लघवीचा रंग साधारणपणे पिवळसर ते लालसर रंगाचा असतो. शरीरातून लघवीवाटे बाहेर टाकल्या जाणाऱ्या विषद्रव्यांमुळे लघवीला रंग येत असतो. शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळत असेल तर लघवीचा रंग गडद नसतो. पण जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर डिहायड्रेशनमुळेही लघवीचा रंग बदलू शकतो. लघवीमधील रंगद्रव्ये ही तुम्ही घेतलेल्या आहार अथवा औषधांमधील केमिकल्स पासून तयार होत असतात. त्यामुळे आहार आणि औषधांमध्ये बदल झाला की लघवीच्या रंगातही बदल जाणवतो. लघवीचा रंग बदलणे हे तुमच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असल्यामुळे त्या रंगानुसार तुम्हाला तुमच्या आरोग्याचे निदान करता येऊ शकते. यासाठी जाणून घ्या लघवी पिवळी होण्याची कारणे – Causes For Yellow Urine In Marathi. तसंच जाणून घ्या लघवीच्या जागी खाज येणे घरगुती उपाय | Vaginal Itching Home Remedies In Marathi, महिलांना वारंवार लघवी येणे यावर उपाय जाणून घ्या | Home Remedies For Frequent Urination, लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती उपाय | Urine Infection Home Remedies In Marathi, मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Kidney Stone In Marathi)
लघवी पिवळी होण्याची कारणे
लघवीचा रंग बदलण्यामागे काय कारण आहे यावरून तुम्हाला तुमच्या आरोग्य स्थितीचा अंदाज लावता येतो. यासाठी जाणून घ्या लघवी पिवळी होण्याची कारणे – Causes For Yellow Urine In Marathi
आहार – Diet
लघवीचा रंग बदलण्याचे आहार हे एक मुख्य कारण असू शकते. कारण खाद्यसंस्कृतीमध्ये विविध रंगाचे नैसर्गिक पदार्थ, फळं आणि भाज्या असतात. या रंगीत आहारामुळे तुमच्या शरीराला पोषक घटक मिळत असतात. तुम्ही जो आहार घेता त्यातील टाकावू पदार्थ मल आणि मूत्रावाटे शरीराबाहेर टाकले जातात. सहाजिकच मल आणि मूत्रामध्ये तुम्ही आहारातून घेतलेल्या पदार्थांचे टाकाऊ अवशेष असतात. जर तुम्ही एखाद्या दिवशी खाद्यपदार्थांमधून जास्त नैसर्गिक रंग असलेले पदार्थ खाल्ले तर तुमच्या मल आणि मूत्रातही त्या पदार्थांचे रंगकण असतात. लघवी पिवळी होण्यामागे बऱ्याचदा हे कारण असू शकते. त्यामुळे जर एखाद्या दिवशी तुम्ही घेतलेल्या आहाराचा परिणाम म्हणून लघवी पिवळी झाली असेल तर फार चिंता करण्याचे कारण नाही.
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स – Vitamins and Minerals
तुम्ही आहार अथवा फूड सप्लीमेंटमधून घेत असलेल्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्समुळेही तुमच्या लघवीच्या रंगात बदल होऊ शकतो. साधारणपणे बी 2 आणि बी 12 असलेले घटक तुमच्या आहारात अथवा फूड सप्लीमेंटमध्ये असतील तर तुमच्या लघवीचा रंग फ्लोरोसंट पिवळसर हिरवट रंगाचा होतो. जर तुम्ही काही दिवस मल्टी सप्लीमेंट घेत असाल तर तुमच्या लघवीचा रंग डार्क पिवळसर रंगाचा होतो. मिल रिप्लेसमेंट शेकमुळेही लघवीचा रंग बदलण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असेल तर लघवीचा रंग केशरी होतो. त्यामुळे जर तुम्ही व्हिटॅमिन्स घेत असाल तर लघवीचा रंग बदलण्याचा फार विचार करू नका.
व्यायाम – Exercise
लघवीचा रंग बदलण्यामागचे मुख्य कारण तुमच्या शरीरात असलेल्या पाण्याचे प्रमाण असते. जर व्यायामानंतर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायला नाही, तर तुमचे शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे तुमच्या लघवीचा रंग गडद होतो. अति व्यायाम केल्यानंतर शरीर हायड्रेट ठेवलं नाही तर गंभीर मसल्स ब्रेकआऊटचा त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. अशा परिस्थितीत शरीरातील स्नायू खूप दुखतात आणि चहाच्या रंगाप्रमाणे गडद लघवीला होते. अशा परिस्थितीत तुम्हाला त्वरीत वैद्यकीय मदतीची गरज लागू शकते.
औषधे – Medications
ओटीसी औषधे अथवा एखाद्या विशिष्ठ आजारावर घेण्यात येणाऱ्या औषधांमुळेही लघवीचा रंग बदलू शकतो. त्यामुळे तुम्ही सर्दी, खोकला, तापावर नेहमीचे औषध घ्या अथवा एखाद्या गंभीर आजारावर डॉक्टरांच्या सल्लानुसार एखादे औषध घ्या. कोणतंही औषध पोटात गेल्यावर लघवीचा रंग बदलतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जी औषधे घेत आहात ती जोपर्यंत घेणार तोपर्यंत तुमच्या लघवीचा रंग डार्क पिवळा असण्याची शक्यता आहे.
आरोग्य समस्या – Medical conditions
लघवीचा रंग बदलणे हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. कारण लघवीवाटे शरीरातील सर्व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. पण जर तुमच्या यकृत, पोट अथवा किडनीच्या कार्यात अडथळा आला तर त्याचा परिणाम तुमच्या लघवीच्या रंग आणि प्रमाणावर होतो. जर तुम्हाला लघवी करताना त्रास होत असेल, जळजळ होत असेल, लघवीचा रंग गदड झाला असेल अथवा लघवी फेसाळलेली आणि दुर्गंध असलेली होत असेल तर तुम्हाला किडनीचे इनफेक्शन असू शकते. त्यामुळे ताप, उलटी, पोटदुखी, पाठदुखीसह वरील लक्षणे असतील तर त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या. बऱ्याचदा काविळच्या आजारातही लघवी पिवळी होण्याची शक्यता असते.
प्रेगनन्सी – Pregnancy
लघवीचा रंग बदलण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण तुमची प्रेगनन्सी असू शकते. गर्भधारणा झाल्यावर तुमच्या लघवीचा रंग बदलतो. डार्क पिवळा रंग तुमच्या गरोदरपणाचे लक्षण असू शकते. त्यामुळे जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल आणि तुमच्या लघवीचा रंग बदलला असेल तर तुम्ही गरोदर राहिल्यामुळेही तुमच्या लघवीचा रंग बदलेला असू शकतो. जाणून घ्या, लघवीला वारंवार जावे लागणे घरगुती उपाय, कारणे, लक्षणे
लघवी पिवळी होणे यावर उपाय
लघवीचा रंग बदललण्याचे समजताच गंभीर कारण वाटत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा वेळी डॉक्टर तुमची हेल्थ हिस्ट्री तपासून काही टेस्ट करण्याचा सल्ला तुम्हाला देऊ शकतात.
- डॉक्टर तुम्हाला रुटिन युरिन अॅनालिसिस टेस्ट आणि ब्लड टेस्ट करायला सांगतात ज्यावरून तुमच्या आरोग्य स्थितीचा अंदाज त्यांना मिळू शकतो.
- लघवीच्या टेस्टमध्ये लाल रक्त पेशींचे प्रमाण आणि प्रोटीनची पातळी तपासली जाते. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कशाचा धोका आहे हे समजू शकते.
- लघवीमध्ये इनफेक्शन असेल तर त्यावरून किडनीच्या कार्याचा अंदाज घेतला जातो. ज्यामुळे त्वरीत औषधोपचार करून तुमच्या समस्येवर निदान करता येते.
- किडनीप्रमाणेच यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यासही लघवीच्या रंगात बदल होतो, म्हणूनच रक्त चाचणी करून यकृताच्या कार्याचा आढावा तज्ञ्ज घेतात आणि त्यानुसार उपचार सुरू करतात.
- जर लघवी पिवळी होण्यामागचे निदान युरिन टेस्ट अथवा ब्लड टेस्टमधे झाले नाही तर डॉक्टर सोनोग्राफी अथवा सीटीस्कॅनमधून तुमच्या आरोग्य स्थितीची पाहणी करतात.
- बऱ्याचदा प्रोस्टेट ग्रंथीचे विकार, मुतखडा अथवा इतर गंभीर आजारामुळेही लघवीचा रंग बदलतो ज्यावर वेळीच योग्य उपचार करणे गरजेचं असतं.
- जर डिहाड्रेशनमुळे तुमच्या लघवीच्या रंगात बदल झाला असेल तर डॉक्टर आहारात पाणी आणि जलयुक्त पदार्थ वाढवण्याचा सल्ला देतात.
लघवी नॉर्मल व्हावी यासाठी काय काळजी घ्यावी
लघवी नॉर्मल असेल तर तिचा रंगही कायम हलका पिवळसरच असतो. त्यामुळे रंग बदलावरून तुम्हाला तुमची लघवी नॉर्मल आहे का ते समजू शकते. लघवी नॉर्मल असावी यासाठी तुम्ही हे काही बदल जीवनशैलीत करू शकता. ज्यामुळे लघवीच्या समस्या होणार नाहीत.
- आहारात मुबलक प्रमाणात पाणी प्या, दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी उत्तम शारीरिक कार्यासाठी गरजेचे आहे.
- आहारात काकडी, कोशिंबीर, सलाड, लिंबू सरबत, नारळपाणी, जलयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा ज्यामुळे तुम्ही कायम हायड्रेट राहाल.
- आहारातून चहा, कॉफी, मद्यपान, धुम्रपान असे पदार्थ टाळा, यामुळे शरीर डिहायड्रेट होणार नाही.
- पोषक आणि संतुलित आहार घ्या, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
लघवी पिवळी होण्याची कारणे आणि निवडक प्रश्न – FAQs
प्रश्न – लघवीचा रंग बदलल्यास आरोग्यस्थितीचे निदान कसे करतात ?
उत्तर – लघवीचा रंग बदलला असेल तर डॉक्टर युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट करून तुमच्या आरोग्याचा अंदाज घेतात. या दोन्ही टेस्ट नॉर्मल असतील तर लघवीचा रंग बदलण्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका नसल्याचं समजू शकतं.
प्रश्न – लघवीचा रंग बदलणे धोक्याचे असते का ?
उत्तर – लघवीचा रंग बदलण्याचे कारण निरनिराळे असू शकते. पण कोणताही आजार नसताना, औषधे सुरू नसताना, लहान वय असलेल्या मुलांचा लघवीचा रंग बदल झाल्याचं जाणवत असेल तर वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. कारण लघवीचा रंग बदलणं बऱ्याचदा गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
प्रश्न – लघवीचा रंग बदलला तर काय घरगुती उपचार करावे ?
उत्तर – लघवीचा रंग बदलण्यामागचे कारण तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असू शकते. यासाठी लघवीचा रंग बदलेला दिसून येताच मुबलक प्रमाणात पाणी प्यावे ज्यामुळे त्रास कमी होतो.
Conclusion – लघवी पिवळी होण्याची कारणे निरनिराळी असल्याने आधी लघवी पिवळी होण्यामागचे कारण शोधावे आणि योग्य निदान करून त्यानुसार उपचार करावेत. लघवी पिवळी होण्यासोबत इतर लक्षणे असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.