ADVERTISEMENT
home / बिग बॉस
Bigg Boss 14 : राखी सावंतने फाडले राहुल महाजनचे धोतर, राखीवर  सदस्य नाराज

Bigg Boss 14 : राखी सावंतने फाडले राहुल महाजनचे धोतर, राखीवर सदस्य नाराज

घरात कोण कॅप्टन बनणार ? हे Bigg Bossच्या खेळात फार महत्वाचे असते. कॅप्टन झाल्यानंतर मिळणारे अधिकार आणि इम्युनिटी सगळ्यांनाच हवी असते. त्यामुळेच हा सामना नेहमी पाहण्यासारखा असतो. पण कॅप्टन होण्यासाठी कधी कधी कोणाकडून काय होऊन बसेल हे सांगता येत नाही. आता राखी सावंतचेच घ्या ना. कॅप्टनच्या स्पर्धेत असलेल्यांना कॅप्टन होऊ द्यायचे नाही. म्हणून तिने असे काही केले की, घरातील सगळ्यांची नाराजी तिने ओढावून घेतली. मस्करीत तिने राहुल महाजनचे धोतर पकडले आणि ते फाडले. त्यामुळे घरातील इतर सदस्य राखीवर चांगलेच नाराज झाले आहेत. जाणून घेऊया नेमकं झालं काय?

Bigg Boss 14 : राखी सावंतचा MBBS केल्याचा व्हिडिओ व्हायरल

ज्युली बनून घेतला बदला

राखी सावंतमध्येच कधीतरी ज्युली बनून सगळ्यांना त्रास देताना या आधीही दिसली आहे. तिच्या शरीरात भूत आहे असं सांगून ती लोकांचे मनोरंजन करते. पण आता मनोरंजन करताना तिने उगीचच एक पाऊल पुढे टाकले आहे. आदल्या दिवशी ज्युली बनून जास्मिनने तिचे नाक दुखावले. त्यानंतर तिने ज्युली अवतारातच घरात राहणे पसंत केले. आता घरातील कोणालाच कॅप्टन होऊ द्यायचे नाही. असे म्हणत तिने घरातील सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. राहुल महाजनशी तिची मैत्री असल्यामुळे तिने राहुल महाजनचे नेसलेले धोतर ओढले. ते धोतर तिने इतक्या जोरात ओढले की, त्यामुळे ते फाटून गेले. पुरुषांसोबत तुम्ही अशा पद्धतीचे असभ्य वर्तन करु शकत नाही. असे सांगत घरातल्यांनी राखी विरोधात आवाज चढवला. त्याआधी देखील अली गोनी हा राखीसोबत कॉफीच्या कारणावरुन भांडला होता.

राखीचे तुटले नाक

राखी ही घरात इंटरटेनिंग असली तरी जास्मिन भसीन आणि तिच्यात झालेल्या बाचाबाचीमध्ये जास्मिन भसीनने तिला बदक घातला. त्यावेळी तिच्या नाकाला धक्का बसला. तिच्या नाकाला बसलेला धक्का इतका जबरदस्त होता की, नाक दुखतेय हे दाखवण्यासाठी राखीने आपलं डोकं आपटायला घेतलं. हा सगळा तमाशा घरात रंगत असताना जास्मिन मात्र ती नाटकं करत आहे याच गोष्टीवर अडून होती. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला. पण डॉक्टरांच्या औषधोपचाराची गरज तिला भासल्यामुळे अशा प्रकारचे वागणे ही मुळीच चांगले नाही असे सांगत जास्मिन भसीनची कानउघडणी करण्यात आली.

ADVERTISEMENT

इन्स्टाग्राम अकाऊंटनंतर फराह खानचे ट्विटर अकाऊंट हॅक

अर्शीचे फुकटचे वाद

घरात अर्शी खान नावाचे वादळ आल्यापासून घरात केवळ वादच होत आहे. हम बोले सो कायदा करत ती या घरात वावरत आहे. त्यामुळे उगाचच ती अनेकांशी वाद करताना दिसत आहे. घरात आल्यानंतर विकास गुप्ताला तिने टार्गेट केले. त्यानंतर निकी तांबोळी, रुबीना दिलैक आणि आता तिच्या रडारवर राहुल वैद्य आला आहे. राहुल वैद्यशी वाद घालताना ती या दोन एपिसोडमध्ये दिसली आहे. राहुल वैद्य हा महिलांचा आदर ठेवत नाही, हे दाखवण्यासाठीच जणू तिने या घरात वाद केला असावा असे सगळ्यांनीच पाहिले आहे.

आता इतके सगळे एकाच आठवड्यात झाल्यामुळे घरातून कोण बाहेर पडणार हे पाहावे लागेल.

Bigg Boss 14: घरात सुरु झालं आहे जास्मिन-अली-निकी असं लव्ह ट्रँगल

ADVERTISEMENT
30 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT