‘बिग बॉस’मधील स्पर्धक हे घरात असताना आणि त्यानंतरही कायम चर्चेत असतात. त्यापैकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती अभिनेत्री म्हणजे जसलीन माथरू. काही दिवसांपूर्वी पारस छाब्राच्या स्वयंवरमध्ये सहभागी झालेली जसलीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती आयुष्याचा जोडीदार मिळाला म्हणून. जसलीनला इतक्या सगळ्या शोधानंतर आता आपल्या आयुष्याचा खरा जोडीदार सापडला आहे. याचा तिने स्वतः खुलासा केला आहे. जसलीनचे नाव याआधी तिचे गुरू अनुप जलोटा यांच्यासह जोडले गेले होती. ती बिग बॉसमध्येही त्यांच्याबरोबरच सहभागी झाली होती. मात्र काही कारणाने त्यांच्यात दुरावा आला. सध्या जसलीन माथरू भोपाळमधील डॉक्टर अभिनीत गुप्ताला डेट करत असून याचा खुलासा तिने स्वतः केला आहे. अभिनीत गुप्ता हा भोपाळमध्ये राहात असून तो सर्जन आहे. काही दिवसांपूर्वीच जसलीन भोपाळमध्ये कामानिमित्त गेली असता दोघांनी एकत्र वेळ घालवला. अभिनीतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही जसलीनसह फोटो पोस्ट केला आहे.
नाईट ड्रेस घालून हिनाने शेअर केला व्हिडिओ, ट्रोलर्सचे तोंड केले बंद
अनुप जलोटामार्फतच झाली ओळख
जसलीनची अभिनीत गुप्ताशी ओळख ही तिचे गुरू अनुप जलोटा यांच्यामार्फतच झाली. अनुप जलोटा यांनीच या दोघांची भेट घालून दिली होती. त्यानंतर या दोघांची ओळख वाढली. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या काळात दोघांमधील जवळीक जास्त वाढली आणि दोघे एकमेकांच्या संपर्कात जास्त आले. जसलीनची अभिनीतशी पहिली ओळख ही भोपाळमध्येच झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे. एका नामांकित वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जसलीनने सांगितले की, ‘मी मनात जशी छबी तयार केली होती अभिनीत तसाच आहे. तुम्ही जेव्हा फोनवर कोणाशी बोलता तेव्हा ती व्यक्ती वेगळी असते आणि तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्यक्तीगत जाऊन भेटतात तेव्हा ती व्यक्ती कशी आहे ते तुम्हाला कळतं. अभिनीत जसा फोनवर बोलत होता तो व्यक्तीगत आयुष्यातही तसाच आहे.’
बिग बॉसच्या स्पर्धकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे केली तक्रार
अभिनीतचे पहिले लग्न झाले आहे
अभिनीत गुप्ता सर्जन असून त्याचे पहिले लग्न झाले आहे. सध्या त्याची पहिल्या बायकोसह घटस्फोटाची केस चालू आहे. याबाबतीतही जसलीनने तिचे मत स्पष्ट केले, ‘अभिनीत माझ्यासमोर एकदम आरशासारखा आहे. त्याच्याबाबत सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. त्याच्याबाबत मला कोणतीही शंका नाही. कारण त्याने मला सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आम्ही आताच लग्न करणार नाही. सर्वात पहिले अभिनीतचा घटस्फोट व्हायला हवा. दुसरं म्हणजे मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे.’ त्यामुळे इतक्यात जसलीन आणि अभिनीत लग्न करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जसलीन काही महिन्यांपूर्वी पारस छाब्राच्या स्वयंवरमध्येही सहभागी झाली होती. तर त्याआधी अनुप जलोटाची गर्लफ्रेंड म्हणून तिने बिग बॉस गाजवले होते. मात्र आता आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाल्याचे जसलीनने स्पष्ट केले आहे. इतकंच नाही तर अभिनीतनेदेखील जसलीन आणि त्याचा फोटो शेअर केल्यानंतर काही सेलिब्रिटीनी त्या दोघांचं अभिनंदनही केलं आहे. यामध्ये राखी सावंतनेही त्या दोघांचं अभिनंदन करत जसलीनची निवड ‘क्यूट’ असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता जसलीन आणि अभिनीत कधी लग्नाची आनंदाची बातमी देणार याकडेच तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.
अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड म्हणवणाऱ्या जसलीन मथारुने शेअर केले हॉट फोटो