ADVERTISEMENT
home / मनोरंजन
bhagya-dile-tu-mala-fame-tanvi-mundle-and-vivek-sangale-chemistry-reels-famous-in-marathi

#Rajveri ची जोडी होतेय तुफान, विवेक आणि तन्वीची केमिस्ट्री आहे अफलातून

काही मराठी मालिका या कलाकारांच्या केमिस्ट्रीमुळेच प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात आणि अशीच एक जोडी सध्या गाजत आहे ती म्हणजे #Rajveri अर्थात राजवर्धन आणि कावेरी. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत काम करत असणारे कलाकार विवेक सांगळे (Vivek Sangale) आणि तन्वी मुंडले (Tanvi Mundle) यांची जोडी सध्या खूपच प्रसिद्ध होत आहे. या मालिकेने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर पकड घेतली आहे. तन्वी आणि विवेक सोशल मीडियावरही सक्रिय आहेत आणि दोघांचेही रिल्स नेहमीच प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना आवडतात. राजवेरी या हॅशटॅगने या दोघांची जोडी प्रसिद्ध आहे. मालिकेतही दोघांचं नातं चाहत्यांना आवडत आहे. राजवर्धनने कावेरीला काकू हाक मारणं हे अनेकांना आवडत आहे. इतकंच नाही तर त्यांच्या या मजेशीर भांडणांचे टीशर्टही तयार करण्यात आले आहेत. 

रील्सही होत आहेत व्हायरल

राजवेरी ही जोडी प्रेक्षकांना इतकी आवडते की सोशल मीडियावरील त्यांचे रील्सदेखील प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत. या रिल्सना लाखात नाही तर अगदी कोटी इतके व्ह्यूज मिळत आहेत आणि त्यामुळेच तन्वी आणि विवेक हे दोन्ही कलाकार आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आवडतील असे अधिकाधिक रील्स बनवत आहेत आणि त्यांचे मनोरंजन करत आहेत. चित्रीकरणाच्या फावल्या वेळात सेटवर ही जोडी रील्स बनवत अधिक धमाल करताना दिसून येत आहे. खऱ्या आयुष्यातील त्यांच्या उत्तम मैत्रीमुळेच त्यांच्या रील अर्थात मालिकेतील केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. खरंतर दोघेही अगदी सहज आणि सोपे असेच रील्स बनवत आहेत. मात्र त्यातही नटखटपणा आणि मजेशीरपणा असल्यामुळे हे रील्स अनेकांना अधिक आवडत आहेत. केवळ मराठी प्रेक्षकच नाही तर इतर भाषिक प्रेक्षकांनाही ही मालिका खूप आवडत आहे. विवेक आणि तन्वीची केमिस्ट्री याशिवाय इतर कलाकारांचाही सहज अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती झाली आहे. 

विवेक आणि तन्वीची धमाल 

विवेक आणि तन्वीच्या आईस्क्रिम खाताना बनवलेल्या रील्सलादेखील चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला असून 16 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज या रीलला मिळाल्याचे दिसून येत आहे. दोघांमधील असलेली मैत्रीच अधिक खुलून येते असंही दिसून येते. त्यांची मैत्री त्यांच्या मालिकेतील अभिनयाला आणि केमिस्ट्रीला नक्कीच पुरेपूर साथ देत असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विषय ओळखीचा असला तरीही कलाकारांमुळे आणि कथेमुळेही या मालिकेची गोडी प्रेक्षकांना लागली आहे. विशेषतः तन्वी आणि विवेक सांगळे यांच्यातील सततची मजेशीर भांडणं आणि तरीही एकमेकांना जपत असल्याचे सीन पाहून प्रेक्षकांना ही जोडी खूपच आवडीशी वाटत आहे. कावेरी आणि राजवर्धन हे आपल्याच आजूबाजूच्या लोकांमधील एक असल्याची जाणीव असल्याने या मालिकेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे असंच म्हणावं लागेल. तर कलाकारांनी आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. विवेक आणि तन्वीसह या मालिकेत निवेदिता सराफ, सुरभी भावे, भाग्यश्री दळवी, पूर्वा फडके, अतुल महाजन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान या मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले असून ही मालिका आता मनोरंजक वळणावर आल्याचेही दिसून येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT