ADVERTISEMENT
home / बिग बॉस
बिग बॉस’ची तयारी सुरु, यंदा 6 महिने चालणार हा रिअॅलिटी शो

बिग बॉस’ची तयारी सुरु, यंदा 6 महिने चालणार हा रिअॅलिटी शो

एकाच घरात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना ठेवून त्यांना वेगवेगळे चॅलेंज देऊन त्यांच्यातील खरे व्यक्तिमत्त्व बाहेर काढण्यास उद्युक्त करणारा रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ आतापर्यंत हिंदी बिग बॉसचे 14 सीझन येऊन गेले आहेत. यातील प्रत्येक सीझन हा वेगवेगळ्या कारणांमुळे म्हणजेच सेलिब्रिटी वादांमुळे गाजला आहे. गेला सीझन हा राहुल वैद्य, रुबिना मलिक आणि गेस्ट कंटेस्टंट म्हणून आलेल्या राखी सावंतमुळे चांगलाच गाजला. साधारण तीन महिने हा रिअॅलिटी शो चालतो. रोज येणाऱ्या वेगवेगळ्या व्यवधानांमुळे हा शो पाहायला फारच मजा येते. पण आता यामध्ये ‘डबल का तडका’ बसणार आहे कारण हा रिअॅलिटी आता तब्बल 6 महिने चालणार आहे असे कळत आहे. या बद्दल इंडोमॉलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या घरात येणार नवा भाडोत्री, भाडं ऐकून बसेल धक्का

असा सांगितला जात आहे फॉर्मेट

असा सांगितला जात आहे फॉर्मेट

instagram

ADVERTISEMENT

सर्वसाधारणपणे बिग बॉसच्या या घरात सगळे सेलिब्रिटी तीन महिन्यांसाठी राहतात. पण गेल्या सीझनमध्ये जो काही ट्विस्ट आला त्यानंतर मात्र हा शो काही काळासाठी वाढवण्यात आला होता. दरवर्षी या शोमध्ये एकतरी कपल असते. आता या नव्या सीझनमध्ये सगळेच सेलिब्रिटी कपल असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कपल्समुळे घमासान युद्ध होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या शोला अधिक रंजक करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जाणार असे कळत आहे. या शोच्या फाॅर्मेटनुसार साधारण 6 कपल्स म्हणजे 12 स्पर्धक या शोमध्ये असणार आहे. झालेल्या या नव्या सीझनप्रमाणेच सगळ्यात शेवटी राहिलेल्या 4 स्पर्धकांसोबत आणि काही स्पर्धक येऊन हा शो अधिक रंजक करण्यात येणार आहे. ही माहिती सध्या अनेक मीडिया हाऊसने दिली असली तरी देखील  अजून यावर कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. 

अनेकांच्या नावांची चर्चा

बिग बॉस सुरु होणाच्या चांगल्या दोन ते तीन महिन्याआधी याची चर्चा सुरु होऊ लागते. सध्या या नव्या सीझनमध्ये काही खास नावांची चर्चा होऊ लागली आहे. यामध्ये दयाबेन अर्थात दिशा वकानी,  सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही येणार अशा नावांची चर्चा होऊ लागली आहे. रिया चक्रवर्ती ही गेल्यावर्षी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामुळे खूपच जास्त चर्चेत आली होती. रियाला आपली बाजू मांडण्याची एक संधी सलमान खान देणार आहे असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता हे दोन चेहरे दिसणार की, कपल्स दिसणार? असा प्रश्न आहे. त्यामुळे सध्या कोणाच्याच नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. 

अखेर प्रतीक्षा संपली, ‘समांतर’ चा तुफान ट्रेलर प्रदर्शित

राखीने गाजवला सीझन

गेल्या वर्षी राखी सावंतने शेवटच्या काही दिवसांमध्ये हा सीझन चांगला उचलून धरला. राखी सावंत ही आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असली तरी देखील प्रत्यक्ष आयुष्यात ती  कशी आहे ते लोकांना या सीझनमध्ये कळले. या सीझनमध्ये तिने तिच्या इंटरटेन्मेंटचा तडका लावला होता.   तिच्या इंटरटेन्मेंटमुळे तिला दरवर्षी बोलावण्यात यावे अशी मागणी देखील केली जात होती. त्यामुळे आता या नव्या वर्षात राखी पुन्हा येईल का असा प्रश्न पडला आहे. 

ADVERTISEMENT

आता या नव्या सीझनची कोणती अधिकृत घोषणा केली जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच आहे

दीपिका पादुकोणची ड्युप्लिकेट आहे ही अभिनेत्री, बोल्डनेसमुळे चर्चेत

17 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT