ADVERTISEMENT
home / बिग बॉस
Bigg Boss 14 : जान सानू खेळातून बाहेर, रुबिनाला मिळाला इम्युनिटी स्टोन

Bigg Boss 14 : जान सानू खेळातून बाहेर, रुबिनाला मिळाला इम्युनिटी स्टोन

Bigg Boss 14 चा आणखी एक आठवडा पार पडला आहे. या आठवड्यात या घरातून गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानू घराबाहेर पडला आहे. या आठवड्यात कमी मतामुळे त्याचा हा प्रवास इथेच संपला आहे. दर सोमवारी पार पडणारी ही प्रक्रिया यावेळी रविवारीच पार पडली आहे. जान कुमार सानूचा प्रवास आज संपेल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण या आठवड्यात तो काही काळासाठी या घरात दिसला होता. पण तरीही त्याला याचा फायदा उचलता आला नसल्याचा कौल जनतेने दिला आहे. जान, इजाज आणि रुबिनासोबत बॉटम लाईनमध्ये आल्यानंतर जान कुमार सानूच या खेळातून बाहेर पडेल अशी अपेक्षा होती आणि तसेच झाले. पण असे असताना या खेळात इम्युनिटी स्टोन मिळवत रुबिनाने एक आठवड्यासाठी आपला प्रवास वाढवून घेतला आहे.

गांजा प्रकरणामुळे भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी, तितली आता दिसणार नाही

जान कुमार सानूला बसला फटका

जान कुमार सानू

Instagram

ADVERTISEMENT

कुमार सानूचा मुलगा असूनही आपली वेगळी ओळख निर्माण करुन पाहणाऱ्या कुमार सानूला या खेळात लोकांनी स्विकारले होते. पण निकी तांबोळीसोबत जवळीक करु पाहणाऱ्या जानला त्याच्यासाठी निर्णय कधीच घेता आले नाही. त्यामुळेच कदाचित जान सानू हा घरातल्यांशी चांगला असूनही कधीच नॉमिनेशनपासून वाचू शकला नाही. त्यामुळे अगदी पहिल्याच दिवसापासून त्याला नॉमिनेट केले जात होते. अखेर जान कुमार सानूचा  हा प्रवास फक्त निर्णय क्षमता नसल्यामुळे इथे संपत असल्याचे अनेकांचे मत होते. आता जान कुमार सानू या खेळातून बाहेर पडल्यानंतर आता या घरात नवीन कोणी येणार का नाही? की उरलेल्या खेळामध्येच हा खेळ चालेल का नाही हे पाहावे लागेल.

Bigg Boss 14 : कॅप्टन्सी टास्कमध्ये जान- एजाजमध्ये आली कटुता

रुबिनानला मिळाला इम्युनिटी स्टोन

डेली सोप क्विन एकता कपूर या एपिसोडमध्ये काही टास्क देताना पाहायला मिळाली. अनेक टास्कअंती हा इम्युनिटी स्टोन रुबिनाला देण्यात आला. याचा फायदा आता रुबिनाला होणार आहे. रुबिना या खेळामध्ये हा इम्युनिटी स्टोन तिला पाहिजे तेव्हा वापरु शकते. त्यामुळे त्या आठवड्यात ती वाचू शकते. रुबिनाच्या फॅनला यामुळे आनंद झाला असला तरी प्रेक्षकांना ही गोष्ट खटकली आहे. कलर्सच्या मालिकेचा भाग असल्यामुळेच तिला ही इम्युनिटी देण्यात आल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

राहुलला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

पहिल्या काही आठवड्यामध्ये राहुलला घरातल्यांनी कायम टार्गेट केले. त्याचे बोलणे चांगले नाही, तो गुंडा आहे असा उल्लेख करत अनेकांनी त्यांना पहिल्या आठवड्यामध्ये कारण नसताना टार्गेट केले. पण याचा फायदा राहुलला बराच मिळाला. त्याने खेळ योग्य पद्धतीने केल्यामुळेच राहुलला प्रेक्षकांचा, सलमानचा आणि अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळाला. राहुल हा घरातील सध्या सगळ्यात तगडा प्लेअर असून अनेकांनी त्याला या खेळातील टॉप प्लेअर म्हणून घोषित केले आहे. तर दुसरीकडे टीव्हीचा मोठा चेहरा असलेली सेलिब्रिटी म्हणजे रुबिना. ही देखील यामधील एक तगडा प्लेअर आहे. रुबिनाचा फॅन फॉलोविंग मोठा असून ती अगदी पहिल्या आठवड्यापासून नॉमिनेट झाली असली तरी ती वाचत आली आहे.  तर या खेळामध्ये पहिल्या दिवसापासून अभिनव शुक्ला हा काही कारण नसताना आतापर्यंत वाचू शकला नाही. 

ADVERTISEMENT

आता या खेळातून जान कुमार सानू बाहेर पडल्यानंतर आता निकी एकटी खेळू शकेल का? निकीची नवी मैत्रीण असलेली कविता कौशिक यांची मैत्री किती काळापर्यंत टिकू शकेल हे देखील पाहावे लागेल.

Good News: कपिल शर्मा पुन्हा होणार बाबा, जानेवारीमध्ये गिन्नी देणार दुसऱ्या बाळाला जन्म

22 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT