शिंका येणं हा काही नक्कीच आजार नाही. तर आपल्या शरीरासाठी ही उत्तम गोष्ट खरं तर मानली जाते. शिंका येणं म्हणजे आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि आपण कोणत्याही व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्यासाठी सक्षम आहोत याचे चिन्हं आहे. पण जर अगदीच सतत शिंका येत असतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका. सध्याचं वातावरण बघता नक्कीच तुम्हाला मनात वेगवेगळ्या शंका येऊ शकतात. पण कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्याआधी तुम्ही यावर काही घरगुती उपाय (home remedies for sneezing) नक्कीच करू शकता. कारण सतत शिंका येऊ लागल्या तर डोकेदुखीही सुरू होते आणि त्यामुळे माणूस अधिक चिडचिडा होतो. कधी कधी एखाद्या अलर्जीमुळे अथवा घशात, नाकात धूळ गेल्याने शिंका येऊ शकतात. पण यावेळी घाबरून न जाता काही सोपे घरगुती उपाय तुम्ही करा आणि या शिंकेला घालवून लावा. कोणत्याही शंकेला मात्र जागा देऊ नका. जाणून घेऊया घरगुती उपाय.
आले (Ginger)
Shutterstock
आल्याचा उपयोग तुम्ही सतत शिंका येत असल्यास करू शकता. यामध्ये अँटिसेप्टिक आणि अँटिबॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे इन्फेक्शन कमी करण्याचे करण्यासाठी याची मदत मिळते. शिंका दूर करण्यासाठी तुम्ही एक चमचा आल्याचा रस घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा गूळ मिक्स करून सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा हे चाटण खा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा मिळेल.
हळद (Turmeric)
Freepik
हळदीमध्ये अनेक पोषक तत्व आहेत. हळदीमध्ये कुरक्युमिन नावाचे एक तत्व सापडते आणि हे अँटिऑक्सिडंटयुक्त आहे. तसंच हळदीचे सेवन आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि मजबूत करण्यास मदत करते. शिंकेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही एक ग्लास दूध गरम करा आणि त्यात एक चमचा हळद पावडर मिक्स करा. यामुळे तुम्हाला पटकन आराम मिळेल.
दालचिनी (Cinnamon)
Shutterstock
तुम्हाला जर सतत शिंका येत असतील तर स्वयंपाकघरातील दालचिनीदेखील तुमच्या उपयोगी पडू शकते. दालचिनीमधील पोषक तत्व शिंका थांबविण्यास उपयोगी ठरतात. यासाठी तुम्ही एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा दालचिनी आणि एक चमचा मध मिक्स करा. आता हे मिश्रण तुम्ही प्या. तुम्हाला काही वेळातच याचा परिणाम दिसून येईल. शिंका येण्याच्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळेल.
पुदीना (Mint Leaves)
Freepik
पुदिन्याची पाने अनेक आजारांवर रामबाण इलाज ठरतात. तुम्हाला सतत शिंका येत असल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही पुदिन्याची काही पानं घेऊन रोज चावा. तुमचा हा त्रास लवकरच निघून जाईल. तसंच तुम्ही पुदिन्याच्या पानाचा चहा बनवूनही पिऊ शकता. यामुळेही तुम्हाला योग्य परिणाम मिळू शकतो.
सर्दी अथवा खोकला, ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Fever Home Remedies In Marathi)
लिंबू (Lime)
Shutterstock
लिंबामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. काही जणांना लिंबाची अलर्जी असते. पण तसं असेल तर लिंबाचा वापर करू नका. शिंका येत असल्यास, एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये अर्धे लिंबू पिळा आणि एक चमचा मध मिक्स करा. तयार झालेल्या या पाण्याचे तुम्ही शिंका सुरू झाल्यास, त्याचे सेवन करा. असे केल्यास, तुम्हाला त्वरीत आराम मिळेल.
आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का
लसूण (Garlic)
Shutterstock
शिंकांच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही लसणाचाही उपयोग करून घेऊ शकता. लसणीमध्ये ग्लुटाथियोन नावाचे अँटिऑक्सिडंट असते जे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते आणि व्हायरल संक्रमणापासून वाचण्यास मदत करते. शिंका आल्यास तुम्ही 3-4 लसणीच्या पाकळ्या ठेचा आणि एक ग्लास पाण्यात त्या पाकळ्या उकळा. हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
तुम्हालाही झाली आहे सर्दी, हे घरगुती उपाय आहेत फायदेशीर
तुळशीची पाने (Basil leaves)
Shutterstock
तुळशीची पाने खाल्ल्यानेदेखील या समस्येवर समाधान मिळू शकते. वास्तविक तुळशीची पाने ही अँटिइन्फ्लेमेटरी गुणांनी युक्त असतात. त्यामुळे अलर्जीसारखे आजार दूर जातात. तुळशीच्या पानाचा चहा करून प्यायल्यास, तुम्हाला शिंकांचा त्रास होणार नाही. त्यामुळे पावसाळ्यातही बऱ्याचदा तुळशीच्या पानांचा चहा पिण्याचा सल्ला देण्यात येतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक