अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीनं (Nawazuddin Siddiqui) आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केलं आहे. केवळ बॉक्सऑफिसच नाही तर वेब सीरिजच्या विश्वातही त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजत आहे. पण नवाजुद्दीनला अभिनयाचे धडे कोणाकडून मिळाले हे तुम्हाला माहिती आहे का? नवाजुद्दीनच्या (Nawazuddin Siddiqui) खऱ्या आयुष्यातील गुरूजींबाबतची माहिती खूपच कमी लोकांना माहिती आहे. नुकतंच नवाजुद्दीननं आपल्या गुरूजींचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. नवाजुद्दीननं फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘ ज्या व्यक्तीनं मला अभिनयाचे धडे दिले. त्यांचं नाव आहे व्हॅलेंटाईन टेप्लाकोव्ह सर ( Sir Valentin Teplyakov). मी 1996 मध्ये सरांचं नाटक IVANOVमध्ये अभिनय केला होता. यामध्ये मी आंतोन चेखवची भूमिका साकारली होती. या भूमिकेनं एक अभिनेता म्हणून माझ्यामध्ये बरेच बदल घडवले. मोठ्या कालावधीनंतर तुमची भेट झाल्यानं मला अतिशय आनंद होत आहे’.
(वाचा : कार्तिकनं सारासोबतचा ‘हा’ व्हिडीओ केला शेअर, कॅप्शन पाहून चढला पारा)
The man who introduced me to Method Acting, Sir Valentin Teplyakov from Moscow.
I acted in his play IVANOV (Anton Chekhov) in 1996, which changed me as an actor.
Honoured to meet you after so long ❤ pic.twitter.com/0FqWa6uB3R— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) February 13, 2020
आज नवाजुद्दीन सिद्दीकचं नाव केवळ देशातच नाही तर परदेशात देखील गाजत आहे. निश्चितच व्हॅलेंटाईन टेप्लाकोव्ह यांच्यासाठी देखील ही बाब अभिमानास्पद असेल. ज्यांनी नवाजुद्दीनमध्ये मेथड अॅक्टिंगचे (Method Acting) बीज रोवले. 1996नंतर व्हॅलेंटाईन सरांचं नाटक केल्यानंतरही नवाजुद्दीनच्या वाट्याला फारशा चांगल्या भूमिका आल्या नाहीत. कित्येक सिनेमांमध्ये त्याला केवळ एक-एक-दोन-दोन सीन करायला मिळाले. बऱ्याच स्ट्रगलनंतर त्याला अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर 2’ मध्ये दमदार भूमिका मिळाली. यानंतर नवाजुद्दीननं कधीही मागे वळून पाहिलं नाही. जर नवाजुद्दीनला अभिनेता म्हणून यश मिळालं नसतं तर त्यानं आपल्या गावाकडे शेती केली असते. आजही आपल्या गावी गेल्यानंतर तो हातात फावडे घेऊन शेतात जातो.
(वाचा : सो क्युट ! लिटिल लायन लुकमधील तैमूरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल)
नवाजुद्दीन सिद्दीकीचं करिअर
नवाजुद्दीनच्या करिअरची सुरुवात ‘शूल’ आणि ‘सरफरोश’ या सिनेमांद्वारे झाली. पण या सिनेमांमध्ये प्रभावी भूमिका त्याच्या वाट्याला आल्या नाहीत. ‘पीपली लाइव’, ‘कहानी’, ‘गॅग्स ऑफ वासेपूर’, ‘द लंच बॉक्स’ यांसारख्या सिनेमांमुळे त्याला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली. आपलं वेगळ स्थान निर्माण करण्यासाठी नवाजुद्दीनला प्रचंड संघर्ष करावा लागला.
(वाचा : FIRST LOOK : अक्षय कुमारचा सिनेमा ‘पृथ्वीराज’मध्ये अशी दिसणार मानुषी छिल्लर)
पुरस्कार
‘लंचबॉक्स’ सिनेमासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर पुरस्कारानं नवाजुद्दीनला सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त ‘तलाश’, ‘कहानी’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘देख इंडियन सर्कस’साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आयआयएफए पुरस्कार, स्क्रीन अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स, रेनॉल्ट स्टार गिल्ट अवॉर्ड्स या पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे.
(वाचा : परी म्हणू की सुंदरा ! ‘मलंग गर्ल’ दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल)
हे देखील वाचा :
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.