कोणत्याही माणसासाठी शरीराचे सामान्य तापमान 97 F (36.1 C) आणि 99 F (37.2 C) पर्यंत असते. जेव्हा जेव्हा शरीरात संसर्ग होतो, तेव्हा विषाणू किंवा जीवाणूंच्या प्रतिक्रियेने संसर्ग नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच आपल्याला ताप येतो. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की, ताप येतो म्हणजे नक्की काय होते. अंग गरम होते पण त्याची नक्की प्रक्रिया काय असते. पण साधारण 100 F पर्यंत कोणताही ताप थंड स्पंजिंग आणि सामान्य उपाय करून आपण एक दोन दिवसात घालवू शकतो. 100 F पेक्षा जास्त तापाला पॅरासिटामोल आणि आयबुप्रोफेन, इत्यादी अँटीपायरेटिक्स गोळ्यांचे सेवन करून ताप घालवता येतो. पण सामान्य ताप आणि कोविड (Covid 19) यामध्ये नक्की काय फरक आहे त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यायची गरज भासते याबाबत आम्ही डॉ. सोनम सोलंकी, कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट & ब्रॉन्कोस्कोपिस्ट, मसीना हॉस्पिटल यांच्याशी चर्चा करून जाणून घेतले.
अधिक वाचा – कोविड-19 मुळे गेलेली तोंडाची चव/वास घेण्याची क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी करा उपाय
कोविडचा ताप म्हणजे नक्की काय?
दुसर्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क किंवा कोविड बाधित ठिकाणाहून प्रवास केले असल्यास कोविड-19 ताप येतो. कोविड-19 चा ताप म्हणजे नक्की काय? हा ताप साधारण मध्ये ताप दोन प्रकारचा असतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा इतर व्हायरल फ्लूसारखा असतो. ताप अचानक येतो आणि शरीरातील वेदना, अस्वस्थता आणि अतिशय थकवा ही लक्षणे दिसू लागतात. त्याचप्रमाणे घसा खवखवणे, तोंडाची चव जाणे, नाकाने सुगंध न येणे हीदेखील लक्षणे दिसतात. हा ताप अति प्रमाणातदेखील येऊ शकतोआणि कधीकधी अंग थरथरण्यापर्यंत याचा त्रास होतो. व्हायरल टप्प्याच्या सुरुवातीचा ताप जास्त धोकादायक आणि त्रासदायक असतो, जो 7 दिवस पर्यंत असतो, त्यानंतर शरीराची दाहक अवस्था सुरू होते. साध्या नेहमीच्या औषधांनी हा ताप जात नाही आणि श्वास घ्यायलाही त्रास होतो कारण यावेळी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. तापाचा हा दुसरा टप्पा चिंताजनक असतो आणि त्यानंतर ऑक्सिजन आणि श्वासोच्छवास कमी होतो. यावेळी उपचार स्टेरॉईड्स इत्यातीच्या सहाय्याने केला जातो.
मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, इत्यादी तापाची इतर सामान्य कारणे आहेत जी नियमितपणे पाहिली जातात. मात्र हा ताप वेगळाचा आहे. इतर तापांमध्ये अचानक थंडी वाढून हा ताप वेगाने वाढतो आणि घाम येणे, इत्यादी यासह कमी होतात. रूग्ण अनेकदा थंडी वाजत असल्याची तक्रार करतात. टायफॉइड ताप सहसा ऍबडॉमिनल लक्षणांशी संबंधित असतो. डेंग्यूच्या तापामध्ये स्नायू दुखणे, हाड दुखणे आणि पुरळ येणे सामान्यपणे दिसून येते. चिकनगुनिया, नागीण, इत्यादी सारख्या इतर तापांमध्येही पुरळ दिसून येते. चिकनगुनिया सांधेदुखीशी देखील संबंधित आहे. पण कोविडमध्ये असे काहीही होत नाही. पण कोविड बरा होत नाही असे अजिबात नाही. व्यवस्थित काळजी घेतली आणि योग्य उपचार केल्यास कोविडदेखील बरा होतो. मात्र यातून सावरायला इतर तापाच्या तुलनेत जास्त कालावधी लागतो हे नक्की.
अधिक वाचा – स्तनदा मातांनी कोविड लस घेणे सुरक्षित आहे का, तज्ज्ञांचे मत
चाचण्याही वेगळ्या
कोविडसाठी RT/PCR व्यतिरिक्त काही रक्त तपासणीदेखील करावी लागते. कोविड ताप आणि तापाच्या इतर कारणांमधील फरक जाणण्यास यामुळे मदत मिळते. कमी लिम्फोसाइट काउंटसह कमी डब्ल्यूबीसी वाढलेल्या सीआरपीसह दिसतो जो कोविड-19 च्या दिशेने निर्देशित करतो. कमी डब्ल्यूबीसी काउंट यासह कमी प्लेटलेट काउंट मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस या तापामध्ये पाहिले जातात. कधीकधी कावीळ देखील या तापांमध्ये दिसून येते. त्यामुळे तुम्हालाही आता जर साधा ताप आणि कोरोनाच्या तापामधील फरक जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या गोष्टी लक्षात ठेवा.
अधिक वाचा – कोविड वॅक्सिन घेतल्यावर का येतात हातातून वेदना, जाणून घ्या कारण
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक