‘बिग बॉस’ मराठीचा पहिला सीझन इतका गाजला की यामधील स्पर्धकांना विसरणं अजूनही शक्य नाही. त्यातही सर्वात जास्त टफ फाईट प्रत्येकाला दिली होती अशी स्पर्धक म्हणजे सई लोकुर. कोणताही टास्क असो तो पूर्ण केल्याशिवाय सई कधीही मागे हटली नाही आणि त्यामुळेच सई कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. तिचं वागणं बोलणं असो अथवा पुष्करसह फ्लर्टिंग करणं असो सर्वच प्रेक्षकांना आवडून गेलं होतं. तर अशा सर्वांच्या आवडत्या सईने आता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपण प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. पण आपल्या चाहत्यांची उत्सुकता मात्र तिने ताणून ठेवली आहे. कारण सईच्या आयुष्यात आलेला हा मुलगा नक्की कोण आहे याची मात्र तिने माहिती दिलेला नाही. त्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला असला तरीही तिच्या चाहत्यांसाठी मात्र ही उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
रणबीरच्या प्रेमप्रकरणांचीच चर्चा जास्त, ‘कॅसिनोव्हा’ म्हणून प्रसिद्ध
सईने स्वतः दिली गोड बातमी
सई नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही ना काही पोस्ट करत असते. तसंच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आपण काय करत आहोत हे नेहमी सांगत असते. आता तर सईने चक्क आपण प्रेमात पडलो असल्याचं कबूल करून टाकलं आहे आणि ज्या व्यक्तीच्या प्रेमात सई आहे त्याच्यासह तिने फोटो पोस्ट केला आहे. मात्र तिने हा फोटो पाठमोरा पोस्ट केला असल्यामुळे, सईच्या खऱ्या आयुष्यातील राजकुमार नक्की कोण आहे याची उत्सुकता मात्र सईने शिगेला नक्कीच पोहचवली आहे. त्या व्यक्तीचे नाव आणि चेहरा मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. तिच्या सर्व मित्रमैत्रिणींनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी तर तिला ‘नाटकी’ असं प्रेमाने म्हटलं आहे. तर सईची सर्वात जवळची मैत्रीण मेघा धाडेनेही तिला शुभेच्छा देत आपण अत्यंत आनंदी असल्याचं म्हटलं आहे. मात्र सईच्या आयुष्यातील ही जवळची व्यक्ती कोण आहे आणि सईदेखील आता या लॉकडाऊनमध्येच लग्न करणार की काय अशा चर्चांना सुरूवात झाली आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्न केलं आहे. त्यात आता सईचाही नंबर लागतो की काय असंही तिचे चाहते आता म्हणायला लागले आहेत. तर पाठमोरा फोटो शेअर केल्यामुळे आता सईच्या आयुष्यातील राजकुमाराला पाहण्याची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहचली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांनाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे सईने ही गोड बातमी देतानाही आपला स्वभाव जपला असल्याचंच एक प्रकारे दिसून येत आहे.
Big Boss 14: या कारणासाठी सलमान खान करणार स्वतःच्या बिग बॉसमधील मानधनात कपात
सई केवळ अभिनेत्री नाही
सई केवळ अभिनेत्रीच नाही तर ती स्वतः इंटिरिअर डिझाईनर असून तिचे ‘सांझबायसई’ नावाचा दागिन्यांचा व्यवसायदेखील आहे. सई नेहमीच काही ना काही वेगळं करायचा प्रयत्न करत असते. तिने याच तिच्या स्वभावामुळे ‘बिग बॉस’ च्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता. इतक्या सगळ्या कलाकारांमध्ये तिने आपला वेगळेपणा सिद्ध केला आणि पहिल्या पाचांमध्ये सईचं नाव होतं. सईने प्रत्येकाला टफ फाईट देत बिग बॉसमधून आपला वेगळेपणा दाखवून दिला होता. तिची अनेकांशी भांडणं झाली. मात्र एकदाही तिने माघार घेतली नाही आणि ती आपला गेम खेळत राहिली. तिने प्रत्येकाशी भिडत आपण इथे टिकण्यासाठीच आलो आहोत हे दाखवून दिलं होतं. त्यामुळे आजही सईचा फॅन फॉलोईंग वाढतच आहे. ‘POPxo मराठी’ कडून सईला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
ड्रग्ज संदर्भात अभिनेत्रींनी केले हे धक्कादायक खुलासे
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक