्ध आहे. जर तुम्ही नेचर लव्हर असाल तर मग तुम्ही कुर्गला जायलाच हवे. कुर्ग हे ठिकाण कोडागू नावाने देखील ओळखले जाते. छान हिरवागार परीसर आणि कॉफीचे मळे तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. शिवाय या ठिकाणालाही ऐतिहासिक वारसा लाभल्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणं येथे पाहायला मिळतील.
वातावरण (Weather): कर्नाटकात असल्यामुळे इथलं तापमान तसं दमटच असतं. तुम्हाला या ठिकाणी थंडी अशी काही फार जाणवणार नाहीच.च
काय पाहाल (Places to explore): अॅबी फॉल, नलकांड पॅलेस, ब्रम्हगीरी पीक, बारापोलो नदी, कावेरी नदी, नागरकोले नॅशनल पार्क
कसे जाल (How to go): ट्रेनने म्हैसूर जंक्शनला उतरुन किंवा विमानाने बंगळुरु विमानतळावर उतरुन तुम्ही पुढे प्रवास करु शकता. हा प्रवास थोडा मोठा आहे. पण तुम्हाला वाटेत आल्हाददायक नजारा पाहता येईल.
अंदाजित खर्च (Estimate): साधारण 15 हजार
13. अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh)
भारताच्या ईशान्य भागाकडे अरुणाचल प्रदेश हे महत्वाचे राज्य आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सगळ्यात आधी सूर्य उगवतो म्हणून त्याला अरुणाचल असे म्हणतात. चीन आणि म्यानमार या देशाला लागून अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश निसर्गाने नटलेला असून तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी पाहता येतील. इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी असून येथील मोठे शहर आहे.
वातावरण (Weather): अरुणाचल प्रदेशला बऱ्यापैकी थंडी असते. येथील तापमान अंशापर्यंत कमी होते. त्यामुळे तुम्हाला थंडीचे कपडे या ठिकाणी घेऊन जायला हवे.
काय पाहाल (Places to explore): रोईंग वाईल्ड लाईफ सेंच्युरी, नामदफा नॅशनल पार्क, तेजू नदी सीला पास, तवांग आणि बरेच काही
कसे जाल (How to go): दिल्ली, मुंबई, कोलकाता या सगळ्या ठिकाणांहून तुम्हाला अरुणाचल प्रदेशला जाण्यासाठी सोयी आहेत. पशीघाट आणि तेजू अशी दोन विमानतळ या ठिकाणी आहेत.
अंदाजित खर्च (Estimate): 15 ते 20 हजार विमानप्रवास सोडून
14. ऋषिकेश (Rishikesh)
तुम्हाला काही अॅडव्हेंचर करायचे असेल तर तुम्ही ऋषिकेशची भेट ही नक्कीच करु शकता. पण अॅडव्हेंचर करण्यासाठी तुम्ही तितके फिट असणेही गरजेचे आहे. गंगा नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण असून भारतीयासांठी गंगा ही नदी फारच पवित्र आहे. एकदा तरी गंगा नदीचे दर्शन घ्यावे असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही ऋषिकेशला एकदा तरी जाऊन या तुम्हाला खरचं खूप आनंद होईल आणि आता अॅडव्हेंचर म्हणाल तर या ठिकाणी तुम्हाला रिव्हर राफ्टींग करता येईल.
वातावरण (Weather): येथे वातावरण दमट असते. त्यामुळे तुम्हाला फार काही वेगळे वाटणार नाही.
काय पाहाल (Places to explore): लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट, परमार्थ निकेतन आश्रम, नीळकंठ मंदिर आणि बरेच काही
कसे जाल (How to go): ऋषिकेशला जाण्यासाठी थेट असा काही पर्याय नाही. तुम्हाला देहरादून मार्गेच या ठिकाणी जावे लागेल. त्यामुळे तुम्ही देहरादूनला विमानाने जा किंवा तुम्ही ट्रेननेसुद्धा जाऊ शकता.
अंदाजित खर्च (Estimate): साधारण 10 हजार
15. तारकर्ली (Tarkarli)
पर्यटकांसाठी कोकण हे देखील निसर्गसौंदर्य ठिकाण आहे कोकणातील लाईफस्टाईल जगण्यासाठी अनेक जण कोकणाला भेट देत असतात. त्यामुळेच या ठिकाणी टुरीझम वाढले आहे. त्यातीलच एक महत्वाचे ठिकाण म्हणजे तारकर्ली. समुद्रातील अनेक अॅक्टीव्हीटीज आणि सी फुड तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करु शकता.
वातावरण (Weather): आता समुद्राच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थोडे उष्ण तरी नक्कीच वाटणार
काय पाहाल (Places to explore): तारकर्ली बीच,समुद्र किनारे, स्कुबा डायव्हिंग आणि येथील बाजार मंदिर तुम्ही फिरु शकता.
कसे जाल (How to go): कोकणात जाण्यासाठी तुम्हाला अनेक गाड्या मिळतील. तुम्हाला मालवणला आल्यानंतर अनेक गाड्या या ठिकाणी मिळतील.
अंदाजित खर्च (Estimate): 5 ते 7 हजार रुपये
16. गोवा (Goa)
आता गोवा म्हटलं की, लोकांना फक्त मजा-मस्ती करण्याचे ठिकाणं वाटते. कारण गोवा म्हणजे कुल ठिकाण असेच आपण कायम म्हणतो. पण तुम्ही एकटेही गोवा अगदी मस्त फिरु शकता. तुम्हाला एकट्याने फिरताना अजिबात त्रास होणार नाही. उलट तुम्हाला येथील ठिकाणं, बाजार अगदी आरामात फिरता येतील. तुम्हाला कंटाळा आला आणि मस्त सी फुड खावेसे वाटले की, तुम्ही बॅग भरुन गोव्याला जाऊ शकता.
वातावरण (Weather): समुद्र किनारा जवळ असल्यामुळे वातावरण या ठिकाणी कायमच दमट असते.
काय पाहाल (Places to explore): समुद्र किनारे, ओल्ड गोवामधील काही प्रसिद्ध ठिकाण, पब (नाईट लाईफ पाहायची असेल तर), क्रुझचा प्रवास
कसे जाल (How to go): दाबोलिम विमानतळ विमान प्रवासासाठी या शिवाय तुम्ही ट्रेनने देखील हा प्रवास करु शकता. गोव्याला जाण्यासाठी अनेक बस आणि ट्रेन आहेत.
अंदाजित खर्च (Estimate): 10 हजार पुरेसे आहेत.
17. महाबळेश्वर (Mahabaleshwar)
महाराष्ट्रातील महाबळेश्वरे हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली स्ट्रॉबेरीची शेती पाहण्यासाठी लोक लांबून येतात. शिवाय वीकेंड प्लॅनमध्ये तुम्हाला करता येण्यासारखी अशी ही टूर असल्यामुळे तुम्ही कधीही ही टूर करु शकता. तुम्हाला या ठिकाणी अनेक चांगली रिसॉर्टस मिळतील. तुम्हाला त्या ठिकाणी निवांत वेळ घालवता येईल.
वातावरण (Weather): मस्त गारवा तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येईल.
काय पाहाल (Places to explore): स्ट्रॉबेरीची शेती, मॅप्रो कंपनी, खूप शॉपिंग या ठिकाणी करता येईल.
कसे जाल (How to go): तुम्हाला जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. महाबळेश्वरसाठी तुम्हाला बस, ट्रेन असा प्रवास करता येईल
अंदाजित खर्च (Estimate): 5 हजार
18. नाशिक (Nashik)
वाईनप्रेमींसाठी नाशिक हे अगदी बेस्ट ठिकाण आहे. शिवाय नाशिक या शहराचा पौराणिक इतिहासही खास आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदी आहे. या राज्याचा थेट संबंध रामायणाशी असल्यामुळे हे राज्य अनेकांसाठी खास आहे. राम आणि सीता या ठिकाणी आल्याचा उल्लेख या ठिकाणी आहे.
वातावरण (Weather): नाशिकमध्ये तुम्हाला दिवसा गरम आणि रात्री आल्हाददायक थंडावा जाणवेल.
काय पाहाल (Places to explore): नाशिक लेणी, मुक्तीधाम मंदिर,गंगापूर धरण, कलाराम मंदिर, सुला वाईन्स,सीता गुफा, सप्तश्रृंगी देवी
कसे जाल (How to go): नाशिकला जाण्यासाठी ट्रेन आणि बस असे अनेक पर्याय आहेत.
अंदाजित खर्च (Estimate): 5 हजार
19. लोणावळा (Lonavala)
मुंबई, पुण्यापासून अगदी काहीच अंतरावर लोणावळा – खंडाळा आहे. खूप जण एकदिवसाच्या पिकनिकसाठीही या ठिकाणी जातात. थंड हवेचे ठिकाण म्हणून या ठिकाणी अनेकदा लोकं जातात. या ठिकाणी अनेक रिसोर्टस असून तुम्ही या ठिकाणी गेला नसाल तर एकदा तरी या ठिकाणाला भेट द्या.
वातावरण (Weather): आल्हाददायक वातावरण, थंडावा, पावसाळ्यात छान हिरवळ
काय पाहाल (Places to explore): भूशी डॅम, कुणे फॉल्स, वॅक्स म्युझिअम, उत्तम चिक्की मिळण्याचे ठिकाण
कसे जाल (How to go): पुणे आणि मुंबईहून जाण्यासाठी ट्रेन आणि भरपूर सोय आहे.
अंदाजित खर्च (Estimate): 3 ते 5 हजार
20. कोलकाता (Kolkata)
बंगाली कल्चर, संगीत आणि गोडाचे चाहते असाल तर तुम्ही कोलकाताला देखील भेट द्यायला हवी. कोलकातामध्ये प्रवास करणे फारच सोपे नआहे. जर तुम्हाला आठवत असेल तर देशात अनेक ठिकाणी ट्राम होत्या. आता फक्त कोलकातामध्येच या ट्राम राहिलेल्या आहेत. येथील मंदिर आणि म्युझिअदेखील पाहण्यासारखे आहे. शिवाय तुम्हाला कॉटनच्या वस्तूंची खरेदी करायची असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता.
वातावरण (Weather): तुम्हाला या ठिकाणी थंड असे कधीच वाटणार नाही. या ठिकाणी तुम्हाला साधारण गरमच होईल. उन्हाळ्यात गेलात तर विचारता सोय नाही
काय पाहाल (Places to explore): व्हिक्टोरीया मेमोरिअल, हावडा ब्रीज,दक्षिणेश्वर कालिका मंदिर, गुडिया हाट आणि बरेच काही
कसे जाल (How to go): नेताजी शुभाषचंद्र विमानतळ किंवा ट्रेनने देखील तुम्ही या ठिकणी जाऊ शकता.या ठिकाणी फिरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग केल्यास फारच उत्तम
अंदाजित खर्च (Estimate): साधारण 15 हजार
21. नैनिताल (Nainital)
उत्तराखंडमधील नैनिताल हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. येथील डोंगररांगा प्रसिद्ध असून या डोंगरामधून तुम्हाला सुंदर दृश्य दिसू शकते. थंडी आणि निसर्गरम्य ठिकाण म्हून ही जागा प्रसिद्ध असून अनेक परदेशी पर्यटकांसाठी ही जागा आकर्ष आहे. म्हणूनच दरवर्षी या ठिकाणी अनेक पर्यटक येतात.सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये एक्सप्लोअर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आहे.
वातावरण (Weather): मस्त गारवा त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी गरम कपडे या ठिकाणी न्यायला हवेत.
काय पाहाल (Places to explore): नैनिताल देवी नंदिर, नैनिताल लेक, मॉल रोड, नैना पीक, स्नो हिला पॉईंट आणि बरेच काही
कसे जाल (How to go): काथागोदाम हे येथील जवळचे रेल्वेस्टेशन असून तुम्ही तेथून प्रवास करु शकता. दिल्ली, कोलकाता वरुन तुम्हाला बससेवा ही मिळेल. दिल्लीवरुन विमानाने प्रवास करुनही तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
अंदाजित खर्च (Estimate): 15 ते 20 हजार
22. मसुरी (Mysore)
कर्नाटकातील आणखी मोठे शहर म्हणून मसुरीची ओळख आहे. मसुरीमध्या पाहण्यासारखे बरेच काही आहे. मसुरीच्या राजाने बांधलेल्या अनेक इमारती या ठिकाणी सुस्थितीत आहे.कर्नाटकामधील मसुरी हे ठिकाण तुम्ही पाहायलाच हवे असे आहे. पण हे ठिकाण तुम्ही कर्नाटकातील इतर ठिकाणांसोबत करु नका. तर तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.
वातावरण (Weather): दमट हवामान असल्यामुळे तुम्ही छान कॉटनचे कपडे या ठिकाणी घेऊन जा.
काय पाहाल (Places to explore): म्हैसुर पॅलेस, चामुंडी हिल टेंपल, ललिता मोहन पॅलेस,जगन मोहन पॅलेस आणि बरेच काही
कसे जाल (How to go): ट्रेन, बाय रोड आणि विमानाने देखील तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. या ठिकाणी जाण्यासाठी जवळचे विमानतळ बगळुंरु विमानतळ आहे. तेथून पुढे साधारण 2 ते 3 तासांचा प्रवास आहे.
अंदाजित खर्च (Estimate): 10 ते 12 हजार
23. उटी (Ooty)
तामिळनाडूत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते ते म्हणजे उटी हे ठिकाणं. तामिळनाडू राज्यात सर्वात उंचावर वसलेलं असं हे शहर आहे. साधारण 7400 फुटांवर ते वसलेले आहेच. याला क्वीन्स ऑफ हिल्स स्टेशन असे देखील म्हटले जाते. या सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही खूप फोटो काढू शकता.
वातावरण (Weather): तुम्हाला या ठिकाणी कायमच थंडी जाणवेल. उन आल्यानंतर थंडी सहन करण्यासारखी असते. पण रात्रीच्यावेळी नाही.
काय पाहाल (Places to explore): उटी लेक, बोटानिकल गार्डन, रोझ गार्डन, इमरेल्ड लेक, पाईन फॉरेस्ट, पॅकरा फॉल्स
कसे जाल (How to go): तामिळनाडूला जाण्यासाठी तुम्ही ट्रेन विमान कसाही प्रवास करु शकता. त्यापुढे तुम्हाला गाडया मिळतील.
अंदाजित खर्च (Estimate): 10 ते 15 हजार
24. जीम कॉरबेट (Jim Corbett)
उत्तराखंडमधील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे जीम कॉर्बेट. नैनितालमध्ये हे ठिकाण येते. पण हे नॅशनल पार्क तुम्ही घाईघाईत करण्यासारखे नाही. त्यामुळेच हे ठिकाण वेगळे ठेवले आहे याचे कारणच ते आहे. नैनितालला गेलात आणि तुमच्याकडे बराचवेळ असेल तर मग तुम्ही या ठिकाणी नक्कीच जायला हवे.
वातावरण (Weather): बऱ्यापैकी थंड. जंगलात असल्यामुळे तुम्हाला तुमची काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी घ्यायला हव्यात.
काय पाहाल (Places to explore): जीम कॉर्बेट तुम्हाला जंगल सफारी वाटत असली तरी देखील हे जंगल फार मोठे आहे यामध्ये 5 वेगवेगळे भाग आहेत.
कसे जाल (How to go): मुंबई, दिल्लीवरुन तुम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. दिल्लीवरुन राम नगरला जाण्यासाठी तुम्हाला गाडी मिळू शकेल. हे जीम कॉर्बेटपासून जवळ आहेत
अंदाजित खर्च (Estimate): साधारण 10 ते 15 हजार
25. अलप्पी, केरळ (Allapy, Kerala)
केरळमधील अलप्पी हे ठिकाणही फार सुंदर आहे. हिरवळ काय असते हे तुम्हाला अनुभवायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की जायला हवे. अलप्पीला अरबी समुद्र अगदी जवळ आहे. अलफ्फुझ्झा म्हणजेच अलप्पी म्हणूनच फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला केरळ मधल्या विशेष बोटींची सफर या ठिकाणी करता येईल.
वातावरण (Weather): उष्ण, दमट आणि आल्हाददायक असे वातावरण या ठिकाणी असेल.
काय पाहाल (Places to explore): अम्बालफुझ्झा श्री कृष्ण मंदिर, अल्फुझा मंदिर, मनारसाला मंदिर, मुल्लाकल मंदिर आणि चंपाकुलम अशी काही ठिकाणं इथे पाहण्यासारखी आहेत. बोटींगसाठी तुम्हाला साधारण ऑगस्ट महिन्यात जावे लागेल. त्यावेळी इथे स्पर्धा देखील भरवल्या जातात.
कसे जाल (How to go): केरळला जाणे फारच. सोपे आहे. तुम्ही ट्रेनने तिव्रेंदमला उतरुन या ठिकाणी जाऊ शकता किंवा विमानाने देखील या ठिकाणी जाऊ शकता.
अंदाजित खर्च (Estimate): 10 ते 12 हजार रुपये
अशी करा तुमची बॅग पॅक (Ways To Pack Bag)
shutterstock
आता सगळ्या ठिकाणांची नावं, माहिती वाचून झाली असतील तर आता स्वाभाविकपणे तुम्ही मनात तिथे जाण्याचा बेत आखला असेल. पण या सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे तुमची बॅग. हो अर्थात तुमची बॅग या सगळ्या प्रवासात तुमचा अविभाज्य भाग असते. तुम्ही अनेकदा लोकांना travel light असा मंत्र देताना ऐकला असेल तो यासाठी की, एकट्याने फिरताना तुम्हाला जास्त बॅगा घेऊन चालत नाही. जर तुम्ही आठवडाभरासाठी बॅग भरत असाल तर तुमच्या कपड्यांचे नियोजन असू द्या. आपल्याला खूप फोटो काढायचे असतात. पण तरीही कपड्यांच्याबाबतीत थोडासा हात आवरता घ्या. कमीत कमी पण योग्य कपड्यांचे नियोजन करा. आवश्यक वस्तू आधी घ्या. तुम्ही बॅग कोणत्या पद्धतीची नेणार आहात त्यानुसार तुम्ही तुमचे सामान निवडा. जाणार आहात त्या ठिकाणचे हवामान लक्षात घेऊन तुम्ही बॅग भरलीत तर फारच उत्तम
सोलो ट्रव्हलर महिलांनी नक्की कॅरी करा या वस्तू (Things To Carry In Solo Traveller Bag)
shutterstock
- अधिकचे पैसे (सुट्टे असल्यास उत्तम)
- मेडिकल किट
- स्लिंग बॅग (ज्यात तुम्ही तुमच्या आवश्यक वस्तू ठेवू शकता)
- वातावरणानुसार कपडे
- पाण्याची बाटली (शक्यतो गरम पाणी नेऊ शकाल अशी म्हणजे तुम्हाला पाण्याचा त्रास होणार नाही)
- ताट, वाटी, पेला, चमचा, ग्लास (स्वत:चा असलेला बरा)
- सुका खाऊ
- चांगले बूट (स्पोर्टस शूज असल्यास उत्तम)
तुम्हाला पडले आहेत का हे प्रश्न (FAQs)
महिलांसाठी सोलो ट्रॅव्हल सुरक्षित आहे का? (Is solo travel is safe for women)
हल्ली महिला सगळ्या गोष्टींसाठी सजग असतात. त्या घर चालवू शकतात तर एकट्याने प्रवास का नाही? एकट्याने प्रवास करताना जर तुम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला प्रवासात कोणत्याही अडचणी येणार नाही. तुम्ही या गोष्टींचा विचार केलात तर महिलांसाठी सोलो ट्रॅव्हलिंग अगदी सुरक्षित आहे.
एकट्याने प्रवास करणे महागात पडू शकते का? Is it expensive to travel solo?
अनेकांच्या डोक्यात हा प्रश्न फार वेळा येतो. याचे कारण असे की, जर तुम्ही solo travelling करताना महागडी हॉटेल्स शोधत असाल तर त्याचे शेअरींग तुम्हाला महागात पडू शकते. पण जर तुम्ही थोडा विचार केलात आणि स्टुंडट हॉस्टेल किंवा असे काही solo travellers चे हॉस्टेल शोधले तर तुम्हाला अशी ठिकाणं स्वस्त पडू शकतात शिवाय ती सुरक्षित असतात. अशाच ठिकाणी तुम्हाला आणखी काही टुरिस्टसुद्धा भेटू शकतील. जे तुमची कंपनी होऊ शकतील. पण माणसं ओळखण्याची पारख असेल तरच तुम्ही ओळख वाढवा. अन्यथा नाही.
सुरक्षित हॉटेल कसं बुक करावं (How to book safe hotels?)
राहण्याची सोय ही महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असते. कुठेही राहून चालत नाही. तुम्ही जाण्याआधी जर इंटरनेट सर्फींग करुन उत्तम ठिकाणं शोधून काढली तर तुम्हाला हॉटेल बुक करण्यासाठी वेळ मिळू शकतो. तुम्हाला हव्या असलेल्या सोयी पाहा. ते हॉटेल फार अज्ञातवासात नाही ना ते चेक करा. तुम्हाला ते हॉटेल पोहोचल्यानंतर खटकले तर दुसरे एखादे हॉटेलही पाहून ठेवा.शिवाय तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथील तुमच्या मित्रांशी अडीअडचणीच्या काळात कनेक्ट राहा.
प्रवासात अन्य महिला ट्रॅव्हलरची भेट होऊ शकते का? (Can other women solo travelers get connected during travel ?)
तुम्ही एकदा घराबाहेर पडल्यानंतर तुम्हाला अनेक ट्रॅव्हल ग्रुप भेटतील.ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तेथे तुमची सतत भेटही होत राहील. हल्ली अनेक मुली, महिला ब्लॉगिंग आणि व्लॉगिंक करतात. त्यामुळे तुम्ही जर काही सीझनचा विचार करुन एखादे ठिकाण एक्स्पोअर करत असाल तर तुमची नक्की भेट होऊ शकेल.
फिरण्यासाठी ठिकाणं कसे शोधावे ? (How search best place?)
हल्ली तुमच्या सगळ्या उत्तराचा मानकरी गुगल झाला आहे. तुम्ही गुगल करुन अनेक ठिकाणं एकाच जागी बसून पाहू शकता. शिवाय आम्ही तुमच्यासाठी बेस्ट 25 ठिकाणं निवडली आहेत ती देखील तुम्ही पाहू शकता आणि तुमचा प्लॅन करु शकता.
कार अथवा बसने प्रवास करताना उलटीचा होतो त्रास, ट्राय करा 5 टिप्स
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://wwwa.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.