ADVERTISEMENT
home / आरोग्य
कच्च्या अंड्यामुळे पडू शकता आजारी, उकडून खाणं योग्य

कच्च्या अंड्यामुळे पडू शकता आजारी, उकडून खाणं योग्य

तुम्ही बऱ्याच जणांना आतापर्यंत सांगताना ऐकलं असेल की, अंड्याचा पिवळा भाग खाणं योग्य नाही कारण तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढतं. बरेच जण अंड्याचा पांढरा भागच खातात. यामध्ये कमी फॅट असून कॅलरीजदेखील कमी असतात असं म्हटलं  जातं. पण तुम्हाला याची कल्पना आहे का? अंड्याचा पांढरा भागदेखील जास्त सेवन केल्यास आणि कच्चा खाल्ल्यास तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. तुम्ही जर कच्चं अंड खात असाल तर वेळेवर तुम्ही याकडे लक्ष द्या. कारण यामुळे तुम्ही अधिक आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अंड हे नेहमी उकडून खावं ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषण देतं. बऱ्याचदा लोकं अंड्याचा बलकदेखील कच्चा खातात अथवा पांढरा भागही न उकडता खातात. पण त्याने आपल्या शरीराला जास्त हानी पोहचते याची त्यांना अजिबात कल्पना नसते. पाहूया नक्की काय परिणाम होतात कच्चं अंडं खाण्याने – 

सल्मोना बॅक्टेरिया तुम्हाला करू शकतो आजारी

Shutterstock

अंड्याच्या सफेद भागामध्ये एक विशिष्ट बॅक्टेरिया असतो, ज्याला सल्मोना असं म्हटलं जातं. हा बॅक्टेरिया साधारण चिकनच्या आतडीवर सापडतात. पण बऱ्याचदा हा बॅक्टेरिया अंड्याच्या आतदेखील असण्याची शक्यता असते. तुम्ही बॅक्टेरियाने प्रभावित असणारं अंडं हाफफ्राय करू खाल्लं तरत तुमच्या शरीराला त्याचा नक्कीच त्रास होतो. यापासून वाचण्यासाठी तुम्ही अंडे हे उच्च तापमानावर उकडून घ्या. असं केल्याने यातील बॅक्टेरिया निघून जातो. अर्धकच्चं अंड्यामध्ये बॅक्टेरिया तसंच राहण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो हे असं करून खाणं टाळा. 

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय

बायोटिनची जाणवते कमतरता

कच्च्या अंड्यामध्ये विविध बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते, ज्याला एल्बुमेन असंही म्हटलं जातं. हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. तुम्ही कच्चं अंडं खात असल्यास, तुमच्या शरीरामध्ये हे बॅक्टेरिया प्रवेश करतात. हे बॅक्टेरिया शरीरातील बायोटिन नष्ट करण्याचं काम करतात. ज्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या उद्भवतात आणि केसगळतीही सुरू होते. बायोटिन शरीरासाठी एक आवश्यक तत्व आहे. यामुळे त्वचेची आणि केसांचा विकास होत असतो. 

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंडे का फंडा’

अलर्जीचा होतो त्रास

ADVERTISEMENT

Shutterstock

एल्बुमेन प्रोटीनच्या कारणामुळे बऱ्याच जणांना यामुळे अलर्जी होण्याची शक्यताही असते. या अलर्जीमुळे शरीरावर पित्त उठणं, त्वचेवर पुरळ येणं, सूज येणं, खाज येणं, सतत घसा खवखवणं, जंत होणं, उलटी, खोकला, सर्दी यासारखे अनेक आजारही होतात. तुम्हाला जर अशी लक्षणं दिसली तर डॉक्टर्सना नक्की तुम्ही संपर्क करायला हवा. काही जणांना तर कच्चं अंड खाल्ल्यानंतर अंगावर पूर्णतः रॅश येतात. 

उन्हाळ्यात अंडे खाण्याबाबत असलेले समज – गैरसमज

प्रोटीनची जास्त मात्रा असल्यामुळे हानिकारक

ADVERTISEMENT

Shutterstock

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तुम्हाला किडनीसंबंधित कोणतीही समस्या असतील तर जात् प्रमाणात प्रोटीन तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. ज्या लोकांचा नियमित फिल्टरेशन रेट कमी आहे त्यांच्यासाठी अंड्यातील प्रोटीन अतिशय हानिकारक ठरतं. ज्या लोकांना किडनीच्या समस्या आहेत त्यांनी साधारण 0.6 ते 0.8 ग्रॅम प्रोटीनपेक्षा अधिक जास्त प्रोटीन घातक ठरतं. जर किडनी अथवा लिव्हरच्या समस्या असतील तर कच्चं अंडं खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. खरं तर शक्यतो कच्चं अंडं खाणंं टाळा. कारण यामुळे कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स वाढण्याचं प्रमाणाही वाढतं. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
22 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT