Advertisement

Fitness

पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Potat Gas Hone Upay In Marathi)

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jan 30, 2020
Potat Gas Hone Upay In Marathi

 

हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे अगदी कुठेही आणि कधीही काहीही खाल्ले जाते. तुम्हालाही असे काही खाण्याची सवय असेल तर तुम्हाला पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते यासाठीच तुम्हाला पोटाचे विकार आणि उपाय माहीत असायला हवे. त्यातला त्रासदायक प्रकार म्हणजे पोटात होणारे गॅसेस… आता गॅसेस म्हटल्यावर नाकं मुरड्याची काहीच गरज नाही. कारण उलट सुलट खाण्याचा आपल्याला अनेकदा त्रास होतो. आता तुम्हालाही वेळी अवेळी खाण्याची सवय असेल आणि त्यामुळे तुम्हाला गॅस होत असेल तर तुम्ही काही झटपट उपाय करणे गरजेचे आहे. आज आपण पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Potat Gas Hone Upay In Marathi) जाणून घेऊया.

पोटात गॅस होण्याची लक्षणे (Gas Problem Symptoms In Marathi)

Gas Problem Symptoms In Marathi

Gas Problem Symptoms In Marathi

आता अनेकदा आपल्याला नेमकं काय होतय हे कळत नाही. म्हणजे डोकेदुखी किंवा पायदुखी आपल्याला कळू शकते. पण पोटात गॅस झाल्यानंतर नेमकं काय होतं हे आपल्याला कळत नाही. जाणून घेऊया गॅस झाल्यानंतर नेमकं काय होतं ते आधी पाहुया 

  • पोटात अचानक दुखायला लागते. पोटात अगदीच मुरडा आल्यासारखे वाटते. 
  • काहींना पोटात गॅस झाल्यानंतर सतत अस्वस्थ वाटत राहते. 
  • जर हा गॅस योग्यपद्धतीने बाहेर पडला नाही तर मात्र तुम्हाला छातीत दुखल्यासारखे वाटू लागते.
  • जर गॅस गुदद्वारावाटे बाहेर पडला नसेल तर मात्र काहींना सतत अस्वस्थ झाल्यासारखे वाटते. 
  • सतत गॅसचा त्रास होत असेल तर विष्ठेचाही त्रास होऊ लागतो. विष्ठेला येणारा दुर्गंधही अपचन अॅसिडीच्या त्रासापैकी एक असू शकतो.

पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Potat Gas Hone Upay In Marathi)

Potat Gas Hone Upay In Marathi

Potat Gas Hone Upay In Marathi

 

ओवा:

 अनेक खाद्यपदार्थांमध्ये ओवा हा अगदी आवर्जून घातला जातो. जर तुम्हाला पोटात मुरडा आल्यासारखे होत असेल तर साधारण बडीशेप जितकी खातो तितक्या प्रमाणात तुम्हाला ओवा घ्यायचा आहे. तळहातावर ओवा थोडा चोळून तुम्हाला तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेल. तुम्हाला गॅस पटकन जायला हवा असेल तर तुम्ही ओवा चावताना तुम्ही त्यावर गरम पाणी प्यायले तरी चालू शकेल. त्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. 

कोरा चहा: 

जर तुम्ही चहा पित असाल तर तुमच्यासाठी गॅस घालवणारा झटपट उपाय म्हणजे कोरा चहा. चहा तयार केल्यानंतर त्यामध्ये दूध न घालता तुम्ही जर तो चहा गरम गरम प्यायलात तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. पण तुम्ही चहा पिताना खूप चहा पिऊ नका. अगदी एखादा कप चहा तुमच्यासाठी अगदीच पुरेसा आहे. 

आल्याचा तुकडा:

नेकदा अॅसिडीटीचा त्रास आणि गॅस झाल्यावर मळमळल्यासारखे होते. त्यावर तुम्हाला आराम हवा असेल तर तुम्ही आल्याचा तुकडा चघळू शकता. अगदी ओव्याप्रमाणे तुम्हाला आल्याचा तुकडा चघळत राहायचा आहे. त्याचा चोथा होईपर्यंत तुम्ही त्याचा रस प्या. त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला आराम मिळू शकेल. शिवाय तुम्हाला विष्ठेचा त्रास होत असेल तर त्यापासूनही सुटका मिळेल.

सोडा:

जर तुम्हाला ओवा किंवा आलं सहज उपलब्ध होणार नसेल तर तुम्ही सोडासुद्धा पिऊ शकता. सोड्याचा एक घोट गॅसेसवर कमालीचा फायदेशीर ठरतो. तुमचा गॅस ठेकरावाटे बाहेर पडतो. यामुळे तुमचे पचलेले अन्न पचायला मदत होते. म्हणूनच अनेक जंकफूडच्या कॉम्बोमध्ये कोल्ड्रींक्स असते याचे कारण पचन असे आहे. 

लिंबू पाणी:

जर तुम्हाला गॅसवर आराम हवा असेल तर मग तुम्ही लिंबू पाणी प्यायला हवे. जर तुम्ही रोज गरम पाण्यातून लिंबाचा रस घेत असाल तर तुम्हाला पोटासंदर्भातील विकार होत नाही. तुम्ही दररोज सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबाचा रस घ्या. तुम्हाला आराम मिळेल. 

आता जर तुम्हाला गॅसेसचा त्रास होत असेल तर तुम्ही हे झटपट इलाज करा आणि आराम मिळवा.

प्रत्येकाला माहीत हवे बडीशेप खाण्याचे हे 20 फायदे (Saunf Benefits In Marathi)