बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही बॉलीवूडची आवडती जोडी आहे. त्यानी कोणतेही फोटो शेअर केले किंवा काहीही केले तरी लगेच त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होते आणि कमेंट्सचा वर्षावही होतो. नुकताच असाच एक फोटो शेअर करून दीपिका पादुकोणने चाहत्यांचे लक्षही वेधून घेतले आहे आणि तिच्यावर प्रश्नांचा भडीमारही होत आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या घरात राहून सगळेच जण शेफ बनले आहेत. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी अगदी खाण्याच्याही बनवायच्या राहिल्या होत्या त्याही बनवल्या जात आहेत आणि यामध्ये बॉलीवूडमधील ही जोडीही मागे नाही. मात्र दीपिकाने लाल तिखट आणि मीठ लावलेली अशा कच्च्या कैरीचा फोटो शेअर केला आहे आणि या मसालेदार फोटोमुळे तिच्या चाहत्यांनाही एक मसाला मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अजून एक स्टार किडची बॉलीवूडमध्ये येण्याची तयारी सुरू, व्हिडिओ होत आहेत व्हायरल
दीपिकाने केला कच्च्या कैरीचा फोटो शेअर
काही दिवसांपूर्वीच करिना कपूरने लाल तिखट आणि मीठ लावलेल्या कच्च्या कैरीचा फोटो शेअर केला होता आणि आता असाच फोटो दीपिकाने शेअर केला आहे. पण दीपिकाच्या या फोटोनंतर तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दीपिकाला आता कुटुंब वाढवण्याचे वेध लागले आहेत असंही अनेकांनी या फोटोच्या कमेंट्समध्ये म्हटलं आहे. दीपिकाने या कच्च्या कैरीच्या प्लेटचा फोटो शेअर करत आतापर्यंत मिळालेल्या कोणत्याही गोष्टीची तुलनेती सर्वात चांगली गोष्ट असं म्हटलं आहे. ‘तुम्ही सर्वात जास्त चांगले आहात, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, आतापर्यंत मी ज्यांना भेटले आहे त्या सगळ्यात तुम्ही उत्कृष्ट आहात’ अशी कॅप्शन दीपिकाने लिहिली आहे. फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर दीपिका पादुकोण गरोदर आहे का अशाही अनेक प्रश्नांचे गॉसिप आता सुरू झाल आहे. ‘तू गरोदर आहेस का?’, ‘आनंदाची बातमी?’ अशा तऱ्हेच्या अनेक कमेंट्स सध्या दीपिकाच्या या फोटोवर येत आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला दीड वर्ष झालं असून त्यांच्याकडे कधी एकदा गुड न्यूज येईल अशी अवस्था सध्या त्यांच्या चाहत्यांची झाली आहे.
रणवीरला नक्की काय वाटतंय?
कच्च्या कैरीला सर्वात जास्त चांगलं म्हटल्याबद्दल रणवीरला नक्की काय वाटत आहे असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण दीपिकाने कच्च्या कैरीला सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. आता यावर रणवीर काही उत्तर देणार का याचीही त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. दीपिका आणि रणवीरची जोडी बॉलीवूडमधील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. लॉकडाऊनच्या आधी मार्च एप्रिलमध्ये ‘83’ हा दोघांचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे सगेळच घरी आहेत आणि शासनांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करत आहेत. मात्र आता लॉकडाऊननंतर या चित्रपटाचे प्रदर्शन नक्की कधी करण्यात येणार याचा सध्या तरी काहीही अंदाज नाही. कारण अजूनही महाराष्ट्रात कोरोनामुळे स्थिती अत्यंत वाईट आहे. सध्या सगळेच घरात आहेत. दीपिका रणवीरदेखील एकमेकांसह सध्या वेळ घालवत असल्याने आता लवकरच गुडन्यूज मिळणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. ही बातमी लवकरच मिळो अशीही प्रार्थना त्यांचे चाहते सध्या करत आहेत.
अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारुने शेअर केले हॉट फोटो