प्रसिद्ध अभिनेत्री अथवा अभिनेत्याचे ड्यप्लिकेट आपण नेहमीच पाहत असतो. बॉलीवूड सेलिब्रेटीजप्रमाणे दिसण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करत असतात. आतपर्यंत शाहरूख खान, आलिया भट, अनुष्का शर्मा, सलमान खान, अमिताभ बच्चन, संजय दत्त, करिना कपूर, ऐश्वर्या रॉय अशा अनेक कलाकारांचे ड्युप्लिकेट आपण पाहिले असतील. आता या यादीत आणखी एका सेलिब्रेटीचे नाव जोडले गेले आहे. सध्या दीपिका पादुकोणसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. असं म्हणतात जगात एकूण सात माणसं एका माणसासारखी दिसणारी आढळू शकतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दीपिकासारखी दिसणारी ही व्यक्ती कोणी साधी सुधी नसून ती देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कारण साऊथ अभिनेत्री अमला पॉल सध्या तिच्या दीपिकासारख्या दिसण्यावरून चर्चेत आहे.
कोण आहे अमला पॉल
अमला पॉल साऊथची एक लेकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटात काम केले आहे. अमलाने तिच्या करिअरची सुरुवात 2009 साली नीलाथमारा या चित्रपटाने केली होती. या चित्रपटात तिची सहायक अभिनेत्रीची भूमिका होती. मात्र त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. वीरसेकरण, सिंधु समावेली, मीणा, बेजवाडा अशा अनेक चित्रपटातून अमला झळकली आहे. यातील मीणा या चित्रपटातून तिला स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली होती. शिवाय तिच्या उत्तम अभिनयसाठी तिला या चित्रपटाचे अनेक पुरस्कार मिळाले. सध्या मात्र अमला दीपिकासारखं दिसण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
अमला बोल्डनेसमुळे झाली प्रसिद्ध
दीपिका सारखं दिसण्यासोबतच अमलाचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमलाने जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हापासूनच तिची तुलना दीपिकासोबत केली जात होती. मात्र आता सध्या ती दीपिकासारखे बोल्ड फोटो शेअर करण्यामुळे पुन्हा चर्चेत आहे. खरंतर एखाद्या अभिनेत्रीची तुलना दुसऱ्या अभिनेत्रीशी करणं कलाकारांना रूचत नाही. मात्र अमला याला अपवाद आहे. कारण तिची तुलना दीपिकासोबत होते ही गोष्ट तिला सुखावणारी आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिने याबाबत मोकळेपणे खुलासा केला आहे. अमलाने तिच्या एका चित्रपटात न्यूड सीनही दिला होता. तेव्हा मात्र तिला चारीबाजूने ट्रोल करण्यात आलं होतं. दीपिकाप्रमाणेच अभिनय आणि सौंदर्य या दोन्हीबाबतीत अमला लोकप्रिय आहे. सुंदर दिसण्यासोबतच तिने चांगल्या भूमिका साकारून तिने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. अमलाचे फिल्मी करिअर खूपच शानदार ठरले आहे. तिला 2011 साली तर अनेक पुरस्कार मिळालेच पण 2012 साली तिने फिल्मफेअर पुरस्कारही मिळवला होता. तिने तिच्या तेरा वर्षांच्या करिअरमध्ये आजवर चित्रपटससृष्टीत चांगलं नाव कमावलं आहे. दीपिका पादुकोणचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे आता अमलाच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमलानेही आता तिचं दिसणं दीपिकाप्रमाणे करण्यासाठी लुक्स आणि फॅशनवर खूप काम केलेलं दिसून येत आहे. त्यामुळे अमलाचे फोटो आणि तिचं दिसणं हा चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक नवा चर्चेचा विषय सध्या बनला आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
नव्या फोटोशूटमध्ये श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहते फिदा
समीरा रेड्डीने पुन्हा शेअर केल्या बॉडी पॉझिटिव्हिटीबाबत खास टिप्स
मोनालिसाचं घराचं स्वप्नं पूर्ण, आनंदाने झाली व्यक्त