ADVERTISEMENT
home / पालकत्व
Cha Aani Ch Varun Mulanchi Nave

च आणि छ वरून मुलामुलींची नावे, नवीन आणि अर्थासह (Baby Names Starting with Ch and Cha)

बाळाचा जन्म झाल्यावर घरातील आनंदाला पारावार नसतो. बाळाच्या आई-बाबांप्रमाणेच घरातील सर्व नातेवाईकांचा उत्साह जणू द्विगुणित होतो. बाळाच्या जन्मानंतर त्याच्यावर नामकरणाचा संस्कार केला जातो. भारतीय संस्कृतीत नामकरण विधी अथवा बारशाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे बाळाला नाव देण्याचा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात केला जातो. बाळाच्या बारशाच्या आधी इतर गोष्टींच्या तयारीसोबत सर्वात महत्त्वाची तयारी असते म्हणजे बाळासाठी योग्य नाव निवडणे. बाळ्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेनुसार त्याची पत्रिका हिंदू संस्कृतीत तयार केली जाते. या पत्रिकेत बाळासाठी नावराशीवरून काही आज्ञाक्षरे दिली जातात. या आज्ञाक्षरावरून बाळाचे नाव ठरवण्यात येते. जर तुमच्या बाळाचे नावराशीवरून च अथवा छ असे आज्ञाक्षर आले असेल तर तुमच्या बाळासाठी निवडा यातील एक खास नाव… यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. च वरून मुलांची नावे आणि छ वरून मुलांची नावे (Cha Varun Mulanchi Nave).

च वरून मुलांची पारंपरिक नावे (Traditional Names For Baby Boy With Ch and Cha)

Cha Varun Mulanchi Nave

Cha Varun Mulanchi Nave

च वरून मुलांची नावे (Cha Varun Mulanchi Nave) अनेक आहेत. आज जुन्या आणि पारंपरिक नावांचा ट्रेंड आहे. फॅशन म्हणून मुलांना पुन्हा जुन्या काळातील, अर्थपूर्ण अशी पारंपरिक नावे दिली जातात.  जर तुम्हाला तुमच्या बाळाला एखादे छान पारंपरिक नाव द्यायचे असेल तर तुम्ही खालील नावांमधून तुमच्या आवडीचे नाव नक्कीच निवडू शकता. 

नावेअर्थ
चाणक्यआर्य चाणक्यांचे नाव, हुशार
चारूदत्तजन्मापासून सुंदर असलेला
चारूचंद्रचंद्र, भगवान कृष्णाचा मुलगा
चंद्रशेखरचंद्राचे नाव
चकोरचंद्राची कला, एका पक्षाचे ना
चक्रदेवभगवान विष्णूचे नाव
चक्रधरभगवान कृष्णाचे नाव, परफेक्ट
चक्रसेनसैन्याचा प्रमुख
चक्रधारीचक्र धारण करणारा
चक्रवर्तीसार्वभौम राजा
चक्रेश श्रीकृष्णाचे एक नाव
चतुरसहुशार
चतूरहुशार
चतुरंगगाण्याचा एक प्रकार
चार्वाकराजाचे नाव
चारूमणीदानशूर
चित्तरंजनमनोरंजक
चिदाकाशमनरूपी आकाश
चिदानंदपरम आनंद
चिदंबरमनरूपी वस्त्र
चित्रगुप्तपापपुण्याचा हिशोब ठेवणारा
चित्रभानूसूर्य
चित्ररथगंधर्व राजा
चंद्रकांतचंद्राप्रमाणे कांती असलेला
चंद्रभानचंद्राचे किरण
चंद्रमुखचंद्राप्रमाणे चेहरा असलेला
चंद्रमोहनचंद्राप्रमाणे मोहक
चंद्रमोळीभगवान शंकर
चिमणरावजिज्ञासा असलेला माणूस
चारूहासएक राजा
चंद्रप्रकाशचंद्राचा प्रकाश
चंद्रकिशोरचंद्राप्रमाणे तरूण
चिन्मयानंदआनंदी
चंद्रभूषणचंद्राप्रमाणे गौरवण्यात आलेला
चांगदेवएक महान तपस्वी
चरणपालसेवक
चंद्रचूडभगवान शंकर
चित्रदीपदिवा
चरणवीरशूर वीर सेवक

“द” वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक

ADVERTISEMENT

च आणि छ वरून मुलांची युनिक नावे (Unique Baby Boy Names Start With Ch and Cha)

Cha Varun Mulanchi Nave

छ वरून मुलांची नावे – Cha Varun Mulanchi Nave

बाळाला जर तुम्हाला अर्थपूर्ण आणि युनिक ना द्यायचं असेल तर च आणि छ आद्याक्षरावरून  तुम्ही बाळाला आम्ही शेअर केलेल्या खालील काही नावांपैकी एक छान नाव नक्कीच देऊ शकता. च वरून मुलांची नावे Cha Varun Mulanchi Nave) तुम्हाला नक्कीच आवडतील.

च आणि छ वरून मुलांची युनिक नावे
नावेअर्थ
चैतन्यजाणिव
चिद्धनज्ञानी
चित्रेशएक राजा
चिरूषदेव
चमनबाग
चाक्षणचांगला क्षण
चरणपाय
चार्वाकएक ऋषी
चंदनएक सुंगधी वृक्ष
चिंतकविचार करणारा
चैत्रहिंदू महिना
चंदरचंद्र
च्यवनतरूण
चंचलउत्साही
चिन्मयएका ऋषीचे नाव
चिरागदिवा
चार्लीआवडता
चितरेशचंद्र
चित्रवर्माकौरवामधील एक कौरव
चिंरजीवदीर्घायुष्य असलेला
चिरंतनशाश्वत
चंपकचाफ्याचे फुल
चिंतामणीचिंता नष्ट करणारे रत्न अथवा मणी
चांगदेवएक योगी
चंद्रहासचंद्राप्रमाणे हास्य
चंडीदासचंडीका देवीचा भक्त
चंद्रकेतूलक्ष्मणाचा मुलगा
चुंबकआकर्षित करणारा
चंद्रनाथचंद्र
चकोरचंद्रावर प्रेम करणारा
छबिलदाससावलीप्रमाणे साथ देणारा सेवक
छगनएक नाव
छनन लालएक नाव
छत्रधरआधार देणारे
छत्रपतीमानाची पदवी, राजे
छत्र शंकरभगवान शंकराचे नाव
छत्रसेनडोक्यावर छत्र धरणारा
छायांकचंद्र

B Varun Mulanchi Nave Marathi

ADVERTISEMENT

च आणि छ वरून मुलींची युनिक नावे (Unique Baby Girl Names starting with Ch and Cha)

Unique Baby Girl Names starting with Ch and Cha

च आणि छ वरून मुलींची युनिक नावे

मुलगा असो वा मुलगी आपल्या बाळाचे नाव थोडं युनिक आणि हटके असावं असं प्रत्येकाला वाटत  असतं. यासाठीच बाळाच्या नावराशीवरून आलेल्या नावावरून तुम्ही खूप रिसर्च करून एक छान नाव निवडता. तुमच्या घरात जन्माला आलेल्या मुलामुलींसाठी आम्ही काही निवडक नावे शेअर करत आहोत.  च वरून मुलांची नावे (Cha Varun Mulanchi Nave) निवडण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा. 

नावेअर्थ
चित्रगंधासुंगधी
चिन्मयीकायमस्वरूपी
चंद्रकांताचंद्राप्रमाणे कांती असलेली
चारूसुंदर
चित्रामनमोहक
चंद्रजाचंद्राप्रमाणे दिसणारी
चांदणीचांदणी
चरण्यायोग्य वागणूक असलेली
चारूलसुंदर
चैत्रावलीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चैत्रवीचैत्रात जन्माला आलेली
चकोरीचंद्राच्या प्रेमात पडलेला पक्षी
चंद्रिकाचंद्राची कोर
चंद्रिमाचंद्रासारखी दिसणारी
चंजनासुंदर
चंद्रकलाचंद्राची कोर
चंद्राकीमोर
चरित्राचांगले चारित्र्य
चक्रिकालक्ष्मी
चैत्रिकाहुशार
चक्रणीचंद्राची शक्ती
चमेलीएक सुंगधी फुल
चंपिकाएक सुगंधी फुल
चंपाएक सुंगधी फुल
चामिनीअज्ञात
चंपिकाएक सुंगधी फुल
चतूराहुशार
चिदाक्षादिव्य चेतना
चिंतनाविचार करणारी
चिरस्वीमनमोहक हसणारी
चिदाबंरीगाण्याचा एक राग
चित्रकलाएक विद्या
चित्रांगीसुंदर दिसणारी
चित्रलेखाफोटो
छविप्रतिबिंब
छुटकीलहान मुलगी
छमछमसुमधूर आवाज
छनकआवाज
छबिप्रतिमा
छायावतीएका रागाचे नाव
छायासावली

मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे

चे वरून मुली मुलांची नवीन नावे (New Names For Baby Boy Start With Che)

Cha Varun Mulanchi Nave

Cha Varun Mulanchi Nave

ADVERTISEMENT

च आणि छ प्रमाणेच चे वरूनही मुलामुलींची नावे तुम्ही ठेवू शकता. बाळाच्या बारश्याची तारीख जवळ आली असेल आणि बाळाचं नावराशीवरून आलेलं नाव चे वरून असेल ही नावे तुम्हाला नक्कीच आवडतील. 

नावेअर्थ
चेरीएक फळ
चैत्रीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चैत्राकिरण
चैतालीचैत्र महिन्यात जन्माला आलेली
चैतन्यासजीव
चैरावलीचैत्र महिन्याची पौर्णिमा
चेलनखोल जाणिव
चेष्टाप्रयत्न
चेतकीजाणिव
चेतसमन
चेतनाचैतन्य
चेल्लमाप्रिय
चेतकीसजीव
चेतसाजाणिव
चेतकमहाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव
चेतलजाणिव
चैनप्रीतचंद्राच्या प्रेमात पडलेली
चेरीलचेरीचे फळ
चेरीलीनसुंदर
चेरीसागोड गाणे म्हणणारी
चेल्सीजहाजाचे बंदर
चेरीशखजिना
चेतनचैतन्य असलेला
चेसीशिकारी
चेरिसपरोपकारी

र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह घ्या जाणून

आम्ही शेअर केलेली च वरून मुलांची नावे (Cha Varun Mulanchi Nave) छ वरून मुलांची नावे आणि चे वरून मुलामुलींची नावे तुम्हाला कशी वाटली आणि त्यातील कोणते नाव तुम्ही तुमच्या बाळासाठी निवडले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

19 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT