Advertisement

भविष्य

मकर राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये, नेहमी राहतात मनाने तरूण

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jun 13, 2021
मकर राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये, नेहमी राहतात मनाने तरूण

Advertisement

मकर (Capricorn) राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना हा 22 डिसेंबरपासून ते 19 जानेवारी मानला जातो. या राशीच्या स्वामी ग्रह हा शनी आहे. या राशीच्या व्यक्तींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या वयाचा परिणाम हे स्वतःवर होऊ देत नाहीत. नेहमी तरूण दिसणे आणि मनानेही तरूण असणे हे या व्यक्तींना जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळेच या व्यक्ती अतिशय चार्मिंग अशा असतात. या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात पण बऱ्याचदा नशीब यांची साथ देत नाही. त्यामुळे यांची कामे खूप उशीरा पूर्ण होतात. पण जेव्हा या व्यक्तींचे नशीब साथ देऊ लागते तेव्हा संपूर्ण दुनिया पाहत राहील असे यांचे नशीब असते. तुमच्याही जवळच्या व्यक्ती जर मकर राशीच्या असतील तर तुम्ही नक्की जाणून घ्या या लेखातून त्यांचा स्वभाव या बाबींशी जुळतोय की नाही. 

या राशीच्या जोड्या ज्या एकमेकांसह असतात बेस्ट

मकर राशींच्या व्यक्तींचा स्वभाव (Capricorn sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

मकर राशींच्या व्यक्तींचा स्वभाव (Capricorn sign people Positive and Negative Characteristics in Marathi)

GIF

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म योग्य वेळी, तारखेला आणि वर्षात होत असतो. प्रत्येक महिन्यात जन्म घेणारी व्यक्ती ही वेगळ्या राशीची असते. जन्मदिवसानुसार त्या त्या व्यक्तीची रास, त्याचा स्वभाव, त्याचे गुण ठरतात. यावेळी आपण मकर राशीच्या (Capricorn) व्यक्तींच्या बाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया. 

 • मकर राशीच्या व्यक्ती या अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि अगदी प्रॅक्टिकलदेखील. स्वतःला खोटे दाखविण्यात त्यांना अजिबातच रस नसतो. आपण जसे आहोत तसंच दाखविण्यात त्यांना रस असतो. त्यामुळेच ते जसे आहेत तसेच सर्वांसमोर असतात. 
 • या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात आणि कोणतेही काम अत्यंत मन लाऊन पूर्ण करतात. पण ज्या गोष्टींत या व्यक्तींना रस नसतो त्यामध्ये अत्यंत आळशीपणा करतात. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर इलेक्ट्रॉनिक, लेखन, आयटी, बँक आणि फंडिंग या क्षेत्रात या व्यक्ती अधिक प्रगती करतात
 • मकर राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर हुकूम गाजवणं अत्यंत आवडतं आणि कोणताही अन्याय सहन करणं या व्यक्तींना जमत नाही. समोरच्या व्यक्तींना कितीही वाईट वाटलं तरी तोंडावर बोलून या व्यक्ती मोकळ्या होतात. कोणाच्याही मागून बोलणं या व्यक्तींना आवडत नाही. 
 • आपल्या वयाचा कधीही थांगपत्ता लागू न देणं हे या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे. नेहमी तरूण राहणे आणि तसंच दिसण्याचा प्रयत्न करणे यांना आवडते. या व्यक्तींचे व्यक्तिमत्व चार्मिंग असते
 • आपल्याला हवं त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यासाठी रस्ता या व्यक्ती शोधून काढतातच. या व्यक्तींचा मूड नसेल तर त्यासाठी चित्रपट पाहणे हा यांचा हमखास विरंगुळा आहे. या व्यक्तींना जेव्हा आपण आयुष्यात हरलो आहोत अथवा आता काहीही होणार नाही असं वाटतं तेव्हाही यांच्यासाठी चित्रपट हाच पर्याय असतो. कोणत्याही चिंतेपासून सुटका मिळविण्यासाठी चित्रपटातून आनंद घेणे हा पर्याय या व्यक्ती निवडतात. 
 • मकर राशींच्या व्यक्तींसाठी प्रेम ही एक गरज असते. या व्यक्ती थोड्या विचित्र स्वभावाच्या असतात. आपल्यापेक्षा मोठ्या अथवा अगदी लहान व्यक्तींमध्ये या व्यक्तींना रस असतो. कोणत्या चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात तर अडकून नाही ना पडणार याची चिंता या व्यक्तींना असते. आपला मिस्टर परफेक्ट अथवा मिस राईट मिळवायला या व्यक्तींना खूप वेळ लागतो 
 • परफेक्ट मॅचबाबत सांगायचं झालं तर मकर राशीच्या व्यक्तीसाठी कन्या राशीच्या व्यक्ती योग्य ठरतात. कारण या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे या दोन्ही राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात आणि वागण्याबोलण्यात समानता असते. या दोन्ही राशीच्या व्यक्ती अत्यंत जबाबदार असतात. त्यामुळे कोणत्याही समस्येवर एकत्र बसून तोडगा काढू शकतात. भावनिक, रोमँटिक आणि व्यावहारिक या तिन्ही गोष्टींमध्ये यांचा एकमेकांवर विश्वास असतो. तसंच आपल्या चंचल गोष्टींमुळे या व्यक्ती एकमेकांना अत्यंत चांगली साथ देतात
 • या व्यक्तींचे मन जिंकून घेणे थोडे कठीण आहे. पण या व्यक्ती अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक असतात. प्रेम म्हणजे यांच्यासाठी लग्न. कोणाच्याही मनाशी खेळणे या व्यक्तींना जमत नाही. प्रेम म्हणजे खेळ अथवा टाईमपास हा शब्द यांच्याकडे नाही
 • सकारात्मक विचार हे मकर राशीचे वैशिष्ट्य आहे. सकारात्मक विचारांनीच या व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे जातात आणि आपली स्वप्नं पूर्ण करतात. तर दुसऱ्यांविषयी ईर्षा असणे ही मात्र यांची कमकुवत बाजू आहे. दुसऱ्यांच्या आनंदात सहसा तितक्या मनापासून या व्यक्ती सहभागी होत नाहीत. समोर आपल्याला काहीही फरक पडत नाही असं दाखवलं तरीही मनापासून मात्र त्यांना आवडतंच असं नाही. तसंच कोणत्याही प्रकारचे खाणे हीदेखील यांची एक कमजोरी आहे. खाण्याच्या पदार्थांपासून या व्यक्ती जास्त काळ लांब राहू शकत नाहीत
 • जानेवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या अत्यंत संस्कारी आणि आदर्श अशा व्यक्तीमत्वाच्या असतात. त्यामुळेच यांच्या चाहत्यांची यादी खूपच मोठी असते. बोलण्यामध्ये या व्यक्ती अत्यंत पटाईत असतात. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणे हे यांचे वैशिष्ट्य आहे
 • मकर राशीच्या व्यक्तींची अजून एक वाईट गोष्ट म्हणजे अगदी लहानसहान गोष्टींवर या व्यक्ती वाद घालतात. त्यामुळे काही बाबतीत लोक यांची मस्करी करतात. पण या सगळ्या गोष्टींमुळे मकर राशीच्या व्यक्तींना कोणताही फरक पडत नाही

तूळ राशीच्या व्यक्ती असतात राजकारणात माहीर, कसा असतो स्वभाव

भाग्यशाली क्रमांक – 4, 8, 13, 22, 67

भाग्यशाली रंग – काळा, राखाडी, हिरवा आणि निळा

भाग्यशाली वार – बुधवार, शनिवार

भाग्यशाली खडा – हिरा, नीलम 

मकर राशीचे बॉलीवूड स्टार्स – सलमान खान, दीपिका पादुकोण, ऋतिक रोशन, बिपाशा बासू, विद्या बालन, फराह खान, फरहान अख्तर, इमरान खान, जॉनी लिव्हर, नाना पाटेकर, सिद्धार्थ मल्होत्रा

मराठीमधील स्टार्स – सुयश टिळक, रूपाली भोसले, प्रार्थना बेहेरे 

प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक