अनेक जणांकडून आपण चालता चालता चक्कर येऊन पडले अथवा अचानक उभं राहिल्यावर भोवळ आली असं म्हणताना ऐकताना. चक्कर आल्यानंतर शारीरिक संतुलन ठेवण्याची समस्याही अनेक जणांना असते. पण असं नियमित होत असेल तर तुम्हाला व्हर्टिगो (Vertigo In Marathi) असण्याचीही शक्यता असते. बऱ्याच जणांना कधीतरी नुसती चक्कर येते किंवा अचानक गरगरतं. पण चक्कर येणे कारणे नक्की काय आहेत आणि व्हर्टिगो असेल तर त्याचा पुढे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते हे जाणून घेणे गरजेचे आहे. चक्कर येणे घरगुती उपाय (Chakkar Yene) आपण या लेखातून पाहणार आहोत. तुम्हालाही चक्कर येण्याचा त्रास असेल तर तुम्ही त्यावर आम्ही देत असणाऱ्या घरगुती उपायांचा (Home Remedies For Vertigo) नक्की उपयोग करून पाहा. पण तत्पूर्वी चक्कर येणे कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.
चक्कर येणे कारणे (Causes Of Vertigo In Marathi)
व्हर्टिगोचे दोन प्रकार असतात, पेरिफेरल (Peripheral Vertigo) आणि सेंट्रल (Central Vertigo). त्यामुळे त्याची कारणेही त्याप्रमाणेच असतात. चक्कर येत (Chakkar Yene) असेल तर त्याची नक्की काय कारणे असू शकतात पाहूया.
- कॅल्शियमचे लहान लहान कण अंतर्गत भागात जमा होतात आणि त्यामुळे कानापासून ते मेंदूपर्यंत पोहचणारे संदेश प्रभावित होतात आणि त्यामुळे संतुलन बिघडते आणि चक्कर येते. अशी चक्कर येणे अत्यंत सामान्य मानले जाते. वेस्टिबुलरशी निगडीत आजारामुळे ही चक्कर येते जी पेरिफेरल व्हर्टिगोशी निगडीत समजले जाते.
- डोक्यावर मार बसल्यास
- वेस्टिबुलर तंत्राला सूज आल्यास
- कानामध्ये आतल्या बाजूने सूज असल्यास अथवा जळजळ होत असल्यास
- बेस्टिब्युलरवर ताण आल्यास
सेंट्रल व्हर्टिगोचीदेखील (Vartigo In Marathi) काही कारणे आहेत. ती काय आहेत ते पाहूया.
- रक्तवाहिन्यांसंबंधी रोग असल्यास
- काही औषधे, एस्प्रिनचा दुष्प्रभाव होणे
- दारूचे सेवन केल्यामुळे
- मल्टिपल स्क्लेरोसिस आजार असल्यास (हाडांचा आजार)
- स्ट्रोक समस्या असल्यास
- कॅन्सर अथवा ट्युमर असल्यास
- मायग्रेनचा त्रास असल्यास
चक्कर येणे लक्षणे (Chakkar Yene Symptoms In Marathi)
चक्कर येण्याची कारणे आपण पाहिली आता याची नेमकी लक्षणे काय असतात ते आपण जाणून घेऊया. डोकं गरगरणे आणि मळमळणे हे चक्कर येण्याचे अत्यंत कॉमन लक्षण आहे. मात्र याशिवायदेखील काही लक्षणे आहेत. जी तुम्हाला व्हर्टिगो असल्यास, दिसून येतात
- कानाने व्यवस्थित ऐकू न येणे
- कानामध्ये सतत शिटीसारखा आवाज घुमत राहणे
- जेवण जेवताना घास गिळण्याची समस्या
- समोरचे व्यवस्थित न दिसणे
- मोशन सिकनेस (Motion Sickness)
- सतत डोकं दुखणे
- बोलताना त्रास होणे अथवा शब्द जड होणे
- सतत थकवा येणे आणि मळमळणे
- सतत मळमळून उलटी होणे
चक्कर येणे घरगुती उपाय (Home Remedies For Vertigo In Marathi)
डोकं गरगरणे, चक्कर येणे (Chakkar Yene) अथवा मळमळणे या हलक्या फुलक्या लक्षणांंवर आपण घरगुती उपाय करू शकता. लक्षात ठेवा की, घरगुती उपाय चक्कर येणे (Chakkar Yene) कमी करू शकते, पण तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्लादेखील घ्यावा. जाणून घेऊया चक्कर येणे घरगुती उपाय.
पेपरमिंट ऑईल (Peppermint Oil)
साहित्य
- 2-3 थेंब पेपरमिंट ऑईल
- एक चमचा बदामाचे तेल
वापरण्याची पद्धत
- दोन्ही तेल मिक्स करून घ्या
- त्यानंतर आपल्या कपाळावर आणि मानेला मागच्या बाजूने हलक्या हाताने लाऊन मसाज करा
कसे ठरते फायदेशीर चक्कर येण्याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी असते हे आम्ही वरच तुम्हाला सांगितले आहे. पेपरमिंट ऑईलने तुमची डोकेदुखी थांबण्यास मदत मिळते. त्यामुळे चक्कर येण्याचा त्रास असेल तर तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. डोकेदुखी थांबवून चक्कर थांबविण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता. चक्कर येणे घरगुती उपाय यासाठी हा उत्तम उपाय आहे.
नारळाचे पाणी (Nariyal Pani)
साहित्य
- शहाण्याचे अथवा नारळाचे पाणी
वापरण्याची पद्धत
- सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळ पाणी पिणे
कसे ठरते फायदेशीर
नारळाचे अथवा शहाळ्याचे पाणी हे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. शरीरातील उष्णता कमी करून चक्कर येण्याचे प्रमाण कमी करण्याचे काम नारळाचे पाणी करते. तसंच यामध्ये नैसर्गिक ऊर्जेचे प्रमाण अधिक असल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी झाली असेल तरीही ती योग्य प्रमाणात ठेऊन तुम्हाला यातून सावरण्याचे काम नारळाचे पाणी करते.
आवळा रस (Amla juice)
साहित्य
- अर्धा कप कोथिंबीर रस
- 2 चमचा आवळ्याचा रस
वापरण्याची पद्धत
- कोथिंबीर रस आणि आवळा रस मिक्स करून घ्या
- दिवसातून दोन वेळा दोन दोन चमचे प्या
कसे ठरते फायदेशीर
आवळ्यामध्ये विटामिन सी असते जे शरीराला योग्य ऊर्जा देण्याचे काम करते. आवळ्याच्या रसाने डोकेदुखी आणि चक्कर येणे थांबते. त्यामुळे तुम्हाला जर नियमित चक्कर येण्याचा त्रास असेल तर तुम्ही किमान महिन्यातून दोन वेळा तरी हा घरगुती उपाय नक्की करून त्याचा परिणाम पाहा.
ग्रेपफ्रुट ऑईल (Grapefruit Oil)
साहित्य
- 2-3 थेंब ग्रेपफ्रुट ऑईल
- डिफ्युजर
वापरण्याची पद्धत
- ग्रेपफ्रुट ऑईल डिफ्युजरमध्ये घाला आणि तुमच्या रूममध्ये ठेवा
कसे ठरते फायदेशीर
यामध्ये काही शंका नाही की, ग्रेपफ्रुटचे अनेक फायदे आहेत. ग्रेपफ्रुटप्रमाणेच त्याच्या तेलाचाही फायदा होतो. यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असून सूज समस्या असल्यास, त्यातून सुटका मिळण्यास मदत मिळते. कानामध्ये सूज आल्याने चक्कर येण्याची समस्या होते हे आपण वर जाणून घेतले आहे. त्यामुळे तुम्ही सूज कमी होण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. वर्टिगोचे हलके लक्षण असल्यास तुम्ही नक्कीच याचा उपयोग करून घेऊ शकता.
तुळशीचे तेल (Tulsi Oil)
साहित्य
- 2-3 थेंब तुळशीचे तेल
- एक ते दोन थेंब सायप्रस तेल
- डिफ्युजर
वापरण्याची पद्धत
- दोन्ही तेल मिक्स करून घ्या
- त्यानंतर डिफ्युजरमध्ये घाला आणि तुमच्या रूममध्ये ठेवा
कसे ठरते फायदेशीर
तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि तुळशीचे अनेक फायदे आहे. तुळशीच्या पानाने सौंदर्य खुलते. ताप, सर्दी खोकला, उल्टी, पोटासंबंधित तक्रारींसाठी तुळस नेहमीच एक गुणकारी औषध म्हणून काम करते. तुळशीचे तेलही तितकेच लाभदायक ठरते. चक्कर येणे (Chakkar Yene) समस्या असेल तर मायग्रेनची तिव्रता कमी करण्याचे काम तुळशीचे तेल करते. डिफ्जुरमध्ये घालून उपयोग करण्यासह तुम्ही डोक्याला तुळशीचे तेल लाऊनही याचा उपयोग करून घेऊ शकता. चक्कर येणे घरगुती उपायांचा शोध घेत असाल तर याचा उपयोग करून पाहा.
क्लारी सेज ऑईल (Clery Sej Oil)
साहित्य
- क्लारी सेज तेल
- डिफ्युजर
वापरण्याची पद्धत
- क्लारी सेजचे काही थेंब डिफ्युजरमध्ये घाला आणि रूममध्ये ठेवा
कसे ठरते फायदेशीर
क्लारी सेज तेल हे अँटिइन्फ्लेमेटरी प्रभाव असणारे तेल आहे. यानुसार शरीरातील सूज कमी होऊन चक्कर कमी करण्यास मदत करते. कानामध्ये सूज येऊन चक्कर येत असेल तर तुम्ही याचा नक्की उपयोग करून घेऊ शकता.
दालचिनी (Cardamom)
साहित्य
- दालचिनीचा तुकडा
- 3-4 लवंग
- पाणी
वापरण्याची पद्धत
- पाण्यात दालचिनी आणि लवंग घालून उकळून घ्या आणि याचा चहा तयार करा
- हा गरमागरम दालचिनीचा चहा दिवसातून एक वा दोन वेळा प्या
कसे ठरते फायदेशीर
डोकं दुखून चक्कर येत असेल तर तुम्ही या दालचिनीच्या चहाचा नक्की उपयोग करून घेऊ शकता. दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल्स अँटिऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाबावर नियंत्रण (Blood Pressure Control) मिळवून हृदयाशी संबंधित आजारापासूनही रक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे चक्कर येत असेल तरीही तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता.
आले (Ginger)
साहित्य
- आल्याचा तुकडा
- एक कप दूध
- अर्धा चमचा चहा पावडर
- साखर (स्वादाप्रमाणे)
वापरण्याची पद्धत
- दूध उकळून घ्या आणि त्यात चहा पावडर आणि आले किसून घाला
- त्यानंतर साखर आणि चहा पावडर घालून व्यवस्थित उकळा
- उकळल्यावर चहा गाळून घ्या आणि प्या
- आल्याचे किस तुम्ही नुसतादेखील चाऊ शकता
कसे ठरते फायदेशीर
निरोगी शरीरासाठी आल्याचे फायदे अनेक आहेत. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे आले हे चक्कर येत असेल तर उत्तम उपाय आहे. आल्यामध्ये असणारा अँटीनॉशिया गुण हा चक्कर येण्यापासून वाचवतो आणि उलटी आणि मळमळ होत असेल तर दूर ठेवण्यास मदत करतो.
चक्कर येत असेल तर लिंबाचा रस (Lime Juice For Vartigo)
साहित्य
- लिंबाचा रस
- पाणी
वापरण्याची पद्धत
- थंड पाण्यामध्ये लिंबू पिळून त्याचे सेवन करा
कसे ठरते फायदेशीर
कधी कधी उन्हातून आल्यावरही चक्कर येते. ऊन सहन होत नाही. अशावेळी लिंबाच्या रसातील विटामिन सी हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. येणारी चक्कर घालविण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस यावेळी घ्यावा. तुम्हाला हवे असेल तर साखरही तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. चक्कर येत असल्यास यावर हा उत्तम घरगुती उपाय आहे.
अक्युपंक्चर (Acupuncture)
अक्युपंक्चर हा देखील चक्कर येण्यावर एक उत्तम घरगुती उपाय आहे. याचा कसा उपयोग करायचा ते जाणून घेऊया.
- एका खुर्चीवर रूग्णाला बसवावे आणि त्याच्या कपाळावर साधारण 45 डिग्री डोकं चेपावे
- कधी उजवीकडून डावीकडे तर कधी डावीकडून उजवीकडे ही क्रिया करावी
- त्यानंतर मध्ये 30 सेकंद थांबून पुन्ही ही क्रिया करावी
- असे साधारण 10-15 मिनिट्स करावे
- यामुळे चक्कर येण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते
वर्टिगो असणाऱ्या रुग्णांसाठी योग्य आहार (Diet For Vertigo In Marathi)
ज्यांना सतत चक्कर येण्याचा त्रास असतो अशा व्यक्तींना फॅट आणि कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला देण्यात येतो. पण अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात फायबरची मात्रा वाढवावी. चक्कर येणे कमी करण्यासाठी असा आहार उत्तम ठरतो.
- सफरचंद, केळे, नाशपाती अर्थात पेर या फळांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. तसंच तुम्ही गव्हाचा ब्रेड, ब्राऊन राईस आणि ओटमीलचा खाण्यात समावेश करावा
- गाजर, पालक, उकडलेले बटाटे, मशरूम आणि दुधी याचादेखील आहारात समावेश करावा
- विटामिन बी – 12 च्या कमतरतेमुळे चक्कर येण्याचा धोका वाढतो त्यामुळे दूध, केळे, राजमा याचाही समावेश करून घ्यावा
- आहारातील मीठ कमी करावे. त्यामुळे हेम, बेकन, सलामी, पापड, लोणचे, ढोकळा आणि बेकिंग करण्यात येणारे पदार्थ सहसा टाळावेत
- कॅफेन आणि दारूचे सेवनही टाळावे
योग्य व्यायाम (Exercise For Vertigo In Marathi)
चक्कर येण्यापासून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही नियमित काही व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणते व्यायाम करावेत जाणून घ्या.
स्टँडिंग अपराईट (Standing Upright) – याला रोमबर्ग एक्सरसाईज असेही म्हणतात. यासाठी तुम्ही भिंतीला पाठ टेकवा आणि सरळ उभे राहा आणि आधारासाठी पुढे खुर्ची घ्या. तुमचे हात अगदी ताठ सरळ ठेवा. तुम्ही 30 सेकंद या अवस्थेत उभे राहा आणि असे पाच वेळा करा.
पुढे आणि मागच्या दिशेने झुलणे (Swaying Back And Forth) – स्टँडिंग अपराईटप्रमाणे भिंतीच्या आधाराने उभे राहा. आपले पाय खांद्याच्या बरोबरीने वर घ्या आणि हात खाली ठेवा. आता आपले शरीर पुढे मागे करून तळहाताचा आधार घेत झुला. या परिस्थितीत तुमचे हिप्स व्यवस्थित सरळ रेषेत यायला हवेत.
डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला झुकणे (Toe Touching Exercise) – आता तुम्ही दोन्ही पाय फाकवा आणि डाव्या बाजूकडून पहिले उजव्या बाजूला अंगठ्याला हात लावा आणि मग तसेच दुसऱ्या बाजूनही कार. यादरम्यान तुमचा दुसरा हात सरळ रेषेत वरच्या बाजूला यायला हवा.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. वर्टिगोची समस्या साधारण कधीपर्यंत राहते?
चक्कर काही मिनिट्ससाठी येऊ शकते अथवा काही तासांसाठीही ही समस्या राहू शकते. पण काही मिनिट्समध्ये ही समस्या कमी होते.
2. चक्कर सहज थांबवता येऊ शकते का?
हो तुम्ही घरगुती उपाय करूनही चक्कर थांबवू शकता. लक्षण जाणवू लागल्यावर त्वरीत इलाज करा. तसंच अत्यंत तीव्र उन्हात जाऊ नका. अचानक कोणत्याही ठिकाणी बसून उठू नका वा झोपेतून झटकन उठून बसू नका.
3. चक्कर येत असेल तर मधाचे सेवन करता येऊ शकते का?
चक्कर येत असेल तर तुम्ही मधाचादेखील उपयोग करून घेऊ शकता. मधाचे चाटण तुम्हाला चक्कर येत असेल तर नक्कीच उपयोगी ठरते.