ADVERTISEMENT
home / Diet
उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी या पाच अन्नपदार्थांचं करा सेवन

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी या पाच अन्नपदार्थांचं करा सेवन

धकाधकीच्या आयुष्यात हल्ली बहुतांश जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास (High Blood Pressure) सहन करावा लागत आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवण्याची कारणे वेगवेगळी असतात. कामाचा ताण, बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास निर्माण होऊ शकतो. योग्य वेळीच उच्च रक्तदाब आजारावर औषधोपचार न केल्यास हृदय रोगांना आयते निमंत्रण मिळते. या समस्येवर उपाय करताना आहारामध्ये बदल केल्यास तुम्हाला योग्य मदत होईल. आपण योग्य आहारासह उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकता.

(वाचा : पपईच्या पानांचा रस प्या, नितळ त्वचेसह मिळतील असंख्य आरोग्यवर्धक फायदे)

रक्तदाबाच्या त्रासावर वेळीच करा उपचार

Shutterstock

ADVERTISEMENT

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी काय खावे?

1. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या शरीरातील अतिरिक्त सोडिअमपासून आपल्याला मुक्तता मिळवून देण्याचं काम करतात. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वांचा समावेश असतो. ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात. उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या आहारात पालक, कोबी, कारले या भाज्यांचा समावेश करावा.  

(वाचा : प्रेग्नेंसीदरम्यान ‘या’ मेकअप प्रॉडक्टचा चुकूनही करू नका वापर)

2. दिवसाची सुरुवात तुम्ही ओट्स खाऊन करत असाल तर हा पर्याय तुमच्या आरोग्यासाठी सर्वाधिक चांगला आहे. ओट्स शरीरासाठी अतिशय पोषक असे आहेत. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. तर फॅट्स कमी प्रमाणात असतात. ही पोषकतत्त्वे आरोग्य आणि ब्लड प्रेशर दोन्हींचा त्रास कमी करण्यासाठी लाभदायक आहेत. ओट्सच्या सेवनामुळे वजन देखील कमी होण्यास मदत  होते. शिवाय, ओट्समध्ये सोडिअमची मात्रा देखील कमी असते, यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो. 

ADVERTISEMENT

(वाचा : सावधान! तणावामुळे तुमच्या ‘या’ शारीरिक प्रक्रियेवर होतोय गंभीर परिणाम)

3. कीवी फळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दिवसभरात तीन कीवी खाल्ल्यास हाय ब्‍लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास तुम्हाला चांगली मदत मिळेल. एवढंच नाही तर कीवी त्वचेसाठी देखील उत्तम फळ आहे. या फळामुळे शरीराची पचन प्रक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते. 

4. स्वयंपाकातील मसाल्यांचाही आहारात वापर करून तुम्ही उच्च रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात आणू शकता. यापैकीच एक पर्याय म्हणजे लसूण. हाय ब्लड प्रेशरचा त्रास लसूणच्या सेवनामुळे कमी होतो. सकाळच्या सुमारास पाण्यासोबत कच्चं लसूण खावे. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही विविध अन्नपदार्थांमध्येही लसूणचा समावेश करावा.  

5. दह्याच्या सेवनामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते. हा त्रास कमी करण्यासाठी आहारामध्ये दह्याचा समावेश करावा. यामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असते आणि दही रक्तदाबाची पातळी नियंत्रणात आणण्याचं काम करतं. दही आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे. दह्यामुळे आपल्याला अनेक आरोग्यवर्धक फायदे मिळतात. 

ADVERTISEMENT

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

20 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT