ADVERTISEMENT
home / Weight Loss
हे पदार्थ एकत्र खाल तर झटपट कमी होईल तुमचे वजन

हे पदार्थ एकत्र खाल तर झटपट कमी होईल तुमचे वजन

वजन कमी करायचं म्हणजे डाएटचा एक चार्टच बनवावा लागतो. कोणते पदार्थ आहारातून वगळायचे आणि कोणते पदार्थ खायचं याचं गणित बसवणं नेहमीच कठीण जातं. स्पेशल वेट लॉस डाएटचा कुणावर झटकन परिणाम होतो तर काही जणांवर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. याचं कारण तुमची शरीर प्रकृती, शारीरिक हालचाल, कामाची पद्धत, जीवनशैली, भौगोलिक परिस्थिती अशा अनेक गोष्टींचा परिणाम तुमच्या डाएटवर होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीनुसार डाएट करायला हवं. आम्ही आज तुमच्यासोबत असे काही पदार्थ शेअर करणार आहोत जे एकत्र खाण्यामुळेही तुमचे वजन कमी होऊ शकतं. घरच्या घरी असं वजन कमी करण्यासाठी ट्राय करा हे कॉम्बिनेशन

अंडी आणि पालक –

अंडी आणि पालक हे पदार्थ ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. कारण अंडी खाणारे मांसाहारी लोक पालकच्या नावाने नाक मुरडतात. तर पालकसारखी सात्विक भाजी खाणारे शाकाहारी अंडी खाण्याच्या नावाने नाक मुरडतात. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं. कारण अंड्यामध्ये प्रोटिन्स भरपूर असतात तर पालकमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. यासाठीच तुमच्या शरीराचं योग्य पोषण होतं आणि तुमचं वजनही यामुळे वाढत नाही. वजन कमी करण्यासाठी पालक आणि अंड्याचं ऑम्लेट खायला काहीच हरकत नाही. 

instagram

ADVERTISEMENT

सफरचंद आणि पीनट बटर –

आता तुम्ही म्हणाल की या दोन पदार्थांचा वजन कमी करण्याशी काय संबध. पण पीनट बटर म्हणजेच शेंगदाण्याच्या बटरमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पोलीसॅच्युरेडेट फॅट्स असतं. ज्यामुळे तुम्हाला सतत भुक लागत नाही आणि त्यामुळे तुमचं इन्सुलीन नियंत्रित राहतं. सफरचंदासोबत पीनट बटर खाण्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळतं आणि तुमचं मेटाबॉलिझमही सुधारतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नास्त्यामध्ये हे पदार्थ एकत्र खाणं नक्कीच फायद्याचं ठरेल. 

instagram

पालेभाज्या आणि ऑलिव्ह ऑईल

हिरव्या भाज्यांचे सॅलेड खाण्यामुळे तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात राहू शकतं. मात्र या सॅलेडला चांगली चव येण्यासाठी तुम्ही त्यात थोड्या ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळेल. हे दोन्ही पदार्थ एकत्र येण्यामुळे तुमच्या शरीरावर जास्त चांगला परिणाम होतो. तुमच्या भुकेवर नियंत्रण राहते आणि तुमचं वजन कमी होतं.

ADVERTISEMENT

instagram

कोमट पाणी आणि लिंबाचा रस

तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर हे कॉम्बिनेशन अतिशय उत्तम आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिण्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक परफेक्ट उपाय आहे. ज्यामुळे तुमच्या वजनवर लगेच परिणाम होतो आणि तुम्ही बारीक होता. 

ADVERTISEMENT

instagram

ग्रीन टी आणि लिंबू

बारीक व्हायचं असेल तर ग्रीन टी हाही एक चांगला पर्याय आहे. मात्र जर तुम्हाला ग्रीन टीची चव आवडत नसेल तर त्यात थोडं लिंबू पिळा म्हणजे तुमच्या तोंडाची चव सुधारेल. ग्रीन टीमुळे तुमच्या कॅलरिज बर्न होतात. शरीराला पुरेसे अॅंटि ऑक्सिडंट मिळतात. मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी याचा चांगला फायदा  होतो. व्हिटॅमिन सी युक्त लिंबू पिळलेली ग्रीन टी घेण्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. 

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

डाळी आणि पिठांमध्ये होणार नाहीत किडे, स्वयंपाकघरातील टिप्स

डाएट करायलाच नको फक्त करा हे 5 व्यायामप्रकार

सोलून झाल्यावर आल्याचं साल फेकून न देता असा करा वापर

18 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT