स्वयंपाकघरात तुमचा खूप वेळ जातो का? तुम्हाला जर स्वयंपाकाचाही कंटाळा असेल आणि वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला हा लेख नक्की आवडेल. तुमचा वेळ वाचविण्यासाठी काही सोप्या किचन हॅक्स आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. स्वयंपाकघरातील काही लहान लहान कामे अशी असतात जी हॅक्स वापरून तुम्ही पटकन पूर्ण करू शकता. त्यासाठी जास्त वेळ काढण्याची गरज नाही. या किचन हॅक्समुळे (kitchen hacks) स्वयंपाकघरातील काही कामं अगदी सोपी वाटू लागतील आणि तुम्हालाही स्वयंपाकघरातमध्ये अधिक आवड निर्माण होईल. कारण कंटाळा करत काम करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे काही विशिष्ट हॅक्सचा वापर करून तुम्हीही तुमचा वेळ वाचवा आणि स्वयंपाकघरात आवड निर्माण करा. जाणून घेऊया काय आहेत या सोप्या किचन हॅक्स, ज्या वाचवतील तुमचा वेळ.
हिरव्या भाज्या कशा राहतील ताज्या
Shutterstock
हिरव्या भाज्या अर्थात पालेभाज्या लवकर खराब होतात. मग अशावेळी तुम्हाला जर त्या जास्त काळ टिकवायच्या असतील तर तुम्ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे भाज्या अधिक काळ ताज्या राहण्यास मदत मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजी धुऊन ठेऊ नका. जेव्हा ती करायची असेल तेव्हा बाहेर काढून धुवा. म्हणजे पाणी लागून भाजी खराब होणार नाही आणि अधिक काळ टिकायला मदत मिळते.
फ्रिजमध्ये बाटल्या ठेवताना करा बाईंडर क्लिप्सचा उपयोग
सध्या उन्हाळा चालू आहे आणि घरात थंड पाणी जास्त प्रमाणात लागतं. पण फ्रिजमध्ये बाटल्या अधिक राहत नसतील अथवा सतत फ्रिजमधील शेल्फमधून पडत असतील तर तुम्ही ब्लाईंडर क्लिपचा उपयोग करून फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवा. यामुळे पाणी गळणार नाही आणि जास्तीत जास्त बाटल्या फ्रिजमध्ये राहतील.
अंड्यासाठी हॅक्स
Shutterstock
अंडी उकडवून घेतल्यानंतर त्याचे साल काढण्यास तुम्हाला जर वेळ लागत असेल तर उकडण्यापूर्वी अंडे क्रॅक करा. क्रॅक केल्यानंतर अंडी थोडा वेळ थंड पाण्यात ठेवा आणि मगच उकडून घ्या. यामुळे उकडल्यानंतर त्याचे साल काढणे अत्यंत सोपे होते आणि तुमचा वेळही वाचतो.
स्वयंपाकघरातील धुराने असाल त्रस्त, तर करा हा सोपा उपाय
जेवण करताना वाचवा वेळ
Shutterstock
एका गॅसवर डाळ आणि भात शिजत लावा आणि दुसऱ्या बाजूला पोळ्यांसाठी कणीक भिजवा. कणीक तिंबत ठेवल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढून आमटीसाठी फोडणी द्या. एका बाजूला आमटी होत असताना दुसऱ्या बाजूला पोळ्या करायला घ्या. अथवा तुम्ही दुसऱ्या बर्नरवर भाजीही करू शकता. यामुळे साधारण अर्धा ते पाऊण तासात तुमची पोळी भाजी, आमटी भात तयार होतो. भाजी पटकन करून हवी असेल तर आदल्या दिवशी रात्री भाजी कापून ठेवा. म्हणजे भाजीसाठी अधिक वेळ जात नाही.
स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स
घरच्या घरी कशी काढाल सुरीला धार
बऱ्याचदा घरातील सुऱ्यांची धार निघून जाते. मग अशावेळी पटकन सुरीला धार कशी काढणार? तर त्यासाठीही सोपी पद्धत आहे. घरात सिरॅमिक कप असेल तर त्याच्या मागच्या बाजूला सुरी घासावी. आपोआप सुरीला धार चांगली मिळते. यावर रगडून तुम्ही तुमच्या सुरीची धार अधिक मजबूत करू शकता.
स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स
कटिंग बोर्डचे सिक्रेट फिचर
कटिंग बोर्डच्या बाजूला वेगळे सिक्रेट फिचर असते जिथे भाज्या कापून तुम्ही पटापट बाजूला ठेऊ शकता. त्यामुळे भाजी कापताना वेळ लागत नाही. तसंच तुम्ही पटापट वेगवेगळ्या भाज्या कापून त्या वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून ठेऊ शकता. तसंच तुम्ही एका वेळी दोन ते तीन भाज्या कापून ठेवल्या तर तुमचा वेळ नक्की वाचतो. किमान तीन दिवसांची भाजी तुम्ही चिरून ठेवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक