ADVERTISEMENT
home / बिग बॉस
ही दोस्ती तुटायची नाय

Bigg Boss Marathi:पुन्हा दिसून आली विकास-विशालची मैत्री, केला हा त्याग

रिॲलिटी शोमध्ये मैत्री झालेली फारच कमी वेळा पाहायला मिळते. Bigg Boss Marathiच्या घरात अशीच मैत्री पाहायला मिळत आहे. विशाल निकम (Vishal Nikam) आणि विकास पाटील (Vikas Patil) यांच्यामधील मैत्री ही काहीतरी नक्कीच वेगळी आहे. कधीकधी टास्कमध्ये एकमेकांविरोधात उभे राहणारे हे दोघे टास्कनंतर किंवा एकत्र खेळताना आपली जी मैत्री आहे ती दाखवतात त्यामुळेच त्यांच्यासाठी ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे गाणे लागते. आता पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीचा एक वेगळाच रंग पाहायला मिळाला आहे. यावेळी विकासने विशालसाठी असा काही त्याग केला आहे जे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पाहुया विकास- विशालची मैत्री आणि विशालचा तो निर्णय काय झाले नव्या दिवशी

कॅप्टन्सीसाठी घेतला निर्णय

या घरात आल्यापासून विकास- विशाल याला एकदाही कॅप्टन बनण्याची संधी मिळाली नाही. यावेळी टास्क खेळून विशालला ही संधी प्राप्त झाली. विशालला कॅप्टन बनवण्याचा चंगच जणू विकासने बांधला होता. यावेळी कॅप्टन बनण्यासाठी घरातील काही सदस्यांना काही त्याग करायचा होता. विशालला कॅप्टन बनवण्यासाठी विकासला त्याचे केस ट्रिमरने काढून टाकायचे सांगण्यात आले. त्यावर कसलाही विचार न करता विकासने आपले केस काढले. पण इतकेच नाही. तर विशालने आपल्या मित्रावर झालेली ही गोष्ट पाहिल्यानंतर त्याच ट्रिमरने आपले केस सुद्धा काढून टाकले. या घरात त्यामुळे घरी मैत्री आहे ती फक्त या दोघांमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे घरातील इतरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

विकास- विशालमध्येही उडतात खटके

विकास आणि विशाल यांची मैत्री जरी असली तरी देखील त्यांच्यामध्येही अनेकदा काही खटके उडतात. टास्कदरम्यान त्यांच्यामध्ये झालेले खटकेही आतापर्यंत अनेकांनी पाहिले आहेत. त्यांच्यामध्ये भांडण होताना खूप जणांनी पाहिली आहेत. खूप टास्क दरम्यान ते एकमेकांविरोधातही असतात. पण तो झाल्यानंतर ते पुन्हा एकदा एकत्र होतात. अनेकदा चावडीवर विशाल हा आक्रमक असल्याचे म्हटले जाते. पण विशाल हा फार मोठ्या मनाचा आहे. समोरुन त्याला भांडण झाल्याशिवाय तो आक्रमक होत नाही असे देखील खूप वेळा दिसून आले आहे. पण टास्कनंतर एकमेकांसाठी काळजी करणारे आणि कोणताही प्लॅन न करता खेळणारे हे दोघे म्हणूनच खूप जणांना आवडतात.

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघने विकासवर केले गंभीर आरोप, प्रेक्षक नाराज

ADVERTISEMENT

घरातील अनेकांना करावा लागेल त्याग

हा टास्क खूप लोकांसाठी सोपा नसणार आहे. कारण जय हा कॅप्टन्सीसाठीचा दुसरा दावेदार आहे. त्यालाही त्याच्या जवळच्या लोकांकडून काही गोष्टी करुन घ्यायच्या आहेत. ज्यामध्ये मीरा हिने देखील जयसाठी त्याग केला आहे. तिने तिचे सॉफ्ट टॉय फाडून टाकले आहे. 

आता दिवसेंदिवस हा खेळ रंजक होऊ लागला आहे. त्यामुळे पुढे काय होईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

12 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT