ADVERTISEMENT
home / बिग बॉस
आविष्कार आणि स्नेहामध्ये वादाची ठिणगी

Bigg boss मराठी 3 : स्नेहा आणि आविष्कारमध्ये पडणार वादाची ठिणगी

Bigg boss मराठी 3 च्या या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. घरात जसेजसे टास्क होऊ लागले आहेत तसतसे वाद हे अधिक विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्याच टास्कनंतर या घरात आता दोन गट तयार झाले आहेत. या दोन गटात आता हा सगळा खेळ रंगताना दिसत आहे. त्यातच या घरात असलेली पूर्वाश्रमीचे जोडपे असलेले  दोन स्पर्धक म्हणजेच स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर  यांच्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच काही आलबेल नाही. पण आता जसजसा गेम वाढत चालला आहे. त्यामुळे एकमेकांशी बोलणे हे घरातल्यांचे वाढले आहे. त्यातच या दोघांचे एकमेकांशी असलेले वागणे आणि भविष्यात उडणाऱ्या खटक्यांसाठीची ठिणगी पडायला आता सुरुवात झाली आहे.

Bigg Boss मराठी: दुसऱ्या आठवड्यात रंगणार ‘जोडी की बेडी’ टास्क

टोमण्यांचा हल्लाबोल

सध्या घरामध्ये नवा कॅप्टन होण्यासाठी हल्लाबोल हा टास्क सुरु आहे. या टास्क अंतर्गत घरात दोन टीम करण्यात आल्या आहेत. एका मोटार बाईकवर दोघांनी बसल्यानंतर विरोधी टीमने दुसऱ्यावर हल्लाबोल करायचा आहे. यावेळी अनेक स्पर्धकांची शाब्दिक चकमक दिसून आली आहे. या टास्क दरम्यान मोटारबाईकवरुन खाली उतरण्यासाठी खूप जणांनी तोंडाचा अधिक वापर केला म्हणजेच बाईकवरुन उतरवण्यासाठी बऱ्याच वाईट गोष्टी बोलल्या. सुरेखा कुडची यांनी या खेळात पहिला जाण्याचा निर्णय घेतला पण काही वेळातच त्या उठल्या. सोनाली पाटीलला उठायचे नसतानाही सुरेखा त्यांची जोडी असल्यामुळे त्यांना हा खेळ सोडावा लागला. पुढील जोडी बाईकवर बसण्यासाठी आविष्कार- मीनल यांना देण्यात आली होती. पण त्यांनी न  बसता विशाल आणि विकासला आविष्कारने पुढे केले. त्यावेळी स्नेहाने आविष्कारला टोमणा लगावला. स्नेहा म्हणाली की, जो माणूस स्वत:चाच नाही तो तुमचा काय होणार? स्नेहा हिचे हे बोलणे ऐकूनच तिने आता आविष्कार प्रती आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

आविष्कार खेळून देईल का उत्तर

आविष्कार यावर काहीच बोलला नाही असे सध्या तरी दिसत आहे. त्याने महेश मांजरेकरांच्या शब्दाकडे अधिक लक्ष दिले आहे. कारण त्याने स्नेहाला कोणतेही उत्तर देणे फार मोठे समजलेले नाही. इतकेच नाही तर महेश मांजरेकरांनी काहीही पर्सनल गोष्टी करु नकोस असा सल्ला दिल्यामुळे तो याकडे आता लक्ष देत नाही.त्यामुळेच की काय आता आविष्कार स्नेहामध्ये फार रस घेताना दिसत नाही.

ADVERTISEMENT

Biggboss Marathi season 3 : लहानपणी खूप खोडकर होता बिग बॉस मराठी मधला हा स्पर्धक

 मीराला दिले ओपन चॅलेंज

मीरा आणि गायत्री या दोघांना महेश मांजरेकर यांनी बुगूबुगू म्हटले होते. मीराच्या इशाऱ्यावर गायत्री कायम नाचताना दिसली आहे आणि आताही बऱ्यापैकी ती आता मीराच्या मागे मागेच नाचताना दिसत आहे.  आताही टास्क दरम्यान विकास आणि विशाल याला बरेच काही आक्षेपार्ह बोलली आहे. शेवटी चिडलेल्या विकासने चिडून सतत बोलणाऱ्या या दोन मुलींना खेळात पहिले तुम्ही बसा आणि खेळा याचे चँलेज दिलेले आहे. 

त्यामुळे आता पुढे काय होईल ते पाहण्यासाठी आजचा एपिसोड पाहावे लागणार आहे. 

29 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT