सो क्युट ! लिटिल लायन लुकमधील तैमूरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सो क्युट ! लिटिल लायन लुकमधील तैमूरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खाननं (Taimur Ali Khan) आपल्या बाल-लीलांनी सर्वांचे मन जिंकून घेतली आहेत. तैमूरला इतक्या लहान वयात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियावर त्याचे नावे कित्येक पॅन पेजही तयार करण्यात आले आहेत, ज्यावर तैमूरचे फोटो शेअर केले जातात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तैमूरच्या एका फोटोनं प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या फोटोमध्ये तैमूर सिंहाच्या लुकमध्ये दिसत आहे. या लुकमध्येही तैमूर अतिशय गोंडस दिसत आहे. तैमूरचा हा फोटो करण जोहरच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतील आहे. यश आणि रूहीच्या बर्थ-डे पार्टीमध्ये तैमूरनं चेहऱ्यावर सिंहाचा चेहरा पेट करून घेतला होता. तैमूरचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

(वाचा : डान्स दिवाचा संघर्ष! कधीकाळी लॉटरी विकायची नोरा फतेही)

काही दिवसांपूर्वीच तैमूरचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तैमूर ड्रम वाजवताना पाहायला मिळाला होता. व्हिडीओमध्ये यश, रूही, तैमूर आणि इनाया एकत्र मजामस्ती करतानाही दिसले.  
रूही-यशच्या बर्थ-डे पार्टीमध्ये स्टार्सची हजेरी 
करण जोहरच्या मुलांच्या बर्थ-डे पार्टीमध्ये करीना कपूर, फराह खान, एकता कपूर, तुषार कपूर, आलिया भट, नीलम, रितेश देशमुख, सोहा अली खान यांसह अन्य सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.  

(वाचा : लग्न ठरवण्यापूर्वी रणबीर-आलिया शोधताहेत हनिमूनसाठी जागा)

करण जोहरने सरोगसीच्या माध्यमातून पितृत्व स्वीकारले. करण जोहरची मुले यश जोहर आणि रूही जोहर यांचा सरोगसीच्या माध्यमातून जन्म झाला आहे. करणनं 'अनसुटेबल बॉय' नावाने लिहिलेल्या आत्मचरित्रातून पिता होण्याची इच्छा व्यक्त केली होती. बॉलिवूडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देणारा करण पहिला सेलिब्रिटी नाही.

(वाचा : FIRST LOOK : अक्षय कुमारचा सिनेमा 'पृथ्वीराज'मध्ये अशी दिसणार मानुषी छिल्लर)

 

तैमूरचा खास डाएट प्लान

आई करीनाने तैमूरसाठी खास डाएट प्लानन तयार केला आहे. आतापासूनच ती तैमूरच्या डाएटची काळजी घेत आहे. करीना तैमूरचं जेवण स्वतःच्या हाताने बनवते.
करीना तैमूरला देते खिचडी आणि डोसा
एका मुलाखतीत करीनाने तैमूरचा डाएट प्लान सांगितला. घराबाहेरचे कोणतेही अन्नपदार्थ करीना तैमूर खाऊ देत नाही. कधी कधी ती त्याच्यासाठी खिचडी तयार करते तर कधी कधी त्याला डोसा तयार करून देते. त्याच्या डाएटमध्ये ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश देखील असतो. तैमूरच्या आवडीनुसार त्याचं जेवण शिजवलं जात असल्यामुळे तो घरचे जेवण आवडीने खातो. सुरूवातीला हा डाएट प्लान फॉलो करणं त्याच्यासाठी अवघड होतं. कारण त्याला याची सवय नव्हती मात्र आता तो आवडीने हे खाद्यपदार्थ खातो.

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.