ADVERTISEMENT
home / Fitness
वापरा घरातील या वस्तू, व्यायामासाठी नाही गरज जिम टूल्सची

वापरा घरातील या वस्तू, व्यायामासाठी नाही गरज जिम टूल्सची

निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे…पण आजकालची जीवनशैली इतकी धकाधकीची झाली आहे की त्यासाठी जिममध्ये जाण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळेलच असं नाही. याला पर्याय म्हणून वर्क फ्रॉम होमप्रमाणे घरातूनच व्यायाम करण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. वास्तविक आजकाल घरातून व्यायाम करण्यासाठी बाजारात अनेक जिम टूल्स विकत मिळतात. ज्यांच्या मदतीने तुम्ही घरी व्यायाम करू शकता. पण घरात या वस्तूंची अडचण होत असेल अथवा सुरवातीलाच यासाठी फार खर्च करायचा नसेल तर तुम्ही घरातील काही छोट्या मोठ्या वस्तू व्यायामासाठी वापरू शकता. यासाठी घरातील या वस्तूंच्या मदतीने करा घरी व्यायामाला सुरूवात.

व्यायामासाठी वापरा घरातील या वस्तू

व्यायाम करण्याचा निर्णय घेतल्यावर लगेच जिम टूल्सवर पैसे खर्च करायचे नसतील तर या घरातील वस्तू  व्यायाम करण्यासाठी उत्तम आहेत.

खुर्ची – 

आपल्या सर्वांच्या घरात टेबल आणि खुर्ची असतेच. खुर्चीचा वापर बसण्याची कराच पण तिचा वापर तुम्ही व्यायामासाठीही नक्कीच करू शकता. खुर्चीचा वापर करून तुम्ही चेअर स्क्वाट्स, क्रॉस लेग स्क्वाट्स, लेग लिफ्टिंग अशा छोट्या छोट्या एक्सरसाईज घरीच करू शकता. पाठीचा, पायाचा व्यायाम करण्यासाठी खुर्ची तुमच्या खूप फायद्याची आहे. विशेष म्हणजे वर्क फ्रॉम होम करता करता थोडा वेळ तुम्ही व्यायामासाठीही यातून काढू शकता.

जिना –

आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथला जिना तुम्ही व्यायामासाठी वापरू शकता. जर तुम्ही एखाद्या मोठ्या घरात राहत असाल आणि तुमच्या घरातच जिना असेल तर तुमचं काम अगदी सोपं होईल. फिट राहण्यासाठी या जिन्यावरून ठराविक वेळेत चढण्याल – उतरण्याचा व्यायाम करा. तुम्ही जिन्यावर पुश अप, स्टेअर लंजेज, हॉप्स, ट्रायसेप्स पुश अप असे व्यायाम करू शकता. फिट राहण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा, वापरा ट्रिक्स – Exercises To Gain Weight In Marathi

ADVERTISEMENT

तुमची बॅग – 

तुमच्याकडे तुमची बॅग पॅक असेल तर तुम्ही वेटसाठी तुमच्या बॅगचा वापर करू शकता. जिना चढता आणि उतरताना या बॅगेत थोडं सामान भरा आणि पाठीमागे अडकवा. अशा प्रकारे तुम्ही लंजेज, स्व्क्वाट्स, पुशअप करू शकता. ‘एरोबिक’ चे हे व्यायाम प्रकार तुम्हाला स्वस्त ठेवतील (Best Aerobic Exercises In Marathi)

पाण्याची बाटली –

वेट लिफ्टिंगसाठी तुमच्याकडे डंबल्स नसतील तर काळजी करू नका. घरातील एक मोठी पाण्याची बाटली भरून त्याने व्यायाम करा. पाण्याच्या बाटलीच्या वजनाचं इतर सामानही तुम्ही वेटसाठी वापरू शकता. एखादं अर्धा किलो अथवा एक किलो वजनाचं पॅकेट तुम्ही हातात पकडून व्यायाम करू शकता. 

सोफा –

खुर्चीप्रमाणेच सोफ्याचा वापरही तुम्ही व्यायामासाठी करू शकता. सोफ्यावर बॅलेन्स ठेवत तुम्ही क्रंचेस, लेग एक्सरसाईझ, पुशअप, स्क्वाटस करू शकता. बॉडी फिटनेससाठी जिम टूल्स नाही तु्मची व्यायाम करण्याची इच्छा महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्या घरात ज्या वस्तू आहेत त्या वापरा आणि व्यायाम करा. 

टॉवेल –

योगासने अथवा वर्कआऊट करण्यासाठी तुम्हाला योगा मॅट खरेदी करावी लागेल. पण सध्या तुम्हाला योगा मॅट खरेदी करायची नसेल तर तुम्ही घरातील एक मोठा टॉवेल यासाठी वापरू शकता. शक्य असेल तर घरातील दोन मोठे टॉवेल एकत्र शिवून घ्या आणि घरीच सुती योगा मॅट तयार करा. 

ADVERTISEMENT
22 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT