बॉलीवूड

दिशा पाटनीच्या हाॅट फोटोंवर वडिलांची काय असते प्रतिक्रिया, दिशाने केला खुलासा

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jun 6, 2019
दिशा पाटनीच्या हाॅट फोटोंवर वडिलांची काय असते प्रतिक्रिया, दिशाने केला खुलासा

अभिनेत्री दिशा पाटनीला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये येऊन काहीच वर्ष झाली आहेत. ‘धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या तिच्या पहिल्याच चित्रपटातून दिशाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पण त्यानंतर तिची ओळख टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून जास्त वाढली आहे. पण बऱ्याचदा दिशा आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच रमजानच्या मुहूर्तावर दिशाचा सलमान खानबरोबरील ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. पण इतकं असूनही दिशा सध्या तिच्या हॉट आणि सेन्शुअस फोटोंसाठी चर्चेत आली आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिच्या फोटोंवर तिच्या वडिलांची प्रतिक्रिया नक्की काय आहे याचीही चर्चा चालू झाली आहे.

Disha Patani with Father

दिशाच्या वडिलांना आवडत नाहीत तिचे हॉट फोटो

दिशा पाटनीने बॉलीवूडमध्ये जम बसवायला सुरुवात केली आहे. पण तिचे अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर होतात आणि सोशल मीडियावर या फोटोजची खूपच चर्चा असते. दिशा स्वतः हे फोटो शेअर करते. जास्तीत जास्त फोटोमध्ये दिशा अगदी लहान ड्रेस अथवा बिकिनीमध्ये दिसते. सोशल मीडियावर जितके तिचे चाहते आहेत तितकेच तिला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीही आहेत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फोटो ज्या व्यक्तीला आवडत नाहीत ती व्यक्ती म्हणजे दिशाचे वडील.

Disha Patani
घरातील इतर व्यक्ती दिशाचे हे फोटो सहजतेने बघून सोडून देऊ शकतात. पण तिच्या वडिलांना हे फोटो अजिबात आवडत नाहीत. या गोष्टीचा खुलासा दिशाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान केला आहे.  दिशाने सांगितलं की, ‘माझं कुटुंब अतिशय आधुनिक विचारांचं आहे. मी कधीही फोटोशूट करते तेव्हा सर्वात पहिल्यांदा माझ्या कुटुंबाबरोबरच माझे फोटो शेअर करते. पण ते फोटो बघताना माझे वडील थोडे अस्वस्थ होतात. पण माझी आई माझे सगळे फोटो बघते.’

बऱ्याचदा दिशाला केलं जातं ट्रोल

disha hot

दिशा नेहमी फोटो पोस्ट करत असली तरीही सोशल मीडियावर दिशा पाटनी बऱ्याचदा तिच्या या फोटोजमुळे ट्रोल होतानाही दिसते. तिच्या कपडे घालण्यावरून तिला बऱ्याचदा ट्रोल करण्यात येतं. पण या गोष्टींकडे दुर्लक्ष करून दिशा पाटनी आपले फोटो पोस्ट करत राहाते. तिचे अनेक फोटोशूट आतापर्यंत झाले आहेत आणि ‘केल्विन क्लेन’ या प्रसिद्ध ब्रँडसाठी तर दिशा नेहमीच आपले फोटोशूट करते आणि बिकिनीतील फोटो पोस्ट करते.

सलमानच्या वयाबद्दल बोलून फसली दिशा

Disha Patani on Salman's Age3

काही दिवसांपूर्वीच दिशाने केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती. ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान दिशा पाटनीने सलमानच्या वयाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सलमानने राग व्यक्त केला होता असं म्हटलं जातं. दिशा म्हणाली होती की, सलमानबरोबर तिला काम करण्याची इच्छा होती, तिला ही संधी ‘भारत’ चित्रपटात मिळाली. पण यानंतर पुन्हा मला सलमान खानबरोबर काम करण्याची ही संधी मिळेल असं मला वाटत नाही. आमच्या दोघांमध्ये वयाचं बरंच अंतर असल्यामुळे कदाचित असं होण्याची शक्यता नाही. यानंतर सलमान खान दिशावर बराच नाराज असल्याचंही ऐकिवात आहे. पण ‘भारत’ च्या प्रिमीयरला दिशा हजर राहिली होती. आता पुढे दिशा कोणत्या चित्रपटात दिसणार याचीही तिचे चाहते वाट पाहात आहेत.

फोटो सौजन्य – Instagram

हेदेखील वाचा – 

दिया मिर्झाचं ‘काफिर’मधून वेबसिरिजमध्ये पदार्पण

सूर्यवंशीमध्ये ‘बॅडमॅन’ साकारणार व्हिलनची भूमिका

Taarak Mehta ka Ooltah Chashmah : तुम्ही पाहिला का दयाबेनच्या क्युट मुलीचा फोटो