ADVERTISEMENT
home / मनोरंजन
chandramukhi-sawal-jawab-song-jugalbandi-between-amruta-khanvilkar-and-prajkta-maliin-marathi

‘चंद्रमुखी’मध्ये रंगणार अमृता- प्राजक्ताची जुगलबंदी

सध्या सर्वत्र ‘चंद्रमुखी’चा (Chandramukhi) बोलबाला आहे. या सौंदर्यवतीने सर्वांवर जादू केली आहे. आपल्या दिलखेचक सौंदर्याने, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ (Chandra) आता सवाल जवाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि प्राजक्ता माळीमध्ये (Prajakta Mali) रंगलेली जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे. यापूर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. आता सवाल जवाबचा फड रंगला आहे. या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून त्याला अजय-अतुल यांचे दमदार संगीत लाभले आहे. तर मधुरा दातार, प्रियांका  बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजाने रंगत आणली आहे. दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार आता प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. 

लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओकने (Prasad Oak) सांगितले की, ‘’ या चित्रपटात आम्ही श्रृंगारीक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार हाताळले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृद्ध वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेल.’’ ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) म्हणतात, ‘’लावणी ही आपली लोककला आहे. ज्यांचे जतन होणे अत्यंत गरजेचे आहे. सवाल जवाबचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून लावणीप्रधान चित्रपटातून कालबाह्य झाला होता. मात्र ‘चंद्रमुखी’च्या माध्यमातून आम्ही तो पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.’’

29 एप्रिलला चित्रपटगृहात

प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे (Adinath Kothare), मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande), मोहन आगाशे (Mohan Agashe), राजेंद्र शिसतकर (Rajendra Shisatkar), समीर चौघुले (Sameer Chougule), अशोक शिंदे (Ashok Shinde), नेहा दंडाळे, राधा सागर (Radhe Sagar) यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

कलाकारांकडून होत आहे स्तुती 

चंद्रमुखी चित्रपटाची केवळ प्रेक्षकांनाच उत्सुकता नाही तर बॉलीवूड गाजवणारे मराठी कलाकार असोत अथवा हिंदी कलाकार यांनीही चंद्रमुखीला भरभरून प्रतिसाद दिला आहे. माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनीदेखील चित्रपटाची उत्सुकता असल्याचे ट्विट केले आहे आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची उत्सुकता असल्याचे सांगितले आहे. इतकं नाही तर भारती सिंह (Bharti Singh) नेदेखील अमृता खानविलकरला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आशिष पाटील (Ashish Patil) ने केलेल्या सर्व लावण्या सुंदर असल्याचेही म्हटले आहे आणि हा चित्रपट नक्की पाहणार असल्याचेही सांगितले आहे. याशिवाय अमृताची मैत्रीण अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) देखील अमृताच्या या चित्रपटाबद्दल आणि तिच्या आतापर्यंतच्या मेहनतीबद्दल पोस्ट करत तिची स्तुती केली आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT