कोरोना व्हायरसमुळे सगळ्यांनाच घरात बसावं लागलं आहे. सध्या घरात राहणं म्हणजेच आपल्या आणि दुसऱ्यांच्या जीवाची काळजी घेणं आहे. याला सेलिब्रिटीही अपवाद नाहीत. सध्या कोणतंही काम चालू नसल्याने सेलिब्रिटीही घरात आहेत आणि आपल्या वेळेचा उपयोग रोज नवीन नवीन पदार्थ बनवण्यात सत्कारणी लावला आहे. काही जणांना मुळातच जेवण बनवायची आवड होती पण वेळ मिळत नव्हता. तर काही जण आता जेवण बनवायला शिकत आहेत. केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर आपल्या ‘शेफ’ असल्याचा नमुनाही व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर सेलिब्रिटी शेअर करत आहेत. यामुळे लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटी बनले आहेत ‘शेफ’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. बघूया कोणत्या सेलिब्रिटींना सध्या काय काय बनवलं आहे.
मलायकाने बनवले बेसनचे लाडू
मलायकाला नेहमीच बॉम्बशेल आणि सेक्सी म्हणून पाहण्यात आलं आहे. तिचं हे स्वयंपाकघरातील रूप फारच कमी जणांनी पाहिलं असेल. सध्या मलायका आपला वेळ स्वयंपाकघरात जास्त घालवत आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाने मलबारी व्हेज स्ट्यू चा आपला व्हिडिओ शेअर केला होता. आपल्याला कुकिंगची आवड असून कामामुळे स्वयंपाकघरत जायला वेळ मिळत नाही असंही तिने यामध्ये म्हटलं होतं. आता तर चक्क मलायकाने बेसनचे लाडू बनवले आहेत. आतापर्यंत मलायकाला नेहमीच योगा आणि हॉट अशा अवतारात पाहणाऱ्या तिच्या चाहत्यांना हा एक सुखद धक्काच आहे. मलायकाने अगदी सराईतपणे बेसनचे लाडू बनवलेले या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
कार्तिकने बनवला बहिणीच्या वाढदिवसाला केक
कार्तिक आर्यन तर पहिल्या दिवसापासून लॉकडाऊनला पाठिंबा देत आहे. कधी भांडी घासताना तर कधी मोनोलॉगचा व्हिडिओ कार्तिकचा चाहत्यांना पाहायला मिळाला. आता तर तब्बल सात वर्षांनी आपली लहान डॉक्टर बहिणीच्या वाढदिवसाला कार्तिकने स्वतःच्या हाताने केक बनवला असून त्याने त्याचे फोटो शेअर केले आहेत. कितीतरी वर्ष एकत्र राहण्याचा योग आला नव्हता. पण आता या लॉकडाऊनमुळे आपल्या बहिणीसोबत आणि कुटुंबासोबत कार्तिक आनंदाने वेळ घालवत आहे. केवळ स्वयंपाकच नाही तर घरातली सगळी कामं कार्तिक करत आहे.
करण जोहरच्या मुलाने केली बोलती बंद, कोरोनाच्या काळात व्हिडिओ व्हायरल
डेझी शाह कापतेय भाजी
घरात राहायचं म्हणजे घरातील कामं तर करायला हवी. डेझी शाहकडे बघून आपल्याला नक्कीच आपलं बालपण आठवेल. आई नेहमी भाजी चिरायला द्यायचं काम सांगायची की नाही तुम्हाला पण? डेझीदेखील घरच्यांसाठी भाजी कापण्याचं काम करत आहे. भाजी चिरणे हे बऱ्याचदा कंटाळवाणं काम वाटतं. पण या लॉकडाऊनच्या काळात डेझी आपल्या घरातल्यांसाठी खूपच जास्त प्रमाणात भाजी समोर घेऊन बसली आहे आणि इमानेईतबारे भाजी चिरण्याचं काम करत आहे.
अमृता खानविलकरचा ‘चोरीचा मामला’
प्रिटी झिंटा शिकली मसाला डोसा
प्रिटी झिंटा सध्या या लॉकडाऊनच्या काळात शिकली आहे मसाला डोसा. तिने आपल्या सोशल मीडियावर फोटोही शेअर केला आहे. सेलिब्रिटींना जेवण करता येत नाही असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं. पण या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच सेलिब्रिटींंनी या गोष्टीला मात देत जेवण बनवण्याचा एक विडाच उचलला आहे. प्रिटीनेही आपल्या घरात मसाला डोसा बनवत नवीन काहीतरी खाण्याच पदार्थ शिकण्याचा आनंद मिळवला आहे.
नव्वदीच्या काळातील ‘देख भाई देख’ मालिकेचं होणार पुनःप्रक्षेपण
वरूण धवनने केले अंडे
वरूण धवन हा नेहमीच वेगवेगळे एनर्जेटिक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत असतो. सध्या लॉकडाऊनच्या काळातही वरूण घरात असून आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. यावेळात स्वयंपाकघराचा ताबाही वरूणने घेतला आहे. वरूणने आधी सांगितलं की, लहानपणी तो बऱ्याचदा स्वयंपाकघरात अंडे बनवायला यायचा आता कामामुळे मात्र त्याला शक्य होत नाही. पण लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा संधी मिळाल्यावर वरूणने त्याचे आवडते अंडे बनवून खाल्ले आहे.