साऊथचा सुपरस्टार धनुषने साऊथच्या चित्रपटांमध्ये आपली चमक दाखवलीच आहे. यासोबतच त्याने बॉलिवूडमध्येही दमदार पाऊल टाकले आहे आणि आता हा अभिनेता हॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. धनुष नेटफ्लिक्सच्या द ग्रे मॅनमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मार्क ग्रेनीच्या 2009 च्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट ऍक्शन-थ्रिलर म्हणून रिमेक करण्यात आला आहे. साऊथ सुपरस्टार अभिनेता धनुष सध्या त्याच्या हॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. धनुषचा हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट असल्याने त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटासाठी आतुर असलेल्या चाहत्यांसाठी, नेटफ्लिक्सने सोमवारी चित्रपटाच्या प्रमुख चार स्टार्सच्या पोस्टर्सचे अनावरण केले.
धनुषचे पात्र – घातक शक्ती (लिथल फोर्स)
नेटफ्लिक्सने धनुष, रायन गॉसलिंग, ख्रिस इव्हान्स आणि ऍना डी अरमास यांच्या पात्रांच्या पोस्टर्सचे अनावरण करून या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. त्यांनी धनुषच्या पात्राचे वर्णन लिथल फोर्स म्हणजेच घातक शक्ती असे केले, तर रायन गॉस्लिंगचे पात्र अनकॅचबल असेल. चित्रपटात ख्रिस इव्हान्स द अनस्टॉपेबल आणि ऍना डी आर्मास द अनट्रेसेबलच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे कॅरेक्टर पोस्टर रिलीज करताना नेटफ्लिक्सने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. नेटफ्लिक्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘द ग्रे मॅन’ चित्रपटाचा ट्रेलर आज 24 मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट आऊट झाल्यामुळे आता चाहते या बहुप्रतिक्षित चित्रपटाची झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
कलाकारांचा फर्स्ट लूक झाला होता जाहीर
नेटफ्लिक्सने यापूर्वी चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक देखील शेअर केला होता, ज्यामध्ये धनुष सूटमध्ये दिसला होता. नेटफ्लिक्स इंडियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये धनुष एका कारच्या वर दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. चित्रपटातून दिसणारा अभिनेता धनुषचा फर्स्ट लूक पाहून चाहते खूप आनंदी आणि रोमांचित झाले आहेत. द ग्रे मॅन हा चित्रपट अँथनी आणि जो रुसो दिग्दर्शित अमेरिकन ऍक्शन थ्रिलर असेल. या चित्रपटात रायन गॉसलिंग, ख्रिस इव्हान्स, ऍना डी आर्मास यांच्याबरोबरच रेगे-जीन पेज, जेसिका हेनविक, बिली बॉब थॉर्नटन आणि वॅगनर मौरा यांच्याही भूमिका आहेत. हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे ज्याची कथा कोर्ट जेन्ट्री (रायन),या फ्रीलान्स मारेकरी आणि माजी CIA ऑपरेटिव्ह यांच्याभोवती फिरते.
धनुषचा द ग्रे मॅन
मंगळवारी, नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम हँडलवर अँथनी आणि जो रुसो दिग्दर्शित हॉलिवूड डेब्यू ‘द ग्रे मॅन’ मधील धनुषचा पहिला लूक शेअर केला.मार्क ग्रेनीच्या 2009 साली आलेल्या द ग्रे मॅन या कादंबरीवर आधारित, “द ग्रे मॅन” हा एक अॅक्शन-थ्रिलर आहे. हा चित्रपट मारेकरी आणि माजी CIA ऑपरेटिव्ह कोर्ट जेन्ट्री या पात्राभोवती फिरतो . निर्मात्यांनी ख्रिस, रायन, ऍना डे (डॅनी मिरांडा हे पात्र) आणि कारमाइकल यांचा देखील पात्रपरिचय करून दिला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत धनुषने सांगितले होते की, मला ग्रे मॅनमध्ये काम करायला आवडते आहे आणि रुसो बंधूंसोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव आहे. या चित्रपटाद्वारे मला खूप काही शिकायला मिळाले आहे.
धनुष शेवटचा 2022 मध्ये तामिळ ऍक्शन चित्रपट ‘मारन’ मध्ये दिसला होता, ज्यामध्ये मालविका मोहननची देखील भूमिका होती. कार्तिक नरेन लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट डिस्ने+ हॉटस्टार वर 11 मार्च रोजी तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला होता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक