ADVERTISEMENT
home / xSEO
Birthday Wishes For Uncle In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

काका- पुतणा/पुतणी हे नातं खूप खास असतं. त्यातल्या त्यात काका लहान असेल तर खूपच जास्त लाड होतात. तुमचाही लाडका काका तुम्हाला खूप जास्त आवडत असेल तर त्याचा वाढदिवस साजरा करायला आवडणे साहजिक आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका असे नुसते म्हणून होत नाही. तर  काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Birthday Kaka In Marathi) खास संदेश तुम्ही नक्कीच पाठवायला हवेत. खास त्यासाठीच आम्ही काही शुभेच्छा निवडल्या आहेत. यामध्ये (Happy Birthday Kaka In Marathi ,Birthday Wishes For Uncle In Marathi, Birthday Wishes For Kaka In Marathi) याचा समावेश आहे. चला आपल्या लाडक्या काकासाठी पाठवूया अशाच काही हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून .

Birthday Wishes For Uncle In Marathi | काकासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Uncle In Marathi
Birthday Wishes For Uncle In Marathi

आयुष्यात काकांचे स्थान कोणीच घेऊ शकत नाही. ज्यावेळी आपल्याला एखादी व्यक्ती वडिलधारी आणि समजून घेणारी वाटते त्यावेळी आपण तिला काका होण्याचा मान देतो. अशा लाडक्या काकांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Uncle In Marathi)  देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश 

  1.  आजच्या जन्मदिनी इश्वरचरणी प्रार्थना
    दीर्घायुष्य लाभावे तुम्हा
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2.  बाबांसारखे मित्र बनून मला समजून घेणारे
    माझे लाडके काका
    आजचा तुमचा वाढदिवस व्हावा खास, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  3.  तुम्ही नात्याने काका असाल, पण वडिलांपेक्षा कमी नाही,
    इश्वरचरणी प्रार्थना की, येत्या आयुष्यात तुम्ही राहावे सुखी
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4. नवे क्षितीज नवी पहाट
    फुलावी तुमच्या आयुष्यात स्वप्नांची वाट
    आजचा दिवस आहे खास
    शुभेच्छांची व्हावी बरसात
  5.  माझ्या चांगल्या आणि वाईट
    दोन्ही काळात माझ्या पाठिशी उभे असणाऱ्या
    माझ्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  6.  काका, एक असं व्यक्तिमत्व जिने
    मला शिकवलं आणि वाढवलं
    वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
  7. जीवाला जीव देतात
    म्हणून जीव लावणारी,
    अनेक माणसं जोडली तुम्ही
    काका तुमच्यामुळेच आयुष्याला नवी ओळख मिळाली
  8.  पुस्तकातील नाही तर आयुष्य जगण्याचे दिले तुम्ही ज्ञान
    आता तुमच्याशिवाय नाही या जीवनाला आधाराचे पान
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  9. खुलावे तुमचे आयुष्य आनंदाने
    मिळावे तुम्हाला सर्वकाही
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  10. काकारुपी छत्राखाली वाढणे
    म्हणजे वडाची सावली मिळणे
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Funny Birthday Wishes For Kaka In Marathi | काकासाठी विनोदी वाढदिवस शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Kaka In Marathi
Funny Birthday Wishes For Kaka In Marathi

काकासोबतचे नाते वडिलधारी असले तरीदेखील काकासोबत केलेली मजा ही वेगळी असते. तुमचाही काका तुमचा यार, दोस्त किंवा जिगरी मित्रासारखा असेल तर त्याला (Funny Birthday Wishes For Kaka In Marathi).

  1. जीवनात सर्व आनंद मिळणारच आहे,
    पण वाढदिवसाच्या दिवशी पार्टी द्यायला विसरु नका,
    काका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  2.  काका, तुला पाहिल्यावर पोरी आताही होतात फिदा,
    वाढदिवसाला तुझं वय जाहीर करतो का जरा,
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभऱ शुभेच्छा!
  3.  घरातील तू लाडका, पण अजूनही खातोस ओरडा
    काका, आता तरी माझ्यापेक्षा समजूतदार होशील
    हीच देवाचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4.  पार्टी द्यावी म्हणून लपून बसला असशील
    म्हणून देतोय अशा शुभेच्छा,
    चल आता कुठे येऊ पार्टीला,
    काका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  5.  आहेस थोडासा लहरी, करतोस कायम मनासारखे
    आज पार्टी देऊन टाक
    नेहमीच बोलीन तुझ्यासाठी चांगले, काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  6.  माझ्यावरील तुझे प्रेम आहे थोडे वेगळे
    पण पार्टी देताना प्रेम होते अदृश्य कुठे,
    काका तुला वाढदिवसाच्या पार्टीसाठी शुभेच्छा!
  7.  साखरेसारख्या गोड काकाला
    मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  8.  काका, तू आहेस सुपरमॅन
    तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  9.  सतत माझ्यावर ओरडणाऱ्या माझ्या
    काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  10. लाखात आहेस तू एक नंबर
    आहेस माझा काका तू शंभर नंबर
    काकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Uncle Birthday Wishes In Marathi | प्रिय काका वाढदिवस शुभेच्छा

Uncle Birthday Wishes In Marathi
Uncle Birthday Wishes In Marathi

काका असतात प्रेरणास्थान. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. अशा काकांचा वाढदिवस असेल तर त्यांना (Uncle Birthday Wishes In Marathi) नक्की पाठवा. याशिवाय तुमच्या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या

ADVERTISEMENT
  1.  माझ्या अखंड प्रेरणास्थान असलेल्या
    माझ्या लाडक्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  2.  आयुष्य सुंदर बनवणारे माझे काका
    आहेत माझे अखंड प्रेरणास्थान
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  3.  आपलेसे करुन घेण्यासाठी
    पोटीच घ्यावा लागत नाही जन्म
    काका तुम्ही आहात माझा आधारस्तंभ
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4.  नदीचे पाणी मंद वाटचाल करते,
    पण तरी ते कधी थांबत नसते,
    तुम्हीही कधी थांबत नाही, मेहनत काही सोडत नाही,
    असा आदर्श घालून देणाऱ्या माझ्या लाडक्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  5.  तुम्ही दिली दिशा म्हणून झाला मार्गदर्शक
    तुमच्यामुळे मिळाला जीवन जगण्याचा मार्ग
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  6.  आज तुमच्या वाढदिवसाचा मनी दाटला हर्ष
    असेच राहा पाठिशी घेऊन सगळा आनंद
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  7.  आनंदी क्षणांनी भरलेले तुमचे आयुष्य
    सतत राहावे आनंदी,काका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  8.  तुमची माया हेच खरे माझे धन,
    तुमची सोबत हे कधीही न फिटणारे ऋण,
    तुमचा सहवास आमच्यासाठी आनंदाचा क्षण
    क्षणोक्षणी तुमच्यासोबत वाढावा हा क्षण
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  9.  कायम सोबत असणारे
    माझे काका,
    तुम्हाला मिळो जीवनाचा आनंद
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  10. सुखी, समाधान याने भरावे तुमचे आयुष्य
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Happy Birthday Message For Uncle In Marathi | काकासाठी वाढदिवस संदेश

Happy Birthday Message For Uncle In Marathi
Happy Birthday Message For Uncle In Marathi

काकाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देण्यासाठी खास (Happy Birthday Message For Uncle In Marathi) निवडा आणि तुम्ही त्यांचा दिवस आनंदी करु शकता. या शिवाय लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील तुम्ही पाठवू शकता.

  1.  चांगल्या वाईट गोष्टीत
    आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या
    माझ्या काकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  2.  तुमच्या रुपाने मला मिळाले एक उत्तम काका
    आजच्या तुमच्या या दिवशी मिळावे तुम्हाला सर्व
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  3.  काका तुम्ही आहात एकदम मस्त
    तुम्हाला आजच्या दिवसाचा मिळावा आनंद,
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  4.  काकांनी दिला ज्ञानाचा वसा,
    अशा माझ्या ज्ञानरुपी काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  5.  उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
    बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
    परमेश्वर आपणास सुखात ठेवा,
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  6.  काका, तुमचा आजचा दिवस व्हावा
    खास, वाढदिवसाच्या आनंदाचा चढावा यामध्ये साज
    काका, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  7. चांगल्या वाईट काळात तुम्ही
    सतत देत असता तुम्ही आम्हाला साथ
    काका, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  8.  नवा आनंद,नवा गंध यावा तुमच्या आयुष्यात
    काका, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  9. तुमच्या वाढदिवसाचा आनंद आहे
    आमच्यासाठी खास
    काका वाढदिवशी वाढू दे तुमचा थाट
  10.  वर्षात असतात 365 दिवस,
    महिन्यात असतात 30 दिवस,
    या सगळ्यामध्ये आहे माझा एक आवडता दिवस,
    तो म्हणजे तुमचा वाढदिवस
    काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
     

आता तुमच्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवणार असाल तर या काही शुभेच्छा संदेशाचा उपयोग करु शकता. यासोबत तुमच्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा.

17 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT