लहानपणापासूच आपण जंताबद्दल ऐकत आलो आहोत. लहानपणी काहीही खाण्याच्या सवयीमुळे हा त्रास बळावतो हे देखील तुम्ही ऐकले असेल. लहान मुलांना हा आजार अगदी सहज होतो. पण मोठ्यांनाही जतांचा त्रास होण्याची शक्यता असते. आता जंताचा त्रास म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्हाला माहीत नसेल तर जंताचा त्रास झाल्यानंतर सतत पोटात दुखत राहणे, पोट फुगणे, अशक्तपणा जाणवणे असे त्रास होऊ लागतात. असं म्हणतात की, जंताचा आजार हा एका वाळवीसारखा आहे जो पसरतच जातो. त्यामुळे जंत बरे झाले असे वाटले तरी तुम्हाला काही काळापर्यंत औषधोपचार करावे लागतात. आज आपण जंताविषयी आणि जंतावरील घरगुती उपायासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आज आपण जंत झाल्याची लक्षणे, पोटातील जंतावरील घरगुती उपाय हे जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात
बद्धकोष्ठता, वजन वाढीमुळे आहात हैराण करा ‘हे’ उपाय
जंत म्हणजे काय ? What Is Stomach Worms In Marathi
वैद्यकीय शास्त्रात जंताचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. यामध्ये प्रामुख्याने स्फीत कृमी, हुक कृमी, गोल कृमी असे प्रकार सांगितले जातात. जंताच्या स्थानावरुन त्याचा प्रकार निश्चित होत असतो. जंताचा त्रास होऊ लागला की, काही बदल होऊ लागतात. सतत पोटदुखी होऊ लागते. डॉक्टरांकडे जाऊन एक्सरे काढला तरी त्यात फार काही हाती लागत नाही. पण जंताची काही लक्षण तुम्हाला माहीत हवीत. जंताचा त्रास तुम्हाला झाला असेल तुम्हाला सतत पोटदुखी होत राहते. लहान मुलांमध्ये जंताची लक्षण पटकन जाणवून येतात. ती सतत चीडचीड करु लागतात. काहींना सतत खावेसे वाटते. तर काहींना भूक लागत नाही. वजन कमी जास्त होणे. अशक्तपणा जाणवणे. गुद्द्वाराला सतत खाज येत राहणे. पोट साफ न होणे. शरीरावर पांढरे डाग येणे असे काही त्रास या दरम्यान होऊ लागतात.
मुतखड्यामुळे त्रस्त झाला आहात मग करा ‘हे’ घरगुती उपचार (Home Remedies For Kidney Stones)
जंताची लक्षणे | Symptoms For Stomach Worms In Marathi
तुम्हाला जंत झाले असतील तर त्याची काही विशिष्ट जंताची लक्षणे हे जाणून घ्यायला हवेत. ही लक्षण अगदी सर्वसामान्य असतील पण त्याचे भयावह परिणाम देखील होऊ शकतात.
पोटदुखी
जंताचा त्रास तुम्हाला होत असेल तर असह्य अशी पोटदुखी खूप जणांना होऊ लागते. हे अगदी याचे सर्वसामान्य असे लक्षण आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय पोटदुखी होत असेल तर तुम्ही त्याची योग्य तपासणी करुन घ्यायला हवीत. पोटदुखी होण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण जंत झाल्यानंर पोटदुखी ही वरचेवर होत राहते.
वजन झपाट्याने कमी होणे
जंत झाल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. भूक मंदावल्यामुळे शरीरात काहीही चांगले जात नाही. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होताना वजन कमी होण्याचा त्रास खूप जणांना होतो. वजन कमी होणे खूप जणांना चांगले वाटत असले तरी अचानक वजन कमी होण्यामुळे शरीर थकल्यासारखे वाटते. जर तुमचे वजन अचानक कमी होत असेल तर तुम्हाल जंत झालेले असू शकते.
थकवा
आपण जे खातो त्यामुळे आपल्याला उर्जा मिळत असते. पण जंत झाल्यानंतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे साहजिकच थकवा येऊ शकतो. जर तुम्हाला असा थकवा जाणवत असेल कोणतीही शारीरिक क्रिया करायची इच्छा नसेल तर तुम्हाला जंत हे झालेले असू शकतात. अशा थकव्याचा त्रास झाला असेल तर तुम्हाला जंतावर योग्य उपाय करणे गरजेचे असते.
भूक मंदावणे
वर सांगितल्याप्रमाणे पोटदुखी होत असल्यामुळे खाण्याची इच्छा ही काही फारशी होत नाही. खूप जणांना काहीही खावेसे वाटत नाही. अर्थातच हा त्रास भूक मंदावल्यामुळे असू शकतो. रोजच्या आहारापेक्षा तुमचा आहार खूपच कमी झाला असेल आणि वरील सगळी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला जंताचा त्रास असण्याची शक्यता आहे.
आतड्याला सूज
पोटातील जंत अर्थात कृमी यामुळे आतड्याला सूज येण्याची शक्यता असते. पोटात झालेल्या कृमीचा आकार वाढला की त्याचा त्रास आतड्याला व्हायला सुरुवात होते. आतड्याला सूड आले की, पोटदुखी अधूनमधून होत राहते. शिवाय तुम्हाला उलट्या किंवा मळमळण्याचा त्रास होतो.
मळमळणे
पोटात कृमी वाढल्या असतील तर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे काही खाल्ले कर मळमळण्याचा त्रास होतो. तुम्हाला काहीही कारण नसताना सतत अशी मळमळ जाणवत असेल तर तुम्हाला जंताचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे मळमळण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका.
शौचातून रक्त पडणे
शौचातून रक्त पडणे हे देखील आरोग्यासाठी खूपच घातक असते. पोट साफ होत नसताना जर तुमही खूप प्रेशर लावून शौचाला गेल्यास रक्त पडण्याचा त्रास होतो. पण काही जणांना अगदी सहजच शौचातून रक्त पडण्याचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही त्याकडे अधिक लक्ष द्या.
रक्ताची कमतरता
शरीरात काहीही नसेल तर त्याचा त्रास हा होतोच. तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता जाणवू लागते. तुमच्या सगळ्या शारिरीक क्रिया मंदावू लागतात. रक्ताची कमतरता झाल्यामुळे ॲनिमियाचा त्रास तुम्हाला होऊ लागतो.त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
पोटातील जंतावर घरगुती उपाय | Home Remedies For Stomach Worms In Marathi
तुम्हाला जंताचा त्रास झाला असेल तर पोटातील जंतावर घरगुती उपाय हे देखील जाणून घेऊया. हे उपाय करणे एकदम सोपे आहे.
बाळंतशेप चूर्ण
बाळंतशेप चूर्ण हे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे असते. पोटातील जंतासाठी बाळंतशेप चूर्ण हे फारच फायद्याचे असते. जेवणानंतर जर तुम्ही ताक घेत असाल तर तुम्ही त्या ताकामध्ये बाळंतशेप चूर्ण आणि बडीशेप चूर्ण घालून प्या. त्यामुळे पोटातील जंत मरण्यास मदत मिळते.
कारल्याची पाने
कडू कारली ही आरोग्यसाठी खूपच चांगली फायदेशीर असतात. जंतावर कारल्याची पाने ही एक उत्तम असा उपाय आहे. कारल्याची पाने घेऊन त्यामध्ये मध घालून त्याचे चाटण घ्या. त्यामुळे पोटातील जंत मिळण्यास मदत मिळते.
कडुनिंबाचे चूर्ण
कडूनिंब हे देखील पोटातील जंतावर फारच फायद्याचे ठरते. कडुनिंबाचे चूर्ण आणि मध एकत्र करुन त्याचे चाटण करुन प्यायले तर तुम्हाला त्याचा फायदा होण्यास मदत मिळते. कडुनिंबाचे चूर्ण हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरते.
डाळिंबाचे साल
डाळिंब हे फळ फारच गुणकारी आहे याचे सालही गुणकारी असते. डाळिंबाचे साल घेऊन त्याची पूड करा. डाळिंबाची पूड तुम्ही एक छोटा चमचा दिवसातून एकदा सेवन केल्यामुळे जंताचा त्रास कमी होतो.
शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या शेंगा या पोटातील जंतावर उत्तम परिणाम करतात. शेवग्यांच्या शेंगा छान उकडून घ्या. शेंग्या उकळून झाल्यानंतर त्याचे पाणी फेकून देऊ नका. त्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ आणि मिरपूड घाला. असे पाणी तुम्ही जंत झालेल्या काळात प्यायलात तर तुमच्या पोटातील जंत कमी होण्यास मदत मिळते.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. जंतासाठी कोणती गोळी दिली जाते?
जंतासाठी एक ॲलबेंडेझोल ही गोळी दिली जाते. वयोमानानुसार ती गोळी कशी घ्यायची हे देखील सांगितले जाते. जंतावर ही गोळी असली तरी देखील तुम्ही ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानिशी घेणेच गरजेचे असते.
2. जंत तुमच्या शरीरावर काय परिणाम करतात?
जंत झाल्यानंतर त्याचे शरीरावर काही दुष्परिणाम झालेले असतात. वजन कमी होणे, शौचातून रक्त पडणे, पोटदुखी होणे असे काही त्रास होऊ लागतात. त्याकडे दुर्लक्ष केले तर शौचातून कृमी पडू लागतात.
3. जंताचे शरीरावर काय परिणाम होतात?
गुद्दवाराला खाज येणे, रक्त पडणे, पोटदुखी, वजन झपाट्याने कमी होणे असे काही दुष्परिणाम होऊ लागतातत. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करु शकत नाही.
हेही वाचा –
जाणून घेऊया पित्ताशयातील खडे घरगुती उपाय