‘थॉर लव्ह अँड थंडर’ नंतर मार्वल स्टुडिओचा पुढचा चित्रपट ‘ब्लॅक पँथर 2’ची झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर अमिट छाप सोडली आहे. आता अखेर जगभरात पसरलेल्या ब्लॅक पॅन्थरच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल प्रेक्षकांच्या मनात इतकी उत्सुकता होती की त्यांनी ट्रेलर प्रदर्शित होताच पहिला ब्लॅक पॅन्थर चित्रपट पुन्हा एकदा पाहिला. चित्रपटाच्या पहिल्या टीझर ट्रेलरने प्रदर्शित होताच इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाच्या टीझर ट्रेलरने एक नवा विक्रम केला आहे.मार्वल स्टुडिओच्या ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हरचा बहुप्रतिक्षित आणि भावनिक टीझर ट्रेलर सॅन दिएगो कॉमिक-कॉन 2022 मध्ये रिलीज झाला. एका अहवालानुसार, पहिल्या 24 तासांत तो 172 दशलक्ष वेळा पाहिला गेला. “ब्लॅक पँथर 2” चा टीझर ट्रेलर हा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील “थॉर: लव्ह अँड थंडर” नंतरचा 2022 चा दुसरा सर्वात मोठा ट्रेलर आहे.
मार्व्हल फॅन्स ब्लॅक पॅन्थरची आतुरतेने वाट बघत आहेत
जगभरातील चाहत्यांना या ट्रेलरची खूप प्रतीक्षा होती आणि त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथर या पात्रावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवात समुद्राच्या एका सुंदर दृश्याने होते आणि पार्श्वभूमीला एक गाणे वाजते. अँजेला बॅसेट समुद्राकडे पाहताना दिसत आहेत. मग एक आलिशान राजवाडा दाखवला जातो आणि अँजेला बॅसेट यांना खुर्चीवर बसवले जाते. हे ट्रेलर बघून ब्लॅक पॅन्थरचे चाहते भावनिक होणार हे निश्चितच होते.
अँजेला बॅसेटची वेगळी शैली
क्वीन रॅमोंडाची व्यक्तिरेखा खूप भावूक असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. राणी रॅमोंडाची भूमिका अभिनेत्री अँजेला बॅसेटने साकारली आहे. ट्रेलरमध्ये, ती भावूक होताना दिसत आहे. वाकांडाची राणी म्हणते, ‘मी जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राची राणी आहे आणि माझे संपूर्ण कुटुंब गेले आहे. एवढा त्याग पुरेसा नाही का?’ वाकांडातील लोक साम्राज्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रेलरच्या शेवटी ब्लॅक पँथरच्या सूटमध्ये एक आकृती दिसते. मात्र त्या पोशाखात कोण आहे, हे अजून स्पष्ट झाले नाही.
ट्रेलरला मिळाला भरभरून प्रतिसाद
रायन कूगलर या सुपरहिरो चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. त्यांनीच पहिला ‘ब्लॅक पँथर’ दिग्दर्शित केला होता 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्लॅक पँथर’च्या टीझरला 88 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, त्या तुलनेत नुकत्याच रिलीज झालेल्या ब्लॅक पॅन्थर 2 च्या ट्रेलरच्या व्ह्यूजची संख्या जवळपास दुप्पट आहे. ‘ब्लॅक पँथर 2’चा हा ट्रेलर मार्वल चित्रपटांच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टीझर ट्रेलरमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर कोणत्याही स्टँडअलोन चित्रपटाच्या व्ह्यूजमध्ये हा तिसरा सर्वात जास्त व्ह्यूज मिळवणारा चित्रपट ठरला आहे. ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ 355.5 दशलक्ष व्ह्यूजसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ 209 दशलक्ष व्ह्यूजसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चॅडविक बोसमननंतर कोण होणार ब्लॅक पॅन्थर
चॅडविक बोसमनच्या मृत्यूनंतर ब्लॅक पँथर चित्रपटाच्या चाहत्यांची फार निराशा झाली होती की आता ही भूमिका कोण साकारणार? पण आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण वाकांडाला नवीन संरक्षक सापडला आहे. पण हा ट्रेलर बघून प्रश्न पडतो की आता ब्लॅक पँथर कोण असेल?
‘ब्लॅक पँथर 2′ 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक