सुंदर दात हे प्रत्येकाला हवे असतात. पण सगळ्यांच्याच दाताची ठेवण ही मुळात चांगली असतेच असे नाही. काही जणांचे दात हे थोडे फार वाकडे किंवा लहान मोठे असतात. पण आता इतक्या नव्या आणि चांगल्या ट्रिटमेंटस आहेत की, ज्याच्या मदतीने तुम्हाला सरळ आणि सुंदर दात मिळण्यास मदत होईल. दातांच्या बाबतीत तुम्ही ही फार विचार करत असाल तर अशा काही ट्रिटमेंट्स या तुम्ही जाणून घ्यायला हव्यात म्हणजे योग्य वयात आणि योग्य वेळी तुम्हाला त्याची मदत घेता येईल. जाणून घेऊया दात सरळ करणाऱ्या या काही नव्या आणि जुन्या डेंटल पद्धती
जाणून घ्या दात पांढरे करण्याचे उपाय (Teeth Whitening At Home In Marathi)
इनविझिलायनर
पूर्वी दातांना तारा लावून दात सरळ करणे, ते आत घालवणे, दातांमधील फटी कमी करण्याचे काम केले जात होते. दातांना तारा लावणे हे आतापर्यंत अनेकांनी अनुभवले असेल. दातांना तारा लावल्यानंतर काही काळ दातांना खूप वेदना होतात. हिरड्यांची ठेवण बदलू लागते. दात स्वच्छ राहात नाही. आता त्याला पर्याय म्हणून एक अॅडव्हान्स पद्धत म्हणून इनविझिलायनरकडे पाहिले जाते. दातांवर दिसून येणार नाही आणि कधीही घालता आणि काढता येईल असे इनविझिलायनर हे दातासांठी फारच फायद्याचे असतात. ते दातावर घातल्यावर दिसत सुद्धा नाही. एखाद्या प्लास्टिकच्या दातांप्रमाणे ते दातांवर राहतात. विशेष म्हणजे हे इनविझिलायनर तुम्हाला अगदी स्वत:ला घालता येतात आणि काढता सुद्धा येतात. ठराविक तास ते घालायचे असतात आणि त्यानंतर ते काढायचे असतात. खाताना या इनविझिलायनर काढून टाकायच्या असतात. त्यामुळे त्याचा खाताना कोणताही अडथळा येत नाही.
जाणून घ्या दात दुखीवर घरगुती उपाय (Home Remedies For Toothache In Marathi)
विनिअर्स
खूप जणांच्या दातांमध्ये इतक्या फटी असतात किंवा दात फारच वाकडे तिकडे असतात अशावेळी इनविझिलायनर सारख्या गोष्टी त्यांच्या दातांना चालू शकत नाही किंवा त्या थोड्या फार प्रमाणात जास्त वेळ घेणाऱ्या असतात. अशावेळी तुम्हाला इन्स्टंट इलाज म्हणून विनिअर्स ही ट्रिटमेंट करता येईल. खूप जण दातांना पटकन चांगला लुक येण्यासाठी ही ट्रिटमेंट करुन घेतात. यामध्ये तुमचे मूळ दात घासले जातात आणि त्यावर कॅप लावली जाते. ही दात अगदी खऱ्या दातांसारखी दिसते. पण ही ट्रिटमेंट तुलनेने फारच खर्चिक असते. तुमचे दातांसाठीचे बजेट चांगले असेल तर नक्कीच तुम्ही ही ट्रिटमेंट करायला हवी. पण तिशीच्या आतील लोकांनी ही ट्रिटमेंट टाळणेच चांगले. त्या ऐवजी तुम्ही काही वेगळ्या ट्रिटमेंटचा शोध घ्या.
गॅप फिल करणं
काही जणांचे दात फारच सुंदर असतात. फक्त या दातांमध्ये फटी असतात.दातांच्या या फटी तुम्हाला इन्स्टंट पद्दतीने घालवता येतात. दातांच्या या फटी कमी करण्यासाठी गॅप फिलिंग हा पर्याय वापरला जातो. यामध्ये तुमच्या दातांवर दातांच्या शेड सारखेच सोल्युशल लावले जाते. ज्यामुळे तुमच्या दातांवर काही काम केले आहे की नाही हे अजिबात दिसून येत नाही. ही ट्रिटमेंट आता बऱ्यापैकी खिशाला परवडेल अशा दरात तुम्हाला नक्कीच करता येईल अशी आहे.योग्य सल्ला घेऊन तुम्ही ती करु शकता. यामध्ये दातांचे कोणतेही नुकसान होत नाही.
आता दातांची काळजी घेण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी दातांची ट्रिटमेंट करणार असाल तर या ट्रिटमेंट्स नक्कीच फायद्याच्या ठरतील.