अभिनेता आणि कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील ग्रोव्हरचा शो ‘गँग्ज ऑफ फिल्मिस्तान’ आजपासून अर्थात 31 ऑगस्टपासून प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शो चा महत्त्वाचा भाग असणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने निर्मात्यांवर खळबळजनक आरोप करत हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने हा शो करण्यास चक्क नकार दिला आहे. आपल्याला फसवण्यात आलं असून कलाकारांचं मानसिक शोषण करण्यात येत असल्याचा आरोप तिने केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हे आरोप करत आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सुनील ग्रोव्हरचा हा शो प्रदर्शनापूर्वीच टीआरपी मिळविणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनीलने एका दुसऱ्या चॅनेलवर दुसरा शो केला होता. मात्र सुनीलच्या शो ला प्रेक्षकांनी पसंती दिली नव्हती.
अजून एका अभिनेत्याची ‘गुड न्यूज’ची घोषणा, दुसऱ्यांदा होणार बाबा
कलाकारांचं मानसिक शोषण – शिल्पा शिंदे
शिल्पा शिंदे ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहचली. अंगूरी भाभी म्हणून आजही प्रेक्षक तिला ओळखतात. आता ती लवकरच ‘गँग्ज ऑफ फिल्मिस्तान’ या कॉमेडी शो मधून दिसणार आहे. मात्र शो प्रदर्शित होण्याआधीच तिने निर्मात्यांवर आरोप लावले आहेत आणि अशा परिस्थितीत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. ‘निर्माते आमच्याशी सातत्याने खोटं बोलत आहेत. आम्हाला केवळ दोन दिवस आठवड्यातून काम करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता आमच्याकडून 12 तास काम करून घेण्यात येत आहे. शिवाय या शो च्या केंद्रस्थानी सुनील ग्रोव्हरच आहे. आम्ही फक्त त्याच्यामागे टाळ्या वाजवत आहोत असं वाटत आहे. मला इतक्या दिवसांमध्ये स्क्रिप्टही मिळालेली नाही. अशा शो मध्ये काम करणं मला शक्य नाही. निर्मात्यांकडून मला फसविण्यात आलं आहे. तसंच या शो मध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे. त्यामुळे मला काम करणं शक्य नाही,’ असे आरोप शिल्पाने व्यक्त केले आहेत.
कंगनाच्या आईला का सतावत आहे मुलीच्या लग्नाची चिंता, शेअर केली भावनिक पोस्ट
शिल्पा सतत वादात
शिल्पा शिंदे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असते. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतून. त्यानंतर तिने ‘बिग बॉस’ चा सीझन गाजवला आणि तो जिंकलाही. सध्या ती ‘गँग्ज ऑफ फिल्मिस्तान’ मध्ये काम करत आहे. पहिला शो देखील तिने निर्मात्यांशी असलेल्या वादामुळेच सोडला होता. तसंच आता या दुसऱ्या शो च्या बाबतीतही तिच परिस्थिती दिसून येत आहे. शिल्पा शिंदे ही बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेच. मात्र सुनील ग्रोव्हरचा कोणताही शो कपिल शर्मा शो नंतर हिट झाला नाही. सुनील ग्रोव्हर हा चांगला कॉमेडियन असूनही त्याचे वेगळे शो मात्र प्रेक्षक डोक्यावर उचलून धरत नाहीत. आतापर्यंत कपिल शर्मा शो नंतर सुनीलने साधारण दोन ते तीन वेगळे शो केले आहेत. मात्र कमी टीआरपीमुळे या शो ना गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे आता हे वक्तव्य नक्की शिल्पा शिंदे खरं करत आहे की टीआरपी साठी हे शो चालू झाल्यावर कळेलच.
खतरों के खिलाडी: निया शर्मा झाली मेड इन इंडियाची विजेती
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा